आजचं मार्केट – १६ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ सप्टेंबर २०१९

१४.०९.२०१९ रोजी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निर्यात क्षेत्र आणि रिअल्टी क्षेत्रासाठी खालील योजना जाहीर केल्या.

(१) RODTEP (स्कीम फॉर रेमिशन ऑफ ड्युटी अँड टॅक्सेस ऑन एक्स्पोर्ट प्रॉडक्ट्स) :- सध्या टेक्सटाईल्स आणि काही इतर क्षेत्रांना निर्यातीसाठी MEIS आणि ROSL या योजनांखाली सवलती मिळत होत्या. या योजना ज्या क्षेत्रांना लागू असतील त्या वर्तमान स्वरूपात ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लागू राहतील. १ जानेवारी २०२० पासून RODTEP ही नवीन योजना लागू होईल. ही योजना इतर सर्व योजनांपेक्षा निर्यात क्षेत्राला फायदेशीर असेल. या योजनेसाठी केंद्रावर Rs ५००००कोटींचा बोजा वाढेल.

(२) GST रिफंड मिळण्यासाठी संपूर्ण ऑटोमेटेड इलेक्ट्रॉनिक रिफंड सिस्टिम तयार केली जाईल.
यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट ताबडतोब मिळेल.

(३) ECGC ( एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी स्कीम) MSME ला बँकांनी दिलेल्या निर्यातीसाठी दिलेल्या कर्जान्वर वर जास्त इन्शुअरन्स देऊ करेल. यासाठी US $ मधील कर्जासाठी ४% तर रुपयातील कर्जासाठी ८% प्रीमियम आकारला जाईल. या योजनेसाठी सरकारला Rs १७०० कोटी खर्च येईल.

(४) RBI प्रायारीटी क्षेत्राच्या व्याख्येत सुधारणा करेल. आणि लवकरच योजना जाहीर करेल. यामुळे बँका Rs ३६००० कोटी ते Rs ६८००० कोटी जादाचे कर्ज निर्यात क्षेत्राला प्रायारिटी क्षेत्र म्हणून देऊ शकतील.

(५) वाणिज्य मंत्रालय निर्यात क्षेत्रासाठी दिलेल्या कर्जाचे मॉनिटरिंग करेल.

(६) निर्यात करण्यासाठी बंदरे आणि विमानतळ यावरील प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करून ह्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

(७) जेम्स आणि ज्युवेलरी आणि हॅंडिक्राफ्ट्स, योग, पर्यटन, आणि टेक्सटाईल्स आणि लेदर उदयोगांसाठी ४ ठिकाणी मार्च २०२० मध्ये मेगा फेस्टिवल आयोजित केले जातील

(८) भारताने विविध देशाशी केलेल्या फ्री ट्रेड ऍग्रीमेंटस मधील विविध कलमांचा फायदा कसा घ्यायचा यासाठी निर्यातदारांना मार्गदर्शन केले जाईल.

(९) ऑन लाईन ओरिजिन मॅनेजमेंट सिस्टिम दवारा सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन मिळण्याची व्यवस्था केली जाईल. DGFT याबाबतीतले नियम लवकरच जाहीर करेल.

(१०) एका विशिष्ट मुदतीत सर्व जरुरी अनिवार्य तांत्रिक आणि पर्यावरणाशी संबंधित स्टँडर्ड्स अवलंबणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपल्या निर्यातीची गुणवत्ता उच्च राहण्यास मदत होईल.
तसेच योग्य दरात उत्पादनांची तपासणी आणि सर्टिफिकेशन सिस्टिम जारी केली जाईल

(११) हॅंडिक्राफ्ट्स उद्योगात काम करणाऱ्या कारीगरांना आणि त्यांच्या सहकारी सोसायट्याना E- मार्केट पोर्टल्स घेण्याची आणि सीमलेस एक्स्पोर्ट करण्याची परवानगी दिली जाईल. .

त्यांनी रिअल्टी क्षेत्रासाठीही खालीलप्रमाणे घोषणा केल्या.

(१) ECB ( एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग) च्या गाईडलाईन्स होम फायनान्स देणार्या कंपन्यांसाठी सोप्या केल्या जातील.

(२) एक खास विंडो उघडून ज्या अफोर्डेबल आणि मिडल साईझ इन्कम हौसिंग प्रोजेक्ट्स ६०% किंवा त्यापेक्षा जास्त पूर्ण झाल्या आहेत आणि ज्या NPA नाहीत किंवा NCLT मध्ये गेलेल्या नाहीत अशा प्रोजेक्ट्स ना लास्ट मिनिट फंडिंग केले जाईल. यासाठी सरकार एक Rs १०००० कोटींचा फंड उभा करेल आणि सरकार व्यतिरिक्त इतर एजन्सीज यात आणखीं Rs १०००० कोटी गुंतवतील. या फंडाचे व्यवस्थापन प्रोफेशनल्सकडे सोपवले जाईल. या योजनेचा ३.५ लाख घर खरेदी करणाऱ्यांना फायदा होईल.

या घोषणांबरोबरच त्यांनी गेल्या दोन प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेल्या आयकरविषयक घोषणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

अर्थव्यवस्थेत महागाईचे प्रमाण कमी आहे. जूलै २०१९ मध्ये IIP चे प्रमाण वाढले. अर्थव्यवस्थेमधील फिक्स्ड इन्व्हेस्टमेन्टचे प्रमाण वाढले असे सांगितले. पार्शल क्रेडिट गॅरंटी योजनेचा NBFC ना फायदा होत आहे. बँकांना त्यांचे कर्जावरील व्याज दर रेपो रेट किंवा

FBIL ने ठरवलेल्या बेंचमार्क रेटशी संलग्न करण्यास सांगून RBI ने केलेल्या रेटकट चा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सांगितले आहे. १९ सप्टेंबर २०१९ ला सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या प्रमुखांबरोबर होणाऱ्या बैठकीत क्रेडिट एक्स्पान्शनच्या संबंधित चर्चा होईल असे सांगितले.

प्रभात डेअरीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी Rs ६३.७७ प्रती शेअर या दराने शेअर डीलीस्टिंगला मंजुरी दिली.
आज क्रूड US $ ६६.०० प्रती बॅरल ते US $ ६६.६५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.४२ ते US $१=Rs ७१.६२ या दरम्यान होते.US $ निर्देशांक ९८.१४ होता VIX होते.

आज जपानची मार्केट बंद होती.

भारत आणि पाकिस्तानमध्ये ही ताणतणाव वाढत आहेत. इम्रानखान यांनी घोषणा केली की आम्ही जर पारंपरिक पद्धतीच्या युद्धात हरू लागलो तर अणवस्त्राचा उपयोग करण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्याचप्रमाणे इराणने सौदी अरेबियाला सांगितले की आमचा देश युद्धाला सज्ज आहे.

आज मध्यपूर्वेतील क्रूड उत्पादक देश सौदी अरेबियाच्या ABQAIQआणि KHURAIS या दोन प्लांट वर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला केला गेला. हा हल्ला येमेनने केला कारण याची जबाबदारी येमेनने घेतलीये. USA च्या मते हा हल्ला इराणने केला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमधील संबंध ढवळून निघाले. या हल्ल्यामुळे सौदी अरेबियाला त्यांचे ५०% उत्पादन बंद करावे लागले. ५७ लाख बॅरल एवढी उत्पादनात कपात झाली. पण क्रूडचा साठा खूप असल्यामुळे सध्या तरी ताबडतोब क्रूडच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार नाही. तरी क्रूड US $ ६६ प्रती बॅरल एवढ्या दरावर पोहोचले. सौदी अरेबियाच्या आरामको या क्रूड उत्पादन करणाऱ्या दिग्गज कंपनीचा IPO येत आहे. या IPO ला क्रूडच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे फायदा होईल. त्यामुळे हा ड्रोनचा झालेला हल्ला ही सौदीच्या दृष्टीने इष्टआपत्ती आली असे त्यांना वाटले. त् OMC ( ऑइल मार्केटिंग कंपन्या), पेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या, विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्या यांच्या शेअरमध्ये मंदी आली. केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्या, वाडिया ग्रुपच्या कंपन्या, IT आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्या तेजीत होत्या.
आज सेन्सेक्स आणि निफ्टी जरी पडत असले तरी ऍडव्हान्स डिक्लाईन रेशिओ फेव्हरेबल होता. कारण आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी होती. म्हणजेच आज मार्केटमध्ये काही वेगळेच चित्र दिसत होते. आज निर्देशांकाबाहेरच्या शेअर्समध्ये तेजी होती.

ऑगस्ट २०१९ साठी WPI १.०८% होता.

BEL ला आकाश मिसाईल तयार करण्यासाठी Rs ५३५७ कोटीची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर ३ वर्षात पुरी करायची आहे.
STC ला कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षे मुदत दिली जाईल. NCLT मध्ये गेलेल्या केसेस परत घेतल्या जातील. Rs ३०० कोटींची मालमत्ता बँकांना ट्रान्स्फर केली जाईल.

ITDC या सरकारी कंपनीची हॉटेल अशोका खूप मोठ्या मुदतीसाठी म्हणजे ५० ते ६० वर्षांसाठी लीजवर दिले जाईल किंवा त्याची विक्री केली जाईल.

बँकेचा IPO न आणता शेअरचे लिस्टिंग करता येणार नाही असे इक्विटासला कळवल्यामुळे आता कंपनी त्यांच्या स्मॉल फायनान्स बंकेचा IPO मार्च २०२० पर्यंत लिस्टिंग करेल.

ग्रनुअल्स इंडिया ही कंपनी त्यांचे ४.३ कोटी शेअर्स Rs ११० कोटींना AJINIMOTO OMNICHEM ला विकेल.
सिप्लाच्या पिथमपूर युनिट १ आणि युनीट २ ला UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून CGMP मिळाले.

आज कोलगेटच्या नवीन MD रामराघवन यांनी जाहीर केले की आता कोलगेटची पॉलिसी REACTIVE ऐवजी PROACTIV असेल. सध्या कंपनीचा ५२% मार्केटशेअर आहे. मार्केट शेअर वाढवणे हे कंपनीचे मुख्य लक्ष्य असेल. लवकरच छोट्या मुलांसाठी नवी टूथपेस्ट रेंज लाँच करणार आहोत. कोलगेटने पतंजलीचे आव्हान यशस्वीरित्या पेलवल्यामुळे कोलगेट च्या शेअरमध्ये आज जबरदस्त तेजी आली. याउलट पातंजलीला प्रॉडक्शन आणि फायनान्सिंगमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. याचा फायदा स्पर्धा कमी झाल्यामुळे कोलगेटला होईल.

SBI ने SBI लाईफमधला ४.५% स्टेक म्हणजे ४.५ कोटी शेअर्स विकले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७१२३ NSE निर्देशांक निफ्टी ११००३ बँक निफ्टी २७८५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.