आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५८.२८ प्रति बॅरल ते US $ ५९.१३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२४ ते US $१= Rs ७१.४६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४१ तर VIX १७.१० होते.

आधी बातमी होती की चीन ट्रेंड अग्रीमेइन्टवर सह्या करण्याआधी अजून एका बैठकीची मागणी करत होता. त्यामुळे मार्केटमध्ये थोडीफार तेजी होती. पण दुपारी बातमी आली की USA आणि चीन यांच्यातील ट्रेड अग्रीमेंट फेज I वर सह्या झाल्या. चींनने आपण या करारावर सह्या केल्या याची पुष्टी केली. या बातमीमुळे सर्व मेटलसंबंधीत शेअर्समध्ये तेजी आली. आणि एकंदरच सर्व जगातील मार्केटमधील गुंतवणूकदारांनी आणि ट्रेडर्सनी सुस्कारा सोडला.

सरकार ITDC च्या हॉटेल अशोक( या हॉटेलमध्ये ५५० रूम्स, ४ कॉन्फरन्स हॉल आणि २५ एकर जागेवर हे हॉटेल आहे.) आणि हॉटेल सम्राट यांचे मॉनेटायझेशन करणार आहे. ही दोन्ही हॉटेल्स दीर्घ मुदतीच्या लीजवर द्यावीत की आऊटराईट विकून टाकावीत यासाठी सरकारने सल्लागार नेमला आहे. आता सणासुदीचा काळ असल्यामुळे टुरिझम उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये तेजी आली. उदा. कामत हॉटेल्स, ताज GVK, रॉयल ऑर्चिड, EIH, लेमन ट्री हॉटेल्स, ITDC हे शेअर्स तेजीत होते.

सरकारने २०२३ पर्यंत रेल्वेजच्या १००% विद्युतीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे.

थंगमाईल ज्वेलरीया कंपनीच्या सिल्वर ज्वेलरीची विक्री चांगली असते.

इंडिया बुल्स हाऊसिंग शेअर बायबॅक करण्यासाठी सेबीची मंजुरी घेणार आहे.

लिस्टिंग नॉर्म्स पुरे केले नाहीत यासाठी ४ नोव्हेंबर २०१९ पासून १६ कंपन्यांचे BSE वर ट्रेडिंग सस्पेंड केले जाईल. अपूर्ण नॉर्म्स पुरे करण्यासाठी BSE ने या कंपन्यांना ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदत दिली आहे.८K माईल्स, डॉल्फिन ऑफशोअर, मनपसंद बिव्हरेजीस, बिनानी, सुप्रीम इन्फ्रा, DION ग्लोबल, ऍटलास सायकल्स, मयूर लेदर, राठी ग्राफिक्स या यापैकी काही कंपन्या आहेत.

ONGCने EXXON मोबाईलबरोबर KG बेसिन डीप वॉटर एक्स्प्लोरेशनसाठी करार केला.

SBI ने Rs ४६६ कोटींचे ११ NPA विकण्यासाठी बोली मागवल्या.

एअर इंडियानी दरमहा Rs १०० कोटींचे पेमेंट करण्याची अट पुरी केली नाही म्हणून IOC १८ ऑक्टोबर पासून एअर इंडियाला जेट फ्युएल पुरवणे बंद करणार आहे. IOC ला एअर इंडियाकडून Rs २७०० कोटी येणे आहे.

बर्गर पेंट्स STP लिमिटेड मध्ये ९५% स्टेक खरेदी करणार आहे.

येस बँकेने रेलिगेअरच्या एक्स्पोजरचे Rs ६५० कोटी फोर्टिजमधील ६.७७% शेअर विकून वसूल केले.

JSW स्टील या कंपनीच्या प्रमोटर्सनी Rs १२०० कोटींच्या कर्जाचे रिपेमेंट करून तारण म्हणून ठेवलेले ७ कोटी शेअर्स सोडवले.

बंधन बँक आणि गृह फायनान्स यांच्या मर्जरची १६ ऑक्टोबर २०१९ ही एक्स डेट आहे तर १७ ऑक्टोबर २९०१९ ही रेकॉर्ड डेट आहे. बंधन बँक १६ ऑक्टोबर २०१९ पासून MSCI ग्लोबल स्टॅंडर्ड लार्जकॅप निर्देशांकात समाविष्ट होईल. आज बंधन बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती. या मर्जरसाठी गृह फायनान्सच्या १००० शेअर्स साठी बंधन बँकेचे ५६८ शेअर्स दिले जातील. उद्यापासून गृह फायनान्समध्ये ट्रेडिंग बंद होईल.

आज डेल्टा कॉर्प या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. पण त्यांचे कॅसिनोमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले.
आज विप्रो या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. एकूण नफा Rs २२५० कोटी, IT सेक्टरचे उत्पन्न Rs १४६५६ कोटी, EBITD मार्जिन १८.१% होते. कंपनीने तिसऱ्या तिमाहीसाठी CC ( कॉन्स्टंट करन्सी गायडन्स) ०.८% ते २.८% दिला. निकाल समाधानकारक आहेत.

कर्नाटक बँकेने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. NII ( नेट इंटरेस्ट इन्कम) Rs १६३० कोटी होते. नेट प्रॉफिट Rs १०६ कोटी होते. ग्रॉस NPA किंचित वाढून ४.७८% आणि नेट NPA ३.३३% वरून ३.४८% झाले. निकाल समाधानकारक म्हणता येतील.

ACC या सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs २०९ कोटींवरून वाढून Rs ३०३ कोटी ( यात इतर उत्पन्न Rs ५० कोटी) झाले. उत्पन्न Rs ३८३३ कोटींवरून Rs ३५२८ कोटी झाले. ऑपरेटिंग मार्जिन १५.८% होते.

स्टार सिमेंट ही कंपनी २२ ऑक्टोबर २०१९ ते ५ नोव्हेंबर या काळात Rs १५० प्रती शेअर या भावाने शेअर्स बायबॅक करेल.
सप्टेंबर २०१९ महिन्यात भारताची निर्यात US $ २६०३ कोटी, आयात US $ ३६८९ कोटी झाली. ट्रेड डेफिसिट US $ १३४५ कोटींवरून US $ १०८६ कोटी झाली

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५०६ NSE निर्देशांक निफ्टी ११४२८ बँक निफ्टी २८५५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.