आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५८.८६ प्रती बॅरल ते US $ ५९.२१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८५ ते US $१=Rs ७०.९७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३५ होते. VIX १५.८५ होते.

इन्फोसिसच्या CEO सलील पारेख आणि CFO नीलांजन रॉय यांनी UNETHICAL व्यवहार केले असा एका व्हिसलब्लोअरने आरोप केल्यामुळे इन्फोसिसचा शेअर १६.२१% पडला आणी Rs ७६७.७५ वरून Rs ६४३.३० ला बंद झाला. १२ एप्रिल २०१३ रोजी हा शेअर २१% पडला होता. कंपनीने ह्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यासाठी एका समितीची नेमणूक केली आहे. तसेच शार्दूल अमरचंद मंगलदास ही व्यक्ती स्वतंत्रपणे तपास करेल. असे नंदन निलेकणी यांनी सांगितले.

राणे ब्रेक्स, ग्रॅनुल्स इंडिया ( या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल खूप चांगला आला. उत्पन्न प्रॉफिट मार्जिन सर्व वाढले.), वेलस्पन इंडिया, ज्युबिलण्ट फूड्स, इंडिया बुल्स व्हेंचर, या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
GSK फार्माचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले पण वन टाइम प्रॉफिटचा मोठा वाटा होता

न्यू जेन सॉफ्टवेअर, रॅलीज या कंपन्यांचे निकाल ठीक आले.

सिएट, RBL बँक, यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

आज एक्सिस बँकेने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेने Rs ११२ कोटी तोटा दाखवला. टॅक्स खर्च वाढल्यामुळे ( Rs ३७७ कोटी वरून Rs २५४५ कोटी झाला) प्रॉफिट Rs २४३३ कोटी होऊनही बँकेला आफ्टर टॅक्स Rs ११२ कोटी तोटा दाखवावा लागला. NII Rs ६१०२ कोटी NIM (नेट इंटरेस्ट मार्जिन) ३.५१% होते. ग्रॉस NPA ५.०३% तर नेट NPA १.९९% पर्यंत कमी झाले. स्लीपेजिस वाढले तर प्रोव्हिजन कमी झाली. टॅक्स खर्च वगळता निकाल समाधानकारक म्हणता येतील.

कोटक महिंद्रा बँकेचे स्टॅण्ड अलोन प्रॉफिट Rs १७२५ कोटी NII Rs ३३५० कोटी होते. ग्रॉस NPA २.३२% तर नेट NPA ०.८५% होते. NIM ४.६१% होते. निकाल समाधानकारक होते.CASA रेशियो ५३.६% होते.

बजाज फायनान्सचे प्रॉफिट Rs १५०६ कोटी, NII Rs ३९९९ कोटी, ग्रॉस NPA १.६१% तर नेट NPA ०.६५% होते. AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) Rs १३५ लाख कोटी होते.

उद्या बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प, L & T, HCL TECH, JSW स्टील या कंपन्या आपले दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

सरकार NBFC चे पुल्ड ऍसेट सरकारी बँकांनी खरेदी करण्याचे नियम बदलण्याची शक्यता आहे. AA पेक्षा कमी रेटिंग असलेल्या NBFC चे चांगले रेटिंग असलेले ऍसेट आता सरकारी बँका खरेदी करू शकतील.

पॉवर निर्माण करणाऱ्या कंपन्यांना थर्मल प्लांटचे मॉडर्नायझेशन करण्यासाठी १० सरकारी बँका कर्ज देतील. पर्यावणाच्या नियमांच्या पूर्तीसाठी हे मॉडर्नायझेशन आवश्यक आहे. हे मॉडर्नायझेशन २०२२ पर्यंत पूर्ण करायचे आहे..कंपनीकडे (१) PPA (पॉवर परचेस ऍग्रीमेंट), (२) कोळशाचा आवश्यक पुरवठा पाहिजे आणि कंपनीचे खाते NPA असता कामा नये.
या नियमांचा फायदा अडानी पॉवर, JSPL, टाटा पॉवर, GMR इन्फ्रा या कंपन्यांना होईल.

HUL ने आपल्या काही ब्रॅण्डच्या किमती बदलल्या आहेत. फेअर आणि लव्हली क्रिमची किंमत १०% ने कमी केली आहे तर टी व्हेरिएन्टसची किंमत ४.४% ने वाढवली आहे.

ग्रासिम ही कंपनी जर्मन कंपनीबरोबर JV करून हलोल येथे प्लान्ट उभारणार आहे.

ONGC त्यांच्या नोव्हेंबरच्या मीटिंगमध्ये ‘ONGC विदेश’ या कंपनीचा IPO आणण्यावर विचार करेल.

MCX च्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आता १ ग्राम सोने खरेदी करू शकता. त्याची डिलिव्हरी घेऊन सेटलमेंट करता येईल.

कॉइन मेकिंग चार्ज Rs १०० असेल. हे कमोडिटी एक्स्चेंजवर करता येईल. त्यामुळे MCX च्या शेअरमध्ये तेजी आली.
बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट यांचे निकाल चांगले येऊनही व्हॉल्युम ग्रोथ कमी असल्यामुळे शेअर्स पडले. एशियन पेंट्स, इंडिगो, हे शेअर्सही खालीच होते .

ICICI प्रु, SBI लाईफ, सिमेन्स हे शेअर MSCI निर्देशांकात सामील होण्याची शक्यता आहे. ICICI बँकेचे वेटेज MSCI निर्देशांकात ५.७% होईल. इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स, आणि ग्लेनमार्क फार्मा MSCI निर्देशांकातून बाहेर पडतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९६३ NSE निर्देशांक निफ्टी ११५८८ बँक निफ्टी २९४११ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.