आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.०५ प्रती बॅरल ते US $ ६२.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०१ ते US $१=Rs ७१.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२० तर VIX १६.८५ होता.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी त्यांचे विरोधक करत आहेत.

सौदी आरामकोची उत्पादनक्षमता पुन्हा पूर्ववत झाली. ठरलेल्या किंवा जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच उत्पादन पूर्वस्थितीला आले. त्यामुळे आज क्रूडचा दर थोडा कमी झाला.

सरकार त्यांच्या बॉरोइंग कॅलेंडरमध्ये कोणताही बदल करणार नाही.

पॉवर ग्रीड ही कंपनी आपले Rs २०००० कोटींचे असेट्स एका वर्षात दोन टप्प्यात विकणार आहे. या ऍसेटमध्ये अडाणी एंटरप्रायझेस, अडाणी ट्रान्समिशन KEC या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे आज पॉवर ग्रीडचा शेअर ६% नी वाढला.

पॉवर ट्रेडिंग कंपनी आता आपले नॉन कोअर बिझिनेस विकणार आहे. कंपनी PTC फायनान्सियल सर्व्हिसेस आणि PTC एनर्जी या कंपन्यातील आपला स्टेक विकून Rs २००० कोटी गोळा करेल.

अल कार्गो लॉजिस्टिक ‘गती’ या कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे

सरकार SUTTI मधील आपला ऍक्सिस बँकेतील ५.३६% आणि ITC मधील ७.९७% स्टेक प्रथम भारत ETF २२ आणि नंतर OFS च्या माध्यमातून विकणार आहे.

मारुतीने आपल्या काही मॉडेल्सच्या किमती सुमारे Rs ५००० नी कमी केल्या.

बजाज ऑटोने आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीमध्ये Rs ६००० पर्यंत कपात जाहीर केली. पल्सर Rs ३८०० प्लॅटिना Rs २५०० तर डॉमिनार वर Rs ६००० ची सूट जाहीर केली.

टी सी एस ला वेस्टर्न आशियातील QNB ग्रुपकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेससाठी ऑर्डर मिळाली.
ITC या कंपनीने आपल्या काही उत्पादनांच्या किमती कमी केल्या. VIVAL, आशीर्वाद आटाच्या किमती कमी केल्या.
या सर्व कंपन्या असे सांगत आहेत की त्यांना कॉर्पोरेट टॅक्समध्ये मिळालेल्या सवलतींमधील काही भाग त्या ग्राहकांकडे पास ऑन करत आहेत.

स्पाईस जेट आपल्या कार्गो युनिटचा IPO आणणार आहे.

काल RBI ने पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लावले. या बँकेने काही रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांना दिलेली कर्जे NPA झाली म्हणून ही उपाययोजना केली गेली. याचा परिणाम म्हणजे आज सोशल मेडियावर सरकार काही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका बंद करण्याचा निर्णय घेत आहेत असा मेसेज दिला गेला. RBI आणि केंद्र सरकारचे फायनान्सियल सेक्रेटरी यांनी लोकांना आश्वस्त केले की सरकारचा असा काहीही विचार नाही.

२६ सप्टेंबर २०१९ रोजी १२ कंपन्यांचे शेअर्स F & O सेगमेंटमधून बाहेर पडतील.

हेक्सावेअर ही कंपनी IT निर्देशांकात समाविष्ट होईल.

आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे मार्केट वाढले. कारण यामुळे EPS मध्ये फरक पडणार आहे. आधी मार्केट मंदीत होते. ट्रेडरनी शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या. त्यामुळे शॉर्टकव्हरिंग आले. त्यामुळे दोन दिवस कोणताही शेअर वाढत होता. पण आता तसे होणार नाही कोणत्या कंपन्या किती टॅक्स भरत आहेत आणि त्यांना या कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींचा किती फायदा होईल याचा विचार करूनच आता खरेदी होईल. ‘सब घोडे बारा टक्के’ असे होणार नाही.

आज काही बातम्यांशी संबंधित शेअर्स आणि IT क्षेत्रातील शेअर्स सोडून बाकी शेअर्समध्ये मंदी होती. ही मंदी दिवसाच्या शेवटी वाढतच गेली. आज बँकांच्या शेअरमध्ये सपाटून विक्री झाली

उद्या F & O सेगमेंटमधील काँट्रॅक्टसची सप्टेंबर महीन्याची एक्स्पायरी आहे

IRCTC ( इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) या सरकारी कंपनीचा Rs ६४५ कोटींचा IPO सोमवार ३० सप्टेंबर २०१९ ला ओपन होत आहे. हा IPO ३ ऑक्टोबरला बंद होईल . या IPO चा प्राईस बँड Rs ३१५ ते Rs ३२० आहे.मिनिमम लॉट ४० शेअर्सचा आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीचे कर्मचारी यांना Rs १० डिस्काउंट आहे. या इशुमधील सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल आहे. आज रेल्वेशी संबंधित म्हणजेच RITES, RVNL, टिटाघर वॅगन्स, IRCON हे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५९३ NSE निर्देशांक निफ्टी ११४४० बँक निफ्टी २९५८६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.