आजचं मार्केट – ३ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५७.३४ प्रती बॅरल ते US $ ५७.७८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९३ ते US $ ७१.२९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.०१ आणि VIX १७.५१ होते. यावर्षी जवळजवळ सर्व राज्यात पूर आल्यामुळे कोल इंडियाच्या काही खाणी पाण्याखाली गेल्यामुळे कोळशाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे कोल इंडियाचा शेअर पडला.
आज BPCL आणि येस बँक यांचे शेअर्स चर्चेत होते.

सरकार आता BPCLचे आधी तीन डिव्हिजनमध्ये विभाजन करेल. नंतर ही प्रत्येक डिव्हिजन वेगवेगळी विकेल. सरकार BPCL चे विभाजन E & P , रिटेल, आणि EPC या तीन विभागात करेल. रिटेल बिझिनेसमध्ये BPCLचे देशभरात १४८०२ पेट्रोल पंप आहेत. हे पंप मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचे व्हॅल्युएशन चांगले होईल. BPCL मधील सरकारी स्टेक जर खाजगी कंपनीला विकला तर BPCL चे रेटिंग कमी होईल पण जर PSU विकला तर रेटिंग कायम राहील असे रेटिंग एजन्सीचे मत आहे

येस बँकेचा शेअर दिवसेंदिवस लोअर लो गाठत होता. प्रमोटर्स आणि स्टाफने शेअर विकल्यामुळे आणि ज्या कर्जदारांकडे बँकेचे शेअर्स तारण म्हणून ठेवले होते त्यांनीही ते शेअर्स विकल्यामुळे बँकेच्या शेअरवर सेलिंग प्रेशर आले. या दोन्ही कारणांमुळे राणा कपूर फॅमिलीकडेही येस बँकेमधील स्टेक १ % पेक्षा कमी झाला. बॅंकेशी बरेच वर्ष सलंग्न असलेले रजत मोन्गा यांनी राजीनामा दिला. आज सकाळी येस बँकेचे CEO रावनीत गिल यांनी इन्व्हेस्टर आणि शेअरहोल्डर्स यांच्याशी कॉनकॉल दवारा संपर्क साधला. त्यांनी बँक आपला होलसेल बँकिंग मधील सहभाग दर तिमाहीला कमी करत आहे. बँकेमध्ये बचत आणि लहान आणि मध्यम मुदत ठेवींचे अकौंट उघडले जात आहेत.. ट्रॅन्झॅक्शन बिझिनेस आणि सरकारी बिझिनेस यात वाढ होत आहे. बँकेचा CASA रेशियो वाढून ३०.८ झाला आहे. गेल्या काही दिवसात फेस्टिव्ह सिझन सुरु झाल्यामुळे बँकेच्या ऑन लाईन सर्व्हिसेस वर १० पट ताण आला. त्यामुळे काही कॅस्टमर्सना ऑन लाईन व्यवहार करताना अडचण आली. पण काल आणि आज सकाळी परिस्थिती खूपच सुधारली आहे. बँकेच्या शेअरची बुकव्हॅल्यू Rs १०२ आहे. त्यांनी असेही सांगितली की बँकेला मर्ज होण्यात स्वारस्य नाही कारण आमची बँक एक मजबूत आणि लिक्विड बँक आहे. येस बँकेने NCD वरील व्याज चुकते केले. या त्यांच्या संवादानंतर बँकेचा शेअर Rs ४२ पर्यंत वाढला.

NSE वरून खालील नऊ कंपन्यांच्या शेअर्सचे १७ ऑक्टोबर २०१९ पासून डीलीस्टिंग होईल. लँको इंफ्राटेक, मोसेर-BAER , अमर रेमिडीज, सुप्रीम टेक्समार्ट, SAMTEL कलर, हिंदुस्थान डॉरऑलिव्हर, सर्वलक्ष्मी पेपर, LML आणि हनून्ग टॉईज अँड टेक्सटाईल्स.

टाटा मोटर्स मार्च २०२० पर्यंत NEXON हा इलेक्ट्रिक व्हेइकलचा ब्रँड Rs १३००००० ते Rs १५००००० पर्यंत किमतीला बाजारात आणेल.

IRCTC चा IPO ११२ वेळा भरला.

भारत ETF चा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला. या ETF मधून सरकार Rs ८००० कोटी उभारेल. यात L & T, SBI, ऍक्सिस बँक NTPC, पॉवर ग्रीड, कोल इंडिया गेल, नाल्को यासारख्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत.

M &M आणि फोर्ड कंपनी जॉईंट व्हेंचर करणार आहेत.

सरकार BSNL आणि MTNL पुनर्जीवित करण्यासाठी Rs ७०००० कोटींचे पॅकेज देणार आहे. त्यापैकी Rs १३००० कोटी एरिअर्ससाठी, एक्सग्रेशियासाठी Rs १७००० कोटी आणि ४G स्पेक्ट्रमसाठी Rs ३८०० कोटी देईल. ह्यातील काही रक्कम या दोन कंपन्यांची जमीन, टॉवर्स विकून जमा केली जाईल. MTNL आणि BSNL Rs १२००० कोटींचे बॉण्ड इशू करतील.
उद्या RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल. यामध्ये बँक २५ बेसिस पाईंट ते ४० बेसिस पाईंट रेट कट करेल अशी अपेक्षा आहे. आता बँकांचे कर्जावरील व्याजाचे दर रेपोरेटशी संलग्न केल्यामुळे सर्व बँकांच्या कर्जावरील व्याजाच्या दरात RBI जेवढी कपात करेल तेव्हढी कपात होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८१०६ NSE निर्देशांक निफ्टी ११३१४ बँक निफ्टी २८४१४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.