आजचं मार्केट – १४ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५९.४७ प्रती बॅरल ते US $ ६०.२२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८५ ते US $१=Rs ७१.१५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३१ होता. VIX १७.२८ होता.

आज USA आणि चीन यांच्यातील छोट्या डील नंतर जगातील सर्व मार्केट्मधे तेजी आली पण ही तेजी फार काळ टिकेल असे वाटत नाही.

आज I आणि T या दोन अक्षरांचा दिवस होता. या भोवतीच मार्केट फिरले. IRCTC चे NSE वर Rs ६२५ वर तर BSE वर Rs ६४४ वर विक्रमी लिस्टिंग झाले आणि नंतर तो Rs ७२५ पर्यंत वाढला कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमचा नजीकच्या भविष्यकाळात FPO आणण्याचा विचार नाही .या शेअरच्या लिस्टिंग नंतर रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये तेजी आली. IRCTC मध्ये सरकारचा स्टेक ८७% आहे ह्या IPO मध्ये सरकारने आपला १३% स्टेक विकला. काही दिवसांनी या शेअरचा समावेश भारत ETF मध्ये होण्याची शक्यता आहे. या कंपनीचा IPO १८ च्या PE मल्टिपलवर आला होता. पहिल्याच दिवशी या शेअरची किंमत ३७ PE मल्टिपलवर गेली. ज्या भाग्यवान अर्जदारांना शेअर अलॉट झाले त्यांच्याकडे १५ दिवस आधीच दिवाळी अवतरली.

इन्फोसिसचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले. त्यांनी Rs ८ अंतरीम लाभांश जाहीर केला. चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वॉर आता समजुतीच्या आणि परस्पर देवाणघेवाणीच्या पातळीवर आले.चीनने आपण USA मधून ऍग्री कमोडिटीजची आयात वाढवू असे सांगितले.तसेच वारंवार युआनचे डेप्रीसिएशन करणार नाही असे आश्वासन दिले. USA ने असे सांगितले की नजीकच्या भविष्यात आम्ही वारंवार टॅरीफ वाढवणार नाही. त्यामुळे मेटल्स संबंधित शेअर्समध्ये आणी टाटा मोटर्सच्या शेअर मध्ये वाढ झाली. या तीन घटनांभोवतीच मार्केट फिरले. शुक्रवारी FII नी Rs ७५० कोटींची खरेदी केली यामध्ये इन्फोसिस आणि बंधन बँक यांचा समावेश होता.

इन्फोसिसचा निकाल बारकाईने पाहिल्यास असे आढळते की त्यांनी गायडन्सचा लोअर बँड वाढवला आहे पण अपर बँड मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे इन्फोसिसचा शेअर खाली आला. अडाणी गॅस आणि फ्रेंच कंपनी ‘TOTAL’ यांच्यात करार झाला. ‘TOTAL’ कंपनी अडाणी गॅसमध्ये Rs ४१५० कोटींची गुंतवणूक करेल. ही कंपनी Rs १४९.६३ प्रती शेअर या भावाने ३७.४% स्टेक घेईल. ही ऑफर Rs १३ प्रीमियमने होईल. या डील नंतर अडाणीचा स्टेक ३७% होईल. या व्यवस्थेनंतर अडाणी गॅस फ्युएल रिटेलिंगमध्ये प्रवेश करेल आणि आणि येत्या १० वर्षात CNG ची १५०० फ्यूएलिंग स्टेशन्स लावेल. या घोषणेनंतर अडाणी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये तेजी आली.

बँक ऑफ बरोडा चे CEO जयकुमार यांना सरकारने मुदतवाढ दिली नाही.

आज DLF ने ‘ THE ULTIMA PHASE २’ या लाँचमध्ये एका दिवसात ३७६ फ्लॅट विकून Rs ७७० कोटी गोळा केले. महाग फ्लॅट्सचे प्रोजेक्टमधील फ्लॅट्स विकले जातात. पण अफोर्डेबल हाऊसिंगचे प्रोजेक्ट लवकर भरत नाहीत. कारण गृहकर्जावरील व्याज कमी होत असले तरी बँकांच्या विविध अटींमध्ये सामान्य माणूस कर्जासाठी पात्र होणे कठीण होत आहे. कर्ज मिळण्यासाठी पात्र होण्यासाठी ज्या अटी बँका घालत आहेत त्यांच्यामध्ये काही सौम्यपणा आला तरच हे शक्य होईल.

‘UPL’ विरुद्ध चालू असलेल्या एका केसचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेल्यामुळे ‘UPL’ चा शेअर पडला. UPL ची बॅलन्स शीट खूपच ताणली गेली आहे. ‘ग्लोबल स्लो डाऊन’ आहे त्यामुळे या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले

ICICI प्रुचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे चांगले आले. नवा बिझिनेस वाढला. SBI लाईफचे आकडेही चांगले आले. HDFC लाईफचे प्रीमियम उत्पन्न कमी झाले.

माइक्रो फायनान्स इंडस्ट्रीमध्ये स्पंदन स्फूर्तीचा बिझिनेस चांगला आहे. पण शेअरची किंमत खुपच वाढली आहे. जुन्या क्लायंट्सना जास्त कर्ज देत आहेत.

NCLAT ने PMLA खाली ED नी भूषण पॉवरची जप्त केलेली मालमत्ता सोडून द्यायला सांगितली. NCLT मध्ये केस चालू असेपर्यंत ED ला मालमत्ता जप्त करता येणार नाही असा निकाल दिला.

आज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक झाली. बँकांनी वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेल्या शामियाना बँकिंगमार्फत Rs ८१७०० कोटींची कर्ज दिली. ह्या कर्जामुळे बँकांची स्थिती काही काळानंतर बिघडेल या भीतीमुळे आज बँकांचे विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे शेअर पडले.
मोठ्या कंपन्यांकडून MSME ना Rs ४०००० कोटींचे येणे आहे. या येण्यासाठी बँकांनी MSME ना बिल पर्चेस/बिल डिस्काउंटिंग फॅसिलिटी देऊ करावी अशी सूचना अर्थमंत्र्यांनी या बँकांना केली. MSME च्या प्रतिसादाबद्दल बँकांनी अर्थमंत्रालयाला २२ ऑक्टोबर २०१९ पर्यंत फीडबॅक द्यावयाचा आहे.

NBFC ने दिलेली कर्ज या बँकांनी खरेदी करण्यासाठी NBFC आणि NBFC ने दिलेली कर्ज दोन्हीसाठी चांगले रेटिंग आवश्यक आहे. बँकांनी सुचवल्याप्रमाणे जरी NBFCचे रेटिंग लोअर असले तरी जर त्यांनी दिलेल्या कर्जाचे रेटिंग चांगले असले तर बँका ही कर्जे खरेदी करू शकतील. यामुळे कमी रेटिंग असणाऱ्या NBFC चा लिक्विडीटीचा प्रश्न काहीसा सोपा होईल.

मूडीजने इंडिया बुल्स हाऊसिंगचे रेटिंग Ba२ वरून B २ केले आणि आऊटलुक निगेटिव्ह केला.

आज सप्टेंबर २०१९ च्या CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ३.२१% ( ऑगस्ट मधील) वरून ३.९९% झाले.

सप्टेंबर २०१९ साठी WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) ०.३३% ( ऑगस्टमध्ये (१.०८%) होते. यामध्ये अन्नधान्य, भाज्या डाळी यांचे WPI वाढले.

BPCL मध्ये स्टेक विकत घेण्यासाठी ब्रिटिश पेट्रोलियम आणि आरामको यांनी ड्यू डिलिजन्स सुरु केला.

आज मार्केट बंद झाल्यावर HUL चे तिमाही निकाल आले. त्यांचे उत्पन्न Rs ९८५२ कोटी EBITDA Rs २४४३ कोटी, प्रॉफिट Rs १८४८ कोटी, मार्जिन २४.८% होते. कंपनीने Rs ११ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला. डोमेस्टिक व्हॉल्युम ग्रोथ ५% (YOY) तर डोमेस्टिक कन्झ्युमर ग्रोथ ७% (YOY) होती. हे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले.
ONGC ला HPCL मधील स्टेक विकायला पेट्रोलियम मंत्रालयाने मंजुरी दिली. हा ५१.११% स्टेक ONGC ने Rs ३६९१५ कोटींना विकत घेतला होता. हा व्यवहार महाग पडला तसेच ONGC साठी फायदेशीर नाही असे ONGC ला आढळून आले.

ACC, कर्नाटक बँक, SBI लाईफ ,MCX आणि विप्रो या कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल १५ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२१४ NSE निर्देशांक निफ्टी ११३४१ बँक निफ्टी २८१८१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.