आजचं मार्केट – १७ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५८.९४ प्रती बॅरल ते US $ ५९.०६ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३९ ते US $१=Rs ७१.४६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७० आणि VIX १५.४९ वर होते.

आजची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे EU समिट मध्ये ब्रेक्झिट डील पूर्ण झाले. EU आणि UK चे पंतप्रधानांनी याची पुष्टी केली. शनिवार तारीख १९ ऑक्टोबर २०१९ रोजी ब्रिटिश संसदेच्या मंजुरीसाठी हे डील ठेवले जाईल. याचा परिणाम टाटा मोटर्स, टाटा स्टील, मास्टेक, मजेस्को या UK मध्ये बिझिनेस करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर होऊन या शेअरमध्ये तेजी आली.

आज USA मधील क्रूडचे भांडार १.०५ कोटी बॅरेलने वाढल्यामुळेआणि जागतिक मागणी कमी झाल्यामुळे क्रूडच्या भावात नरमी होती. बंधन बँकेच्या शेअरचा MSCI निर्देशांकातझालेल्या समावेशानंतर या शेअरमध्ये झालेली ब्लॉक डील्स आणि काल ICICI लोम्बार्ड मध्ये झालेली डील पाहता विदेशातून पैसा येत आहे असे जाणवते. त्यामुळे मार्केटमधील वातावरण सुधारते आहे. USA हा चीनच्या हाँगकाँग संबंधित विषयात लक्ष घालीत होते. चीनने USA ला बजावले की आमच्या भानगडीत पडू नका आम्ही बदला घेऊ. आता USA आणि चीन मधील बैठक चिली या देशात होईल. सध्या ट्रेड डील चे डॉक्युमेंटेशन चालू आहे असे समजते. USA सीरियातुन सैन्य परत घेण्यात व्यस्त आहे. आज बँक निफ्टी आणि निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होती. सतत येणाऱ्या तिमाही निकालांचाही मार्केट मधील वातावरणावर परिणाम होत होता.
मार्केटमधील शॉर्ट कव्हरिंग रॅली कधीही टिकाऊ नसते. शॉर्ट टर्म चांगला असेल, पण मिडीयम टर्म चार्ट कमजोरी दाखवत असेल, मार्केट व्होलटाइल असेल तेव्हा असे शेअर्स अव्हॉइड करावेत.

सरकारचा भेल या हेवी इलेक्ट्रिकल क्षेत्रात असणाऱ्या कंपनीत ६३.१८% स्टेक आहे हा स्टेक २६% वर आणण्याचा सरकार विचार करत आहे.येत्या वर्षभरात या कंपनीची नॉनकोअर युनिट्स खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना विकली जातील. ही कंपनी पॉवर प्लांट बनवते. या कंपनीच्या शेअरमध्ये मार्केट बंद झाल्यावर क्लोजिंग भावात तेजी आली कारण ही बातमी मार्केट बंद झाल्यावर आली. उद्या या शेअरकडे लक्ष द्यावे.

‘कोरा’ हा फंड एडलवाईजमध्ये १०% स्टेक खरेदी करणार आहे. साधारण Rs ५०० कोटी ते Rs ५५० कोटी कंपनीला मिळतील.

नाल्को या कंपनीला कोळशाची खूप अडचण जाणवत आहे. कोळसा सहजगत्या उपलब्ध होत नाही. अल्युमिनियमसाठी मागणी कमी झाली आहे. असे अल्कोवाने सांगितले स्मेल्टर प्लांट मध्ये अल्युमिनियम रिफाईन केले जाते. यासाठी कोळसा लागतो. या स्मेल्टर प्लांट मधील ८० युनिट आणी कॅप्टिव्ह प्लांट मधील ३ युनिट बंद करावी लागली आहेत.

टाटा कम्युनिकेशनने आज RAH इंफ्राटेक बरोबर क्लाउड सोल्युशन्ससाठी करार केला.

सरकार मेगा रिन्यूएबल पार्क बनवत आहे. पॉवर क्षेत्रातील १० कंपन्या या प्रोजेक्ट मध्ये भाग घेणार आहेत. त्यात NTPC, NHPC,, पॉवर ग्रीड यांचा समावेश आहे. यापैकी ६ कंपन्यांनी जमीन अकवायर केली आहे. या मेगा पार्कची क्षमता २०००० MW असेल. आता यासाठी खाजगी कंपन्या बिडिंग करतील. पहिल्या फेरीत ४००० MW च्या प्रोजेक्टसाठी ब्रीडिंग तीन महिन्यात पुरी होईल.

सरकारने प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक अड्वायजरी कौन्सिलमध्ये नीलकंठ मिश्रा, नीलेश शहा, आणि V अनंत नागेश्वरन यांचा समावेश केला.

PVR या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफिट,उत्पन्न , मार्जिन यांच्यात चांगली वाढ झाली.

TVS मोटर्सचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

झी एंटरटेनमेंटच्या प्रॉफिटमध्ये ७ % वाढ झाली.

फोर्स मोटर्स, मास्टेक या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

सुनील मित्तल आणि सुनील मुंजाल यांनी येस बँकेत स्टेक घेण्यात स्वारस्य दाखवले अशी बातमी आल्यामुळे येस बँकेचा शेअर वाढला.

इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सच्या रेटिंग मध्ये क्रिसिलने कोणताही बदल केला नाही म्हणून इंडिया बुल्स HSG चा शेअर वाढला.

एशियन पेंट्स हा शेअर Rs १८०० च्या भावावर चालू आहे. आणि बर्जर पेन्ट्सचा भाव Rs ४७१ वर चालू आहे. पण विश्लेषकांच्या मते एशियन पेन्ट्सचा शेअर बर्जर पेन्ट्सच्या शेअरपेक्षा स्वस्त आहे. शेअर मार्केटमध्ये शेअर स्वस्त आहे की महाग हे फायनान्सियल रेशियोवरून ठरते. बर्जर पेंट्सचा भाव Rs ४७१ धरला तर हा शेअर ८४ च्या P /E वर चालला आहे. EPS ५.६ आहे P /B २० आहे P /C ७८ आहे. एशियन पेंट्सचा भाव Rs १८०० धरला तर हा शेअर ८० च्या P /E वर चालला आहे EPS Rs २२ .५० आहे P /B १६ आहे P/C ६० आहे. म्हणून एशियन पेंट्स हा शेअर बर्जर पेंटच्या शेअर पेक्षा स्वस्त आहे.

आज ‘करवा चौथ’ असल्यामुळे भेटवस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

विकली चार्टवर इव्हनिंग स्टार पॅटर्न दिसतो आहे उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आणि ब्रेक्झिटच्या भवितव्याविषयी अनिश्चितता असल्यामुळे, गेले पाच सहा दिवस मार्केटमध्ये तेजी सुरु आहे , पुढचा आठवडा ट्रँकेटेड वीक असल्यामुळे ट्रेडर्स आपली पोझिशन ठेवणार नाहीत .११६०० ला रेझिस्टन्स आहे त्यामुळे उद्या मार्केटमध्ये सावधगिरीने निर्णय घ्या.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०५२ NSE निर्देशांक निफ्टी ११५८६ बँक निफ्टी २८९८९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.