Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०१९
आज क्रूड US $ ६०.७५ प्रती बॅरल ते US $ ६०.८६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७०.७३ ते US $१=Rs ७०.८० या दरम्यान होती. US $ निर्देशांक ९७.२८ होता. VIX १६ होते. फेडने ०.२५% रेटकट केला आता हे रेट १.५०% ते १.७५% या मर्यादेत असतील. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आल्यामुळे भारतातही बँकांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
USA आणि चीन यांच्या प्रतिनिधींमध्ये टेलीफोनवरून ट्रेड आणि टॅरिफ यांच्यावर चर्चा होईल
भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान बँकॉक दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते ASEAN ( असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ) समिटमध्ये भाग घेतील . आणि RECP समिटमधे भाग घेतील.
दक्षिणपूर्व अरबी सागरात ‘महा ‘ नावाचे तुफान केरळ किनारपट्टीपासून ३०० किलोमीटर अंतरावर आकार घेत आहे. या तुफानामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि कोंकण किनारपट्टीवर जोराचे वारे आणि पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज मार्केटने ४ जून २०१९ नंतर BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३९२ या कमाल स्तरावर होता. बँक निफ्टीनेही ३०००० वर बरीच मजल मारली. निफ्टी जुनियर कालच ऑल टाइम हाय पाईंटला पोहोचला. त्यामुळे IIरन शेअर्समध्ये तेजी होत आहे. ऑटो आणि ऑटो पार्ट्स आणि अँसिलियरी शेअर्समध्ये तेजीला सुरुवात झाली आहे.
सरकार लवकरच गृह कर्जावरील Rs ५००००० पर्यंतच्या व्याजावर आयकरामध्ये १०% सूट देण्याचा विचार करत आहे. यासाठी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत तुम्ही घर घेतले पाहिजे. ही सवलत सरकार तीन वर्षापर्यंत देण्याचा विचार करत आहे.
सर्व रिअल इस्टेट प्रोजेक्ट्सला इन्फ्रास्टक्चरचा दर्जा देण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अफोर्डेबल हौसिंगलाच इंफ्राचा दर्जा होता. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातले कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
COAI ने आज सांगितले की भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांना पुढील दोन वर्षांसाठी स्पेक्ट्रम फी चार्जेस माफ करावी. कारण या कंपन्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोठी रक्कम AGR म्हणून सरकारला भरायची आहे. या COAI च्या पत्रावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी हरकत घेतली. या कंपन्यांना हे माहीत असूनही की जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्याविरुद्ध गेला तर आपल्याला हे पैसे भरावे लागतील,तरी या कंपन्यांनी २०११ पर्यंत या खर्चासाठी कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन केली नाही. या दोन कंपन्यांची हे चार्जेस भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना हे पेमेंट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सवलत देण्याची गरज नाही.असे रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी सांगितले.
कॅडिला हेल्थकेअरच्या बडडी युनिटच्या १५ सप्टेंबर २०१९ ते २३ सप्टेंबर २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने क्लीन चिट दिली.
येस बँकेला हाँगकाँगच्या SPGP होल्डिंग या कंपनीकडून US $ १२० कोटी येस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाइंडिंग ऑफर मिळाली आहे. येस बँकेचे उद्या दसऱ्या तिमाहीचे निकाल आहेत. येस बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या गुंतवणुकीविषयी उद्या विचार करतील . ही गुंतवणूक करण्यासाठी RBI ची मंजुरी घ्यावी लागेल. या बातमीमुळे येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली. ही गुंतवणूक बँक नवीन शेअर्स अलॉट करून करेल.
थंगमाईल ज्युवेलर्स, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, सिंडिकेट बँक ( तोट्यातून फायद्यात आली, ऍसेट गुणवत्तेत किंचित सुधारणा) धनलक्ष्मी बँक ( NII वाढले, फायदा वाढला. ऍसेट गुणवत्तेत सुधारणा) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
JBM ऑटो या कंपनीचे निकाल साधारण आले.
IOC (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन) चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले. प्रॉफिटमध्ये ८३% घट झाली रेव्हेन्यू १३% ने कमी झाले. हा इन्व्हेन्टरी लॉसेसचा परिणाम आहे. GRM US $ ८.४५ प्रती बॅरल वरून US $ २.६९ प्रती बॅरल एवढे कमी झाले. (YOY).
हे निकाल मार्केटची वेळ संपताना आल्यामुळे याचा परिणाम IOC च्या शेअरवर उद्या दिसेल. उद्या ऑटो विक्रीचे आकडे येतील हे सणासुदीच्या काळातील आकडे असल्यामुळे विक्रीचे आकडे चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवावे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०१२९ NSE निर्देशांक निफ्टी ११८७७ बँक निफ्टी ३००६६ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!