आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६८.१० प्रती बॅरल ते US $ ६८.७८ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५९ ते US $१=Rs ७१.८३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६३ होता. VIX १५.७५ होते.

आज भारताचे माननीय आणि अतिशय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९ वा वाढ दिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ‘आजच्या मार्केट’ ची सूरूवात करू.

सौदी अरेबियामध्ये क्रूडचे ४०% उत्पादन पुन्हा सुरु झाले. क्रूड US $ ७० प्रती बॅरल पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उद्या फेडची मीटिंग संपल्यावर फेड रेट करणार का ? आणि केल्यास किती करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प हे फेडने रेट कट करावा यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.

आज क्रूडचे वाढते दर, रुपयांची US $१=Rs ७२ पेक्षा घसरण आणि २२ तारखेच्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये GST दरांमध्ये कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आली.

सरकार आता लॉजिस्टिक सेक्टर साठी वेगळे धोरण आखणार आहे.

वाणिज्य मंत्री गोयल यांनी निर्यातदारांसाठी NIRVIK (निर्यात रिन विकास) योजना जाहीर केली. आता छोट्या निर्यातदारालाही विम्याचे जास्त संरक्षण मिळेल. यासाठी Rs ८५०० कोटींचा फंड उभारला जाईल.

सरकार STC MMTC या कंपन्या बंद करायचा विचार करत आहे. या कंपन्या इतर उद्योजकांसाठी परदेशातून माल मागवत होत्या. पण आता हे काम प्रत्येक कंपनी आपापले करते. STC वर कर्ज आहे यासाठी STC चे ऍसेट बँकांना दिले जातील. MMTC जरी फायद्यात असली तरी या फायद्यातून कोठलेही मोठे कार्य साध्य होत नाही. त्यामुळे या कंपन्या बंद करणे किंवा त्यांचे मर्जर करणे हे दोन्ही विचार डोळ्यासमोर आहेत. पण या कंपन्या बंद करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही.

SAIL आपल्या आयर्न ओअर उत्पादनापैकी २५% उत्पादनाची विक्री करू शकेल.

टाटा पॉवरने राजस्थानामध्ये १५० MV पॉवरची सोलर प्रोजेक्ट सुरु केली.

TCS ने बंगलोर येथील GM टेक्निकलबरोबर ENGG डिझाईन सर्व्हिसेस साठी ५ वर्ष मुदतीचा करार केला. TCS GM टेक्निकलमध्ये स्टेक खरेदी करेल.

DLF ही कंपनी आपली ३२ एकर जमीन अमेरिकन एक्स्प्रेसला विकणार आहे.

कॅफे कॉफी डे यांचा व्हिलेज टेक्निकल पार्क ब्लॅकस्टोन Rs २७०० कोटींना खरेदी करणार आहे. कावेरी सीड्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बाय बॅकवर विचार करण्यासाठी २४ सप्टेंबर २०१९ रोजी बैठक बोलावली आहे.
टाटा कम्युनिकेशन मधून १७ सप्टेंबर २०१९ ही रेकॉर्ड डेट असल्यामुळे VSNL च्या मालकीचे ७७३.७० एकर जमीन (या जमिनीची किंमत Rs १०००० ते Rs १४००० कोटी आहे) हेमिस्फिअर प्रॉपर्टीज म्हणून वेगळी केली गेली. या जमिनीची किंमत प्रती शेअर Rs १७५ ते Rs १९० असल्यामुळे टाटा कम्युनिकेशनची किमत त्याप्रमाणात कमी झाली.म्हणजे Rs २६० झाली तुमच्या जवळ जर टाटा कम्युनिकेशनचा १ शेअर असेल तर तुम्हाला हेमिस्पिअर प्रॉपर्टीजचा एक शेअर मिळेल.
IL & FS ची वसुली प्रक्रिया योग्य मार्गावर आहे. Rs ५०००० कोटी एवढी वसुली होईल असा अंदाज आहे.

आज BALMER LAWRIE या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनसवर विचार करण्यासाठी बैठक असल्यामुळे ह्या शेअर मध्ये तेजी होती.

आजपासून ४८ कंपन्यांचे शेअर ज्यात युनिप्लाय, स्मार्ट लिंक, प्रोझोन, मुकंद, आशापुरा माईनकेम या कंपन्यांचा समावेश आहे T टू T सेगमेंट मधून बाहेर येतील

तांत्रिक विश्लेषण

Technical Chart

 

गोल्डन क्रॉस आणि डेथ क्रॉस या दोन पॅटर्नकडे विश्लेषकांचे लक्ष असते. ज्यावेळी शॉर्ट टर्म मूव्हिंग ऍव्हरेजची लाईन ( ५० दिवसांची मूव्हिंग ऍव्हरेजीसची लाईन) लॉन्ग टर्म मुविंग ऍव्हरेजीसच्या लाईनला (२०० दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजीसची लाईन) वरच्या दिशेने छेदते आणि क्रॉस करून वर जाते त्याला गोल्डन क्रॉस म्हणतात. अशावेळी शॉर्ट टर्म मध्ये तेजी येते. . या उलट शॉर्ट टर्म ऍव्हरेजीसची लाईन लॉन्ग टर्म ऍव्हरेजीसच्या

लाईनला खालच्या दिशेने क्रॉस करते आणि खाली जाते त्या वेळी शॉर्ट टर्म मध्ये मंदी येते याला डेथ क्रॉस असे म्हणतात. अशा प्रकारचा डेथ क्रॉस पॅटर्न सध्या तयार झाला आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये मंदी राहील

 

 

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४८१ NSE निर्देशांक निफ्टी १०८१७ बँक निफ्टी २७१३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

  1. Dipawansh

    I read your post regularly, today’s post technical explain of golden crossover point really helpful. Thanks 😊. If you post some technical explaination it will help to us…….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.