आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.९१ प्रती बॅरल ते US $ ६५.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $१=Rs ७१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६५ होता तर VIX १७.५१ होता.

सध्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे USA च्या दौऱ्यावर आहेत. ह्यूस्टन येथे त्यांचा ‘HOWDY MODI’ हा कार्यक्रम USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एनर्जी क्षेत्रातील नामवंत उद्योगपती हजर होते. ट्रम्प यांनी भारताबरोबर मिनी डील करण्यात येईल असे सांगितले. पेट्रोनेट LNG ही भारतीय कंपनी TELLURIN कंपनीच्या LOUISANA प्रोजेक्टमध्ये US $ २.५ बिलियनची (१८% स्टेक) गुंतवणूक करेल. ही कंपनी भारताला पुढील ४० वर्षे प्रती वर्षी ५ मिलियन मेट्रिक टन LNG चा पुरवठा करेल. यामुळे भारत ही गॅस बेस्ड अर्थव्यवस्था बनेल. आणखीही काही गुंतवणुकीसाठी MOU केले जातील अशी अपेक्षा आहे.

माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली कॉर्पोरेट आयकरातील कपात, FPI ला लावलेला कॅपिटल गेन्सवरील सरचार्ज रद्द करण्याची केलेली घोषणा, GST कौन्सिलने केलेली विविध दरात कपात, USA आणि चीन यांच्यातील ट्रेडवार संबंधातील आलेला समजूतदारपणा आणि दोन्हीही देशांचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतीय मार्केटमध्ये गेले दोन दिवस आलेली तेजी. त्याला सपोर्ट मिळाला मोदींच्या USA दौऱ्याचा. या दौऱ्यामुळे USA आणि भारतात नवे नवे करार होतील. तसेच नवीन FDI भारतात येईल. आज USA शी संबंधित मल्टिनॅशनल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. कोलगेट, GILLETTE, फायझर, हनीवेल ऑटोमेशन, व्हरपुल, सिमेन्स

GST कौन्सिलने हॉटेल रूमच्या भाड्यावरील GST मध्ये कपात केली. Rs १००० च्या खाली GST लागणार नाही. Rs १००१ ते Rs ७५०० पर्यंत भाड्यावर १२% GST तर Rs ७५०१ आणि त्यावरील भाड्यावर १८% GST लागेल असे जाहीर केले. कॅफिनेटेड पेयांवर GST चा दर वाढवला. याचा परिणाम वरूण बिव्हरेजीस, कॅफे कॉफी डे, NESTLE, या कंपन्यांवर होईल.

इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटच्या UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीने केलेल्या १६ ते २० सप्टेंबरच्या तपासणीत २ त्रुटी दाखवल्या.
पंजाब आणि सिंध बँकेने एरा इन्फ्रा या कंपनीला दिलेले Rs ३० कोटींचे कर्ज ‘फ्रॉड’ म्हणून घोषित केले.
केंद्र सरकारने स्क्रॅपेज पॉलिसीचा आराखडा बनवला आहे. या प्रमाणे शहरी एरियात १५ वर्षांपेक्षा जुन्या ट्रकना प्रवेश दिला जाणार नाही. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना प्रत्येक सहा महिन्यांनी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागेल. १५ वर्षांपेक्षा जुन्या आणि नव्या वाहनांवर वेगवेगळ्या दराने रोड टॅक्स लावला जाईल. जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर रोड टॅक्समध्ये सूट मिळेल. जुने वाहन स्क्रॅप केल्यावर स्क्रॅपेज सर्टिफिकीट दिले जाईल आणि हे ट्रांसफरेबल असेल. हा ड्राफ्ट वेगवेगळ्या मंत्रालयांना त्यांच्या अभिप्रायासाठी आणि सूचनांसाठी पाठवला आहे.

RBI ने बँकांना आपले कर्जावरील व्याजाचे दर रेपो रेट किंवा FBIL ने ठरवलेल्या एक्स्टर्नल बेंच मार्कशी सलंग्न करायला सांगितले आहे. त्याप्रमाणे SBI ने आज आपले कर्जावरील व्याजाचे दर १ ऑक्टोबर २०१९ पासून एक्स्टर्नल बेंच मार्क रेटशी सलंग्न असतील असे जाहीर केले.

आता थोडेसे थॉमस कूक या कंपनीच्या लिस्टेड शेअर विषयी. थॉमस कूक ही लंडन येथे असलेली कंपनी दिवाळखोरीत निघाली. पण थॉमस कूक ( इंडिया) ही कंपनी फेअर फॅक्स या कॅनडियन कंपनीच्या मालकीची आहे.त्यांचा या कंपनीत ६७.६% स्टेक आहे. या भारतीय कंपनीचे फंडामेंटल्स ठीक आहेत.आपल्याजवळ हे शेअर्स असतील तर घाबरून जाऊन ते विकून टाकू नयेत म्हणून हे लिहिले.

ITC ही एक बहुउद्देशीय वेलडायव्हर्सिफाइड कंपनी आहे. ही कंपनी पेपर, सिगारेट, बिस्कीट आणि इतर पेये, हॉटेल व्यवसाय या उद्योगात आहे. हल्ली झालेल्या सिंगल प्लास्टिकवरील बंदी, E- सिगारेट वरील बंदी, GST कौन्सिलने रूमरेन्टवरील GST मधे केलेली कपात आणि कॉर्पोरेट टॅक्समधील कपात या सर्व गोष्टींचा फायदा ITC ला होईल.
ब्रिटानिया या कंपनीच्या शेअरने एका महिन्यात ४०% रिटर्न दिला. कोलगेट आज ऑल टाइम हायवर होता.

BPCL ह्या ऑइल मार्केटिंग कंपनीतील आपला स्टेक सरकार आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय कंपनीला विकण्याची शक्यता आहे. या कंपनीचा विस्तार बिना, नुमालीगढ, कोची येथील रिफायनरीज, असंख्य पेट्रोलपंपामार्फत ऑइल मार्केटिंग, आणि खूप मोठी जमीन बँक असा आहे यामुळे ही कंपनी जर सरकारने योग्य रीतीने किंमत ठरवून विकली तर सरकारच्या स्टेकसाठी खूप किंमत मिळेल. आज या बातमीने BPCL चा शेअर खूप वाढला. सरकारने आता दोन सरकारी कंपन्यांचे मर्जर करून डायव्हेस्टमेन्ट करून फायदा होत नाही नुसती आकडेमोड होते, नवीन तंत्रज्ञान, व्यवस्थापन तंत्र येत नाही म्हणून अशा प्रकारची डायव्हेस्टमेन्ट करायची नाही असे ठरवले आहे.
BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३९०९० NSE निर्देशांक निफ्टी ११६०० बँक निफ्टी ३०५६६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.