आजचं मार्केट – १८ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५८.९० प्रती बॅरल ते US $ ५९.७० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०७ ते US $ १=७१.१६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६० तर VIX १५.५० होते.

USA ने US $ ७५०० कोटींच्या युरोपियन प्रॉडक्ट्सवर टॅरिफ लावली.

इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीने त्यांच्या नोव्हेम्बर २०१९ आणि डिसेंबर २०१९ मध्ये मॅच्युअर होणाऱ्या NCD चे मुदतपूर्व पेमेंट केले. म्हणून शेअरमध्ये तेजी आली.

सुंदरम क्लेटन या कंपनीचा फायदा वाढला पण उत्पन्न कमी झाले.

ल्युपिनच्या नागपूर प्लाण्टला USFDA ने ५ ऑगस्ट २०१९ ते ८ ऑगस्ट २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

FPI नी निफ्टी शॉर्ट क्लोज केले आणि कॅशमध्ये पोझिशन घेतली.

होल्डिंग कंपनीचे शेअर्स NAV च्या ३० पटीत चालतात. पण टाटा इन्व्हेस्टमेंटचा शेअर मात्र १३च्या पटीत चालत आहे. ब्रेक्झिटचा या शेअरवर अनुकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. रिलायन्सला दुसर्या तिमाहीत आतापर्यंतचे कमाल प्रॉफिट म्हणजे Rs ११२६२ कोटी प्रॉफिट झाले ही ११.४६% वाढ (Q O Q)आणि १८.३४% YOY वाढ झाली. . GRM US $ ९.४/bbl होते. जिओने २४ मिलियन सबस्क्राइबर्स वाढवले. RIL चे एकूण उत्पन्न Rs १४८५२६ कोटी झाले. रिलायन्स जिओ आता भारतातील सर्वात मोठी मोबिलिटी सर्व्हिस पुरवणारी कंपनी झाली. ARPU Rs १२० होते तर कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ३५.५० कोटी झाली. रिलायन्स रिटेल बिझिनेसमध्ये रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन यांच्यात वाढ झाली. जिओ फोन दिवाळी २०१९ प्लानला चांगला प्रतिसाद मिळाला.RIL चे ऑपरेटिंग मार्जिन १४.९१% राहिले. रीफाईनिंग आणि पेट्रोकेम बिझिनेस मध्ये चांगली ग्रोथ झाली. एकंदर पाहता कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल दिले. आज चांगल्या निकालांच्या अपेक्षेने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी आली.

पुढील आठवड्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्रात मतदान होत असल्यामुळे मार्केट बंद राहील. मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संप जाहीर केला.पुढील आठवड्यात १९ ऑक्टोबर २०१९ रोजी HDFC २१ ऑक्टोबर २०१९ रोजी भारती इन्फ्राटेक, अल्ट्राटेक सिमेंट,ऍक्सिस बँक २२ ऑक्टोबर २०१९ रोजी एशियन पेंट्स, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी ITC आणि मारुती, २५ ऑक्टोबर २०१९ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

ICICI लोम्बार्डचे आणि अंबुजा सिमेंटचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

महाराष्ट्र आणि हरयाणातील निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील. या निकालांचा परिणाम मार्केटवर नक्की होईल. २४ ऑक्टोबर रोजी F & O ची साप्ताहिक एक्स्पायरी असेल.

पुढचा आठवड्यात दिवाळी हा मोठा सण सुरु होत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आशादायी आणि काहीसे तेजीचे वातावरण आहे. महागाईच्या भावात शेअर्स खरेदीने केले तर ते आपल्याजवळ मार्केट पडायला सुरुवात होईतोपर्यंत ठेवू नका. जर तुम्हाला या आठवड्यात किमान भावात खरेदी आणि कमाल भावात विक्री हे तंत्र जमले तर फायदा होईल. पण जास्त भाव वाढतील म्हणून थांबलात तर दिवाळीनंतर फेस्टिव्ह वातावरण ओसरल्यावर मार्केट करेक्ट होण्याची शक्यता असते.
प्रत्येक शेअर खरेदी करताना त्याच्या विषयीच्या बातमीचे मर्म जाणून घ्या. तेवढा वेळ तुम्हाला शेअर ठेवता येणार असेल तर थांबा अन्यथा जेवढे प्रॉफिट मिळत असेल तेवढे प्रॉफिट घ्या. उदा सरकारच्या डायव्हेस्टमेन्टला कमीतकमी ( BPCL, BHEL,) ५ महिने लागतील असं सांगितले जाते.या पांच महिन्याच्या काळात ह्या शेअर्सची किंमत कमी होण्याची शक्यता असते. सरकार जेव्हा काही सवलती जाहीर करते त्यांचा फायदा कोणत्या क्षेत्राला आणि कोणत्या कंपन्यांना होईल हे समजावून घ्या. त्यामुळे सरकारी कंपन्यांचे शेअर खरेदी करताना आपण ते का खरेदी करतो आणि त्यातून आपण कधी विक्री करून बाहेर पडायचे ते ठरवा. त्याप्रमाणे निर्णयाची कारवाई करा.

योग्य वेळेला योग्य भावात खरेदी आणि योग्य भावात विक्री हा मंत्र लक्षात ठेवा. आणि पुढील आठवड्यात येणाऱ्या तेजीचा फायदा घ्या आणि आपली दिवाळी आनंदाची आणि संपन्नतेची करा.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९२९८ NSE निर्देशांक निफ्टी ११६६१ बँक निफ्टी २९१२० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.