आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ५९.०९ प्रती बॅरल ते US $ ५९.५३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $ १= Rs ७१.०१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६१ तर VIX १६ होते.

ब्रेक्झिटचा प्रश्न कोणत्या पद्धतीने आणि कसा सुटेल हे आता ३१ऑक्टोबर २०१९ ला जेव्हा प्रत्यक्ष कृती होईल तेव्हाच कळेल असे म्हणावे लागेल. USA मध्ये क्रूडचे भांडार वाढल्यामुळे क्रूडच्या किमती एका विशिष्ट रेंज मध्ये राहिल्या.

दिवाळी आणि नवीन वर्ष ( दिवाळीच्या पाडव्यापासून सुरु होणारे) जवळ येत असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदीचे वातावरण आहे. त्यातून दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले येत आहेत. मार्केटमध्ये कंझम्पशन, चहा, साखर या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसत आहे. वेंकीज, ज्युबिलंट फूड्स, वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट, V २ रिटेल, मिर्झा, लिबर्टी शूज, खादीम, सुपर हाऊस, KCP, उगार शुगर, गॉडफ्रे फिलिप्स, कोलगेट, मेरिको, TBZ, थंगमाईल ज्यूविलरीज, डाबर, पेंट्स कंपन्या ( एशियन, बर्गर) MCX, आणि इन्शुअरन्स सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

आज सरकारने रब्बी पिंकांची MSP ( मिनिमम सपोर्ट प्राईस) ५% ने वाढवली. गव्हाची MSP Rs १८४० वरून Rs १९२५ केली त्याचबरोबर बाजरीची MSP वाढवली. शेतकऱ्यांच्या हातात आता बराच पैसा येणार असल्यामुळे ग्रामीण भागात कंझम्पशनमध्ये वाढ होईल

BSNL आणी MTNL या दोन टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपन्यांच्या मर्जरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या दोन कंपन्यांच्या Rs ३८००० कोटी किमतीच्या मालमत्तेचे मोनॅटायझेशन केले जाईल. BSNL आणि MTNL यांच्या मर्जरसाठी Rs १४००० कोटीची तरतूद केली. या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने VRS जाहीर केली. सरकारच्या मते ही अत्यंत फायदेशीर अशी VRS आहे. त्याचप्रमाणे सरकार त्यांना Rs २०००० कोटींची 4 G स्पेक्ट्रम अलॉट करेल.आणि या स्पेक्ट्रमचे सर्व्हिसिंग सरकार करेल. या मर्जरला आणि VRS ची प्रक्रिया पूर्ण व्हायला दोन वर्षे लागतील असा अंदाज आहे. या मर्जरसाठी सरकार सॉव्हरिन बॉण्ड्स इशू करणार आहे.

सरकारने CNG, LNG, पेट्रोलियम, एव्हिएशन टरबाइन फ्युएल, डिझेल यांचे रिटेलिंग राईट्सचे नियम सोपे केले. यात मुख्य अट अशी अशी की ५% पेट्रोल आउटलेट ग्रामीण भागात काढले पाहिजेत. आता नेट वर्थ Rs २५० कोटी असलेल्या कोणत्याही कंपनीला हे रिटेलिंग राईट्स मिळू शकतील.

AFFLE या कंपनीने ८ नवी पेटंट फाईल केले. म्हणून आज शेअरमध्ये खूप तेजी होती.

बजाज ऑटोचे दुसऱ्या तिमाही उत्पन्न Rs ७७०७ कोटी प्रॉफिट Rs १४०२ कोटी टॅक्स खर्च Rs Rs २०६ कोटी होता. ऑपरेटींग मार्जिन १६.६% होते. व्हॉल्युम ११.७३% ने वाढली. ऑटो क्षेत्रातील मंदी लक्षात घेता हे निकाल समाधामकारक म्हणता येतील.

हिरो मोटो कॉर्प या कंपनीचा नफा Rs ८७० कोटी झाला उत्पन्न Rs ७५७० कोटी झाले. यात कंपनीला झालेल्या वन टाइम लॉस Rs ६० कोटींचा समावेश आहे. ऑपरेटिंग मार्जिन १४.५% राहिले. एकंदरीतच ऑटो क्षेत्रातील मंदीची थोडी झळ या कंपनीला बसली.

HCL टेक या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा नफा Rs २७१० कोटी राहिला. उत्पन्न Rs १७५३० कोटी होती. US $ उत्पन्न Rs २४८ कोटी राहिले. कंपनीने १शेअरला १बोनस शेअर जाहीर केला आणी Rs २ प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला . कंपनीने मार्जिन गायडन्स १८.५% ते १९.५% दिला.

लार्सन अँड टुब्रो या कंपनीने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला उत्पन्न Rs ३५३२८ कोटी झाले. फायदा Rs २५२७ कोटी होता. इतर उत्पन्न Rs Rs ५९६ कोटी होते. टॅक्सचा फायदा Rs २०१ कोटी झाला. ऑर्डर बुक Rs ४८००० कोटी होते. ऑपरेटिंग मार्जिन ११.४% होते.

HDFC लाईफ या कंपनीच्या प्रॉफिट आणि उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाली.

इंडियन बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs ३६० कोटी झाले. ऍसेट गुणवत्ता ग्रॉस NPA ७.२०% आणि नेट NPA ३.५४% राहिले.NPA थोडे कमी झाले. एकंदरच पाहता सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांतील तसेच खाजगी बँकांतील NPA चा प्रश्न हळू हळू सुटतो आहे असे वाटते

क्रॉम्प्टन ग्रीव्हज, NIIT TECH ( Rs १० अंतरिम लाभांश) , आरती ड्रग्ज, PI इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स ( डेकोरेटिव्ह पेंटमधील ग्रोथ चांगली) ,कोरोमांडेल, टिनप्लेट, इनॉक्स लिजर, कजरिया सिरॅमिक्स, प्राज इंडस्ट्रीज, IRB इन्फ्रा, OBC, बजाज फिनसर्व, हेक्झावेअर ( Rs २ अंतरिम लाभांश ) डिशमन फार्मा, GHCL, कॅस्ट्रॉल, टॉरंट फार्मा या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

टेक्सरेल, हॅवेल्स इंडिया, M & M फायनान्स या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल साधारण आले. अरविंद फॅशन, RBL बँक यांचे निकाल असमाधानकारक होते.

उद्यापासून PVR या कंपनीचा QIP इशू Rs १८०९.५३ प्रती शेअर या किमतीवर सुरु होईल.

उद्या मारुती, ITC, कोलगेट, इंडिगो यांचे निकाल येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०५८ NSE निर्देशांक निफ्टी ११६०४ बँक निफ्टी २९४५९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.