आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६०.५५ प्रती बॅरल ते US $ ६१.३४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२६ ते US $१ = Rs ७१.४२ होते. US $ निर्देशांक ९८.५२ तर VIX १४.९० होता.

गणेशचतुर्थीच्या पूर्वी मार्केटमध्ये निराशा होती. पण आज अनंत चतुर्थीच्या दिवशी वातावरण बदलले आहे. बर्याच प्रमाणात निराशा कमी झाली आहे. प्रत्येक देशाने आर्थीक मंदीवर हल्लाबोल केला आहे. भारताच्या अर्थमंत्र्यानी स्टिम्युलसचा सपाटा सुरु केला आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या US $ २५० अब्ज मालावरची ड्युटी लावणे १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पुढे ढकलले आहे. ट्रम्प यांनी असे सांगितले की चीनच्या स्थापनेला ७० वर्ष पुरी झाल्याबद्दल सदिच्छा व्यक्त करण्यासाठी असे केले. ट्रम्प यांचे हृदयपरिवर्तन होत आहे. इराण बरोबरही बोलणी सुरु होत आहेत. इराणवरील निर्बंधात ढील दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जगातील सर्व मार्केटमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाले. ट्रम्प यांनी फेडला झिरो इंटरेस्ट रेट किंवा निगेटिव्ह इंटरेस्ट रेट करावा असे आग्रही प्रतिपादन केले.

रिलायन्स NIPPON ची ऑफर फॉर सेल ओपन आहे. आज OFS किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन झाली आहे. या OFS ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फ्लोअर प्राईस Rs २६२ आहे.

SBI त्यांचा SBI लाईफ मधला स्टेक OFS च्या माध्यमातून विकत आहे. याची फ्लोअर प्राईस Rs ७७० आहे.
अपोलो हॉस्पिटलचे प्रमोटर आपला ३.६% स्टेक Rs १४५० प्रती शेअर या भावाने विकणार आहेत. या विक्रीनंतर अपोलो हॉस्पिटलमधील प्रमोटर्सचा स्टेक ३०.८% राहील.

नेल्कोला इनफ्लाईट आणि मेरीटाईम कम्युनिकेशनसाठी लायसेन्स मिळाले.

बँक ऑफ बरोडाने BKC मध्ये असलेल्या देना कॉर्पोरेट सेंटरच्या बिल्डिंगसाठी बोली मागवल्या आहेत. यासाठी रिझर्व्ह किंमत Rs ५३० कोटी ठेवली आहे.

‘घर घर जल’ या योजनेचा फायदा इंडियन ह्यूम पाईप, जिंदाल SAW, फिनोलेक्स, ASTRAL पॉली या कंपन्यांना होईल.
L & T ला वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटींच्या दरम्यान ऑर्डर मिळाली.

सरकार SJVNL, THDC, NEEPCO या पॉवर क्षेत्रातील कंपन्यांचे मर्जर NHPC किंवा NTPC या कंपन्यात करण्याची शक्यता आहे.

एअर इंडियामधील आपला स्टेक विकण्यासाठी सरकार ऑक्टोबर २०१९ च्या अखेरपर्यंत बोली मागवणार आहे.

GRANUELS इंडियाच्या तेलंगाणा युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत USFDA ने EIR दिला आणि क्लीन चिट दिली.

इमामीचा Rs ६००० कोटींचा सिमेंट बिझिनेस घेण्यासाठी दालमिया भारतने बोली लावली आहे. त्यांनी यासाठी EOI ( एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) दिला आहे.

जुलै महिन्यासाठी IIP ४.३% तर ऑगस्ट महिन्यासाठी CPI ३.२१% होते.

येत्या पांच वर्षात US $ १ लाख कोटी निर्यातीचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. भारताच्या औद्योगिक धोरणालाही अंतिम स्वरूप दिले जाईल असे सरकारने जाहीर केले.

सरकार J & K च्या ९५ गावांत आणि लडाखमध्ये ५३ गावात ३६२ मोबाईल टॉवर उभारणार आहे. या दोन राज्यात कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. एका आठवड्याच्या आत Rs ४५० कोटींचे टेंडर काढणार आहे.

सरकार NHB (नॅशनल हौसिंग बँक) ला हौसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये स्टेक घेण्यासाठी मंजुरी देण्याची शक्यता आहे.
उद्या संध्याकाळी ४-१५ वाजता माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची CBDT आणि CBIC च्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्यावर त्या प्रेस कॉन्फरन्स घेतील.या कॉन्फरन्समध्ये रिअल्टी सेक्टर आणि लेदरवेअर सेक्टर साठी काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. लेदर सेक्टरसाठी ड्युटी फ्री इंपोर्टची मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. ३% वरून ५% करण्यात येईल. लेदर निर्यातीसाठी उत्तेजन दिले जाईल. फूटवेअरसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील GST १८% वरून १२% करण्याची शक्यता आहे. याचा फायदा मिर्झा इंटरनॅशनल, खादीम फूटवेअर, सुपर हाऊस, रीलॅक्झो, लिबर्टी यांना होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७१०४ NSE निर्देशांक निफ्टी १०९८२ बँक निफ्टी २७८१८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१९

  1. Arvind

    भारतात सध्या मंदी आहे की नाही. ललनटाॅप म्हणतात की गेल्या 18 महिन्यापासून मंदी आहे आणि सगळे सूचक आंकडे खाली जात आहेत. आपलं मत काय आहे?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.