आजचं मार्केट – ७ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ७ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५८.२० प्रती बॅरल ते US $ ५८.९९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९५ ते US $१=Rs ७१.०३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४८ होते. VIX १७.८३ होते.

आपल्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना आणि हितचिंतकांना दसऱ्याच्या शुभेच्छा.

आज सतत सहाव्या दिवशी मार्केटमध्ये मंदी होती. चीन आणि USA यांच्यात ट्रेड वाटाघाटी १० ऑक्टोबर २०१९ रोजी सुरु होतील. ट्रम्प यांच्या इम्पीचमेंटची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. UK मधले आणि युरोपिअन युनियनमधील वातावरण ब्रेक्झिटमुळे त्यांच्यातील संबंध ताणले जात आहेत. जगभर मंदीच्या भीतीने सर्व देशातील सेंट्रल बँका रेट कट आणि वित्तीय धोरणाच्या सर्व उपायांचा अवलंब करत आहेत.

रिलायन्स निप्पोन लाईफचे नाव आता NIPPON लाईफ म्युच्युअल फंड असे बदलले.

ग्लेनमार्क फार्माच्या बद्दी युनिटला USFDA ने वॉर्निंग लेटर इशू केले.

BLISS GV फार्माच्या अंबरनाथ युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

ऑरोबिंदो फार्माच्या युनिट-७ च्या तपासणीत USFDA ने ७ त्रुटी दाखवल्या

जनरेशन कंपन्यांचे DISCOM कडून Rs ५९००० कोटींचे येणे आहे. सरकार DISCOM कंपन्यांबरोबर जनरेशन कंपन्यांचे येणे परत करण्यासाठी योजना बनवत आहे.

सरकार ओरिएंटल इन्शुअरन्स, युनायटेड जनरल इन्शुअरन्स, नॅशनल इन्शुअरन्स या तीन जनरल इन्शुअरन्स कंपन्यांचे मर्जर करणार आहे. आणि रेग्युलेटरी नियम पुरे करण्यासाठी या कंपन्यांना सरकार Rs १२५०० कोटी देईल.
सरकार गोल्ड बॉण्डचा इशू पुन्हा आणत आहे. याची किंमत Rs ३७८८ ठेवली आहे. या बॉण्डचे पेमेंट ऑनलाईन केले तर Rs ५० डिस्काउंट ठेवला आहे.

अशोक लेलँड ऑक्टोबर २०१९ मध्ये मागणी नसल्यामुळे १५ दिवस आपले प्लांट बंद ठेवणार आहे.

BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३७५३१ NSE निर्देशांक निफ्टी १११२६ बँक निफ्टी २७७६८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.