आजचं मार्केट – ४ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ४ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५७.८१ प्रती बॅरल ते US $ ५८.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८१ ते US $ १= Rs ७०.९८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५० तर VIX १७.४८ होता.

आज RBI ने आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. RBI ने रेपो रेट ० .२५% ने कमी केला. आता रेपो रेट ५.१५% झाला. रिव्हर्स रेपो रेट ४.९०% झाला. MSF आणि बँक रेट ५.४०% झाला. RBI नी CRR ४% वर कायम ठेवला. RBI ने आपला अकोमोडेटिव्ह स्टान्स कायम ठेवला आणि ग्रोथ रेट वाढेपर्यंत आवश्यक ती कारवाई ( यात रेटकटहि आला) करत राहू असे जाहीर केले.

RBI ने वित्तीय वर्ष २०१९-२०२० साठी GDP ग्रोथ रेटचा आपला अंदाज ६.९% वरून ६.१% केला. तसेच २०१९-२०२०या वर्षाच्या दुसर्या तिमाहीसाठी GDP ग्रोथ रेटचा अंदाज ५.३% जाहीर केला..वित्तीय वर्ष २०१९-२०२० च्या दुसऱ्या सहामाहीसाठी GDP च्या ग्रोथ रेटचे अनुमान ६.६% ते ७.२% या दरम्यान ठेवले. वित्तीय वर्ष २०२१ साठी GDP च्या ग्रोथ रेटचे अनुमान ७% ठेवले. FY २०२० मध्ये महागाई ४% पेक्षा कमी राहील असे सांगितले. १ ऑक्टोबर २०१९ रोजी विदेशी मुद्रा भांडार US $ ४३४६० कोटी होते. आता NEFT कामाच्या दिवशी २४ तास उपलब्ध असेल. ओपन मार्केट ऑपरेशनचा आपण जरूर भासेल त्या योग्यवेळी वापर करू असे सांगितले.

RBIने NBFC MICRO फायनान्स कंपन्यांसाठी कर्ज देण्यासाठी मर्यादा ग्रामीण भागात Rs १००००० वरून Rs १२५००० तर शहरी आणि अर्धशहरी भागात ही मर्यादा Rs १६०००० वरून Rs २००००० केली. . या बदलाचा फायदा भारत फायनान्सियल, बंधन बँक, उज्जीवन, इक्विटास, सॅटिन क्रेडिट, स्पंदन स्फूर्ती, क्रेडिट एक्सेस ग्रामीण, या कंपन्यांना होईल. या बदलामुळे ग्रामीण भागातील जनतेला जास्त लिक्विडीटी उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा मागणी वाढण्यात होईल असा विचार या पाठीमागे आहे. RBI ने सांगितले की प्रत्येक राज्यात एक डिजिटल जिल्हा बनवण्याचे RBI चे लक्ष आहे.RBI च्या MPC ( मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ची पुढील मीटिंग ३ डिसेंबर २०१९ ते ५ डिसेंबर २०१९ या दरम्यान होईल. RBI ने अर्थव्यस्थेमध्ये लिक्विडीटी पुरेशी आहे असे सांगितले. तसेच भारतातील बॅंक नेटवर्क मजबूत आहे आणि एखाददुसऱ्या अपवादामुळे लोकांनी आपला बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास ढळू देऊ नये असेही सांगितले.

लक्ष्मी विलास बँक आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स यांच्या मर्जरसंबंधात अजून निर्णय झाला नाही असे सांगितले.
टाटा मोटर्सने TIAGO WIZZ ची लिमिटेड व्हर्शन लाँच केली.

फोर्स मोटार या कंपनीची विक्री ३.१% ने वाढून १८७५ युनिट्स झाली. सप्टेंबर महिन्याचे उत्पादन मात्र २१% ने कमी म्हणजे १८८२ युनिट्स झाले.

मार्केटने RBI च्या रेटकटला थंडा प्रतिसाद दिला. मार्केटला ०.४०% रेटकट अपेक्षित होता. बँकांच्या शेअर्समध्ये मंदी आली आणि त्यामुळेच एकंदर मार्केटमध्ये मंदी आली. अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट मंदावत आहे या अंदाजाला RBI सारख्या तज्ज्ञ संस्थेकडून पुष्टी मिळाल्यामुळे मार्केटचा आत्मविश्वास कमी झाला.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय आणि झालेली कारवाई निवडणुकीची आचारसंहितेची मुदत चालू असल्यामुळे जाहीर होऊ शकणार नाहीत यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६७३ NSE निर्देशांक निफ्टी १११७४ बँक निफ्टी २७७३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.