आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५८.६७ प्रती बॅरल ते US $ ५८.८३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.३८ ते US $ ७१.५९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२८ होते तर VIX १६.९२ होते.

आजपासुन UK आणि युरोपिअन युनियन यांच्या ब्रेक्झिटवर वाटाघाटी सुरु झाल्या. या वाटाघाटीतून काही निष्पन्न झाले नाहीतर UK EU मधून कोण्त्याही डील शिवाय ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एक्झिट करेल

बुधवार हा तेजीचा तिसरा दिवस होता. FII ची खरेदी सुरु आहे. काल पुट रायटिंग सुरु झालेली दिसते आहे. नवीन बेस निफ्टीचा ११३५० दिसतो आहे. निफ्टीची ११००० ते निफ्टी ११२५० ही रेंज आता मागे पडली आहे असे आज तरी दिसते.
बँक निफ्टीचा २८७८० वर १०० DMA आहे. लॉन्ग पोझिशनमधून बाहेर पडण्याऐवजी पूट राईट केले जात आहेत. याचाच अर्थ बेस तयार होत आहे. ज्या लोकांच्या डोक्यात मंदीने घर केले आहे त्यांनी सावध व्हावे. योग्य संधी मिळताच मंदीची पोझिशन क्लोज करावी . दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेच्या मानाने चांगले येत आहेत,. दिवाळीपर्यंत तरी तेजी राहील असे दिसते ‘बाय ऑन डिप्स’ मार्केट सुरु आहे. SBI लाईफचे निकाल चांगले आल्यामुळे आज इन्शुअरन्स सेक्टरमधील शेअर्समध्ये खरेदी झाली उदा HDFC लाईफ, ICICI प्रु, ICICI लोम्बार्ड, SBI लाईफ, GIC,

बजाज ऑटोने सप्टेंबर २०१९ पासून इलेक्ट्रिक व्हेईकलचे (स्कुटर्सचे) प्रॉडक्शन सुरु केले. बजाज ऑटोने ‘चेतक’ या नावाने पहिली इलेक्ट्रिक स्कुटर जानेवारी २०२० मध्ये लाँच करू. तसेच येत्या महिन्यात BSVI वाहने लाँच करु असे सांगितले. बजाज ऑटोने सांगितले की कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींमुळे कंपनीला Rs ४५० कोटी ते Rs ५०० कोटी फायदा झाला.
बजाज कन्झ्युमर या कंपनीच्या प्रमोटर्सनी आपला २२% स्टेक विकून तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले. हा स्टेक म्युच्युअल फंडांनी विकत घेतला. कंपनीच्या प्रमोटर्सने उचललेल्या या पावलाने कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

एक्झाईडने इलेक्ट्रिक रिक्षा ‘एक्झाईड NEO’ या नावाने लाँच केली.

ONGC विदेशला कोलंबिया आणि ब्राझीलमध्ये प्रत्येकी एक भरपूर क्रूडचा साठा असलेल्या विहिरी मिळाल्या .

MCX चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ज्यावेळी मार्केटमध्ये वोलटालीटी खूप असते आणि सोने आणि चांदी तेजीत असते तेव्हा MCX ला फायदा होतो. म्हणूनच MCX चे निकाल चांगले आले.

फेडरल बँकेचे NII, प्रॉफिट ( YOY) वाढले. त्याचबरोबर ग्रॉस NPA २.९९% वरून ३.०७% आणि नेट NPA १.४९% वरून १.५९% झाले. प्रोव्हिजन Rs २१२ कोटी तर नवीन स्लीपेजिस Rs ५४० कोटी होते. एकंदर निकाल ऍसेट गुणवत्तेच्या बाबतीत थोडा निराशाजनक असल्यामुळे निकालानंतर हा शेअर पडला.

मार्केट बंद झाल्यानंतर माइंडट्रीचे निकाल आले. L & T ने टेकओव्हर केल्यावर हे पहिलेच निकाल असल्यामुळे उत्सुकता होती. निकाल चांगले आले. नेट प्रॉफिट Rs १३५ कोटी, एकूण उत्पन्न Rs १९१४ कोटी, US $ उत्पन्न Rs २७.१कोटी, कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ ३.२% होती. कंपनीने Rs ३ अंतरिम लाभांश जाहीर केला. मार्जिन ९.३% होते. एकंदर निकाल चांगले म्हणता येतील.

GST कलेक्शन कमी झाल्यामुळे सरकार तंबाखू आणि त्यापासून तयार केले जाणारे पदार्थ तसेच कोळसा आणि त्यापासून उत्पन्न होणारी प्रॉडक्टस यावर GST लावायचा /वाढवायचा विचार करत आहे. येत्या GST कौन्सिलच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ITC, गॉडफ्रे फिलिप्स, VST इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्स मंदी आली/तेजीचा वेग कमी झाला.

PVR, झी एंटरटेनमेंट, TVS मोटर्स L & T इन्फोटेक या कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल उद्या जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५९८ NSE निर्देशांक निफ्टी ११४६४ बँक निफ्टी २८५३८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.