आजचं मार्केट – १ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५९.४० प्रती बॅरल ते US $ ६०.०३ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७०.७३ ते US $ १= ७१.१६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.५३ तर VIX १६.०३ होते.

आज चीन आणि हाँगकाँगची शेअर मार्केट्स बंद होती. USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध इम्पीचमेंटच्या कारवाईची मोहीम विरोधी पक्ष डेमोक्रेटिकनी तीव्र केली आहे. गेले दोन दिवस इम्पीचमेंटमुळे बातमी चांगली नव्हती. क्रूड US $ ६० प्रती बॅरल पेक्षा स्वस्त झाले. काल निफ्टीने १०० DMA ला स्पर्श केला पण DII ने खरेदी केली. पण हॅमर फॉर्मेशन झाले. ११४००, ११४४०, ११४८०, हा बेस तयार झाला. पण बँक निफ्टीने २९५००चा पाईंट सोडला. आता २९००० हा बेस होईल. इंडिया बुल्स आणि येस बँक हे कारण झाले पण आज दोघांनीही खुलासा केला. USA मध्ये ज्या चिनी कंपन्या आहेत त्या डीलीस्ट होतील अशी बातमी होती. ११००० ते ११३७५ या मध्ये एक रन अवे गॅप होती ती भरली.

सरकार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक गॅसचे भाव जाहीर करते. आंतरराष्ट्रीय बाजारात चाललेल्या नैसर्गिक गॅसच्या प्राईसबरोबर पॅरिटी साधण्याचा प्रयत्न असतो. याला अडमिनिस्टर्ड प्राईस असे म्हणतात. सरकारने नैसर्गिक गॅसच्या किमतीमध्ये ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या सहा महिन्यांसाठी १२.५% कपात जाहीर केली. सरकारने ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या सहा महिन्यांसाठी नैसर्गिक गॅसची नियमित किंमत US $३.२३ प्रती मिलियन मेट्रिक ठरवली आहे . एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ मध्ये ही किंमत US $ ३.६९ प्रती MM होती डीप वॉटर मधून काढलेल्या गॅसची किंमत US $ ९.३२ प्रती MM होती ती आता US $ ८.४३ प्रती MM केली. सध्या तरी ONGC ही एकच कंपनी डीप सी मधून गॅस एक्स्ट्रॅक्ट करत आहे. पण KG D -६ या फिल्डमधून रिलायन्स इंडस्ट्रीज डीप सी गॅस उत्पादन पुढील वर्षांपासून सुरु करेल. तरी याचा प्रतिकूल परिणाम ONGC, ऑइल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांता यांच्यावर होईल. या निर्णयाचा अनुकूल परिणाम गॅस बेस्ड पॉवर प्लांट , गॅस बेस्ड फर्टिलायझर कंपन्या आणि टाईल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.उदा. NFL, मंगलोर केमिकल्स, मद्रास फर्टिलायझर्स, दीपक नायट्रेट, RCF, SPIC, कजरिया सिरॅमिक्स, मुरुडेश्वर सिरॅमिक्स, सोमाणी, नीटको टाईल्स, ओरिएंट बेल, एशियन ग्रॅनाईट, एवरेस्ट कांटो.

सणासुदीचे दिवस आल्यामुळे वर्तमानपत्रातील जाहिराती वाढल्या आहेत. वर्तमानपत्राच्या किमती वाढल्या आहेत. याचा फायदा हिंदुस्थान मेडिया व्हेंचर्स, HT मेडिया, DB कॉर्प या कंपन्यांना होईल. न्यूजप्रिंट पेपर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल.उदा. TNPL

अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देत आहेत. याचाही फायदा प्रिंट मीडियाला होईल.

सरकार ५ कंपन्यात डायव्हेस्टमेन्ट करेल. BPCL आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील १००% हिस्सेदारी, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील ३०% हिस्सेदारी, निपको, आणि THDC यातील स्टेक सरकार विकणार आहे. त्यामुळे BPCL, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि कॉनकॉर या शेअर्समध्ये तेजी होती.

परदेशातील विंटर व्हेकेशन, सणवार, आणि हॉटेल रेन्ट वर कमी केलेल्या GST दराचा फायदा रॉयल ऑर्चिड्स, ताज GVK यासारख्या मध्यम दराच्या हॉटेल कंपन्यांना होईल.

विमानात भरल्या जाणार्या इंधनाच्या किमती वाढल्या.

इंडिया बुल्सनी केलेल्या व्हिसलब्लोअर फोरमविरुद्ध केलेल्या खोट्या साक्षीशी संबंधित अर्जाची सुनावणी दिल्ली हायकोर्टाने २४ ऑक्टोबर २०१९ या तारखेला ठेवली आहे.

आज इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये खूप वोलटालिटी होती. शेवटच्या तासात या शेअरमध्ये चांगली तेजी आली. त्याचबरोबर या कंपनीला कर्ज दिलेल्या बँकांच्या शेअर्स मध्ये मंदी आली. आज येस बँकेचा शेअर खूपच पडला या शेअरचे मार्केट कॅपिटलायझेशन Rs १०,०० कोटींपेक्षा कमी झाले.

नाटको फार्माच्या मेकागुडा युनिटच्या ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०१९ या कालावधीत USFDAने केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

ऑटो सेक्टरचे नष्टचर्य संपण्याचे नाव काढत नाही. आज सप्टेंबर २०१९ महिन्यासाठी ऑटो विक्रीचे आकडे जाहीर झाले . एकदोन अपवाद वगळता सर्व ऑटो उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये घट झाली. मारुतीची विक्री २४.४% (YOY) तर बजाज ऑटोची २०%(YOY) , अशोक लेलँडची ५५% (YOY) SML इसुझूची ३९.४५%(YOY) , महिंद्रा & महिंद्राची २१% (YOY) आयशर मोटर्सची ट्रक आणि बसची ४४.२% विक्री घटली. या उलट अतुल ऑटो आणि एस्कॉर्टसच्या विक्रीत किरकोळ वाढ झाली. यामुळे ऑटो क्षेत्रातले शेअर्स मंदीत राहिले.

आज दिवसभर सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका आणि खाजगी बँका यांच्या शेअर्समध्ये (RBL बँक, येस बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक) विक्री झाली. पण शेवटच्या तासाभरात काही बँकाच्या शेअर्स मध्ये नगण्य वाढ झाली.

सरकार आता कॉर्पोरेट टॅक्स पाठोपाठ आयकरातही कपात करण्यावर विचार करत आहे. Rs ५ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त असेल. Rs ५ लाख ते Rs १० लाखापर्यंत १०% तर Rs १० लाखापासून Rs २० लाखापर्यंत २०% तर Rs २० लाखापासून Rs २ कोटी उत्पन्नावर ३०% आयकर लावला जावा या टास्क फोर्सच्या शिफारशींवर अर्थमंत्रालयामध्ये विचारमंथन चालू आहे. सरकारला रेव्हेन्यूचा कमीतकमी लॉस व्हावा या पद्धतीने आयकरामध्ये सवलत देण्याचा सरकार विचार करत आहे.

आज IRCTC च्या IPO चा दुसरा दिवस. आज IPO २ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३०५ NSE निर्देशांक निफ्टी ११३५९ बँक निफ्टी २८७२५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.