आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.०८ प्रती बॅरल ते US $ ६४.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७९ ते US =Rs ७०.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६० होता VIX १७.९० होते.

मार्केट गेले दोन दिवस कमालीच्या तेजीत होते. त्यामुळे ही तेजी आज थोडी विश्रांती घेईल हे भाकीत आज खरे ठरले. या कन्सॉलिडेशनमध्ये चांगले शेअर खरेदी करण्याची संधी किरकोळ गुंतवणूकदारांना मिळाली.

सरकार लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी जाहीर करेल. इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी रिचार्जेबल लिथियम-इऑन बॅटरीचा मुख्य खर्च असतो. या बॅटरीसाठी प्रामुख्याने लिथियम लागते हे लिथियम बोलिव्हियामध्ये विपुल प्रमाणात मिळते. भारताने बोलिव्हियाबरोबर लिथियम पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. या बॅटरीसाठी किलोवॅटमागे Rs २००० सबसिडी मिळणार आहे. सध्या कॉर्पोरेट टॅक्स खूप कमी केलेला आहे. याचा फायदा एक्झाईड, JBM, अमरराजा बॅटरी हिमाद्री केमिकल्स, स्नायडर, टाटा केमिकल्स या कंपन्यांना होईल. त्यामुळे बॅटरी उत्पादनासाठी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

रुपया मजबूत होत आहे. ११ ऑक्टोबर २०१९ रोजी इन्फोसिस आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. दुसऱ्या तिमाहीचे निकाल फारसे चांगले येण्याची शक्यता कमी आहे. कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींचा फायदा IT सेक्टरला होणार नाही. कारण हे आताच २२% कॉर्पोरेट टॅक्स भरत आहेत. हीच कथा फार्मा सेक्टरमधील कंपन्यांची आहे. त्यामुळे IT आणि फार्मा सेक्टरमधील कंपन्या या तेजीच्या वाहत्या गंगेत मंदीत आहेत.

सरकार नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी तयार करत आहे. याचा फायदा स्नोमॅन लॉजिस्टिक, महिंद्रा लॉजिस्टिक, गती, एजीस, BALMER लॅरी, कंटेनर कॉर्पोरेशन, अलकार्गो या कंपन्यांना होईल.

SAT ने C G पॉवर कंपनीच्या सेबीने केलेल्या तपासणीचा अहवाल SAT ला सादर करायला सांगितला. या अहवालाची एक प्रत गौतम थापरना द्यायला सांगितली.

पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह बँकेच्या कारभारावर RBI ने बंधने घातली आहेत. या अन्वये ही बँक आता डिपॉझिट घेऊ शकणार नाही किंवा कर्ज देऊ शकणार नाही. ज्या लोकांचे पैसे या बँकेत आहेत त्यांना सहा महिन्यातून Rs १००० काढता येतील. ही बँक गोव्यातील एका बँकेबरोबर टेकओव्हर साठी बोलणी करत होती.

टी सी एसने फायनान्सियल सर्व्हिसेससाठी SaaS लाँच केले.

सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे आणखी एकदा Rs ५५२५० कोटी गुंतवून रिकॅपिटलायझेशन करण्याची शक्यता आहे.

FITCH ने भारतीय बँकांच्या लोन ग्रोथचे फोरकास्ट १३.५% वरून ११% पर्यंत कमी केले.

सरकार नेहेमी कर्ज काढत असते. कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींमुळे सरकारचे उत्पन्न Rs १४५००० कोटींनी कमी होणार आहे. त्यामुळे ही घट भरून काढण्यासाठी आणि इतर सरकारी योजनांसाठी सरकार विविध उपायांचा अवलंब करण्याची शक्यता आहे. कारण अर्थमंत्रयांनी हे स्पष्ट केले की सरकार आपला विविध योजनांवर आणि कामांवर खर्च कमी करणार नाही. यात स्वदेशातुन तसेच परदेशातून कर्ज उभे करण्याचा पर्याय आहे. हे कर्ज सरकार केव्हा, कोणत्या प्रकारे, कोठल्या मार्गाने आणि किती व्याजाच्या दराने उभे करणार याची योजना म्हणजेच “बॉरोइंग कॅलेंडर’ ची सरकार सोमवारी घोषणा करेल.

सध्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये ज्या सवलती दिल्या आहेत त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर त्या कंपन्यांना आता मिळत असलेल्या कोणत्याही सवलतींचा फायदा घेता येणार नाही. डाबर, मेरिको, गोदरेज कन्झ्युमर या कंपन्या २५.६% टॅक्स भरतात. त्यामुळे या कंपन्यांना नवीन योजनेत जाणे फायदेशीर होणार नाही. या कंपन्या आपल्या उत्पादनांचा भाव कमी करणार नाहीत. टॅक्समधील सवलती बंद होतील तेव्हा या कंपन्या नव्या योजनेत शिफ्ट होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०९७ NSE निर्देशांक निफ्टी ११५८८ बँक निफ्टी ३०१८३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.