आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $६२.२३ प्रती बॅरल ते US $ ६२.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८९ ते US $१=Rs ७०.९२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५६ तर VIX १६.६३ होते.

२ ऑक्टोबर २०१९ पासून भारताला सिंगल प्लास्टिक वापरापासून मुक्त करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून CAIT ( कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) या ट्रेडर्सच्या संघटनेने ग्राहकांना कोणतेही सामान आणण्यासाठी पिशवी घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

२२ फूड कंपन्यांनी आज जाहीर केले की आम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणार नाही. या मध्ये डाबर, HUL, मदर डेअरी, नेस्ले, मॅकडोनाल्ड यांचा समावेश आहे. कोर्टानेही सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. सरकारच्या घोषणेनंतर पेपर आणि ताग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. उदा मालू पेपर, ओरिएंट पेपर, JK पेपर, इंटरनॅशनल पेपर, पदमजी पल्प, TNPL, शेषशायी पेपर, हुतामाकी PPL, वेस्ट कोस्ट पेपर. CHEVIOT, लुडलो ज्यूट. GLOSTER

सप्टेंबर एक्स्पायरीपासून खाली दिलेल्या १२ कंपन्यांचे शेअर्स F & O सेगमेंट मधून बाहेर पडतील. (१) MCX (२)ओरॅकल (३) रेमंड (४) DHFL (५) EIL (६) कजारिया सिरॅमिक्स (७) IDBI बँक (८) हिंदुस्थान झिंक (९) बिर्ला सॉफ्ट (१०) अरविंद (११) रिलायन्स कॅपिटल (१२) रिलायन्स इन्फ्रा आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स हा शेअर निफ्टी मधून बाहेर पडेल आणि नेस्ले या आंतरराष्ट्रीय कंपनीचा निफ्टीमध्ये समावेश होईल

बजाज ऑटो, बँक ऑफ इंडिया, CESC, ICICI PRU, पिरामल एंटरप्रायझेस, ग्रासिम, श्री सिमेंट, IDFC फर्स्ट बँक, JSW स्टील या शेअर्समधील काँट्रॅक्टस ८५% पेक्षा जास्त रोल ओव्हर झाली .

आता F & O सेगमेंटमधील जवळ जवळ सर्व शेअर्समध्ये डिलिव्हरी घ्यावी लागेल. नाहीतर एक्स्पायरीच्या आधी एक्झिट करावे लागेल. स्पेक्युलेशन रोखणे हा यामागील उद्देश आहे. पूर्वी ४-५ कंपन्यांचे शेअर बॅनमध्ये असत. आता या बॅनच्या मार्गाने होणाऱ्या सट्टयाला आळा बसेल.

स्पाईस जेटने २७ ऑक्टोबर २०१९ पासून भारतात ४६ नवीन उड्डाणे लाँच केली.

२३ सप्टेंबर २०१९ पासून म्युच्युअल फंड अनलिस्टेड CP मध्ये नवीन गुंतवणूक करू शकणार नाही. तसेच आपल्या AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) च्या १०% पेक्षा जास्त गुंतवणूक अनलिस्टेड NCD ( नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स) मध्ये करू शकणार नाहीत.

सरकार आता आपल्या डायव्हेस्टमेन्टचा वेग आणि कक्षा वाढवणार आहे. सरकार आता हिंदुस्थान झिंक, कंटेनर कॉर्पोरेशन, BEML, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील आपला स्टेक डायव्हेस्ट करणार आहे. तसेच रेल्वेशी संबंधित RAILTEL आणि IRFC या कंपन्यांचा IPO लवकरच आणण्यात येईल.

येस बँकेने कॅपिटल उभारण्यासाठी RBI कडे अर्ज केला आहे.

आपल्या पेट्रोल बिलाचे किंवा डिझेल बिलाचे पेमेंट क्रेडिट केल्यावर मिळणारा Rs ०.७५ प्रती लिटर कॅश बॅक १ ऑक्टोबर २०१९ पासून मिळणार नाही. हा बायबॅक ऑइल मार्केटिंग कंपन्या देत असल्यामुळे त्यांचे रिटेलिंग मार्जिन वाढेल.
ऑक्टोबर २०१९ हा महिना पांच आठवड्यांचा आहे आणि या महिन्याची F & O सेगमेंटची एक्स्पायरी ३१ ऑक्टोबरला असेल. या महिन्यात मार्केट गांधी जयंती, विजयादशमी, महाराष्ट्रामधील मतदान, दिवाळी यासाठी मार्केट चार दिवस बंद राहील. या महिन्यात चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वाटाघाटी अंतिम फेरीत असतील. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल. १ ऑक्टोबर २०१९ पासून GST चे सुधारित दर अमलात येतील. सेबीने एक्स्पायरीच्या दिवशी जर कॉन्ट्रॅक्ट लाईव्ह असेल तर त्या शेअर्सची फिझिकल डिलिव्हरी द्यावी/ घ्यावी लागेल असा नियम केला आहे. त्यामुळे एक्स्पायरीच्या आधी बहुसंख्य ट्रेडर्स पोझिशन SQUARE करण्याचा किंवा रोल ओव्हर करण्याचा प्रयत्नात असतील.ऑक्टोबर महिन्यात कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

इन्फोसिस ११ ऑक्टोबर २०१९ रोजी आपले दुसऱ्या तिमाही निकाल जाहीर करेल. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी BSE आणि NSE या दोन्ही एक्स्चेंज मध्ये मुहूर्त ट्रेडिंग असेल. तसेच ३१ ऑक्टोबर २०१९ हा ब्रेक्झिट ( UK युरोपियन युनियनमधून बाहेर पडेल) साठी अखेरचा दिवस आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९८९ NSE निर्देशांक निफ्टी ११५७१ बँक निफ्टी ३०००२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.