आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ६०.७५ प्रती बॅरल ते US $ ६०.९९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१=Rs ७१.०५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३५ होता तर VIX १५.५० होते.

आज महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दिवसभर मतमोजणीच्या बातम्या येत असल्यामुळे मार्केटमध्ये तेजी आणि मंदीचा लपंडाव चालू होता. अखेरीस महाराष्ट्रामध्ये NDA चे सरकार सहजपणे आणि थोड्या प्रयत्नांती हरयाणामध्ये NDA चे सरकार येईल असा निष्कर्ष सर्व निकाल जाहीर झाल्यावर निघतो आहे. मार्केटमधील गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना स्थैर्य जास्त पसंत असते.

वर्ल्ड बँकेने ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’ च्या निर्देशांकात भारताला ६३ वे स्थान दिले. आधी भारत ७७ व्या स्थानावर होता.
बँक ऑफ बरोडाने सरकारला Rs ७००० कोटींच्या शेअर्सची अलॉटमेंट केली.

मल्टिब्रँड रिटेलमध्ये ४९% पेक्षा जास्त FDI ला परवानगी नाही.

सरकारने NAFRA ( नॅशनल फायनान्सियल रिपोर्टींग ऑथोरिटी) ला इन्फोसिसची चौकशी करायला सांगितले आहे.
या तिमाहीत सरकारनी केलेल्या कॉर्पोरेट टॅक्समधील सुधारणांचा सर्व कंपन्यांनी फायदा घेतला आहे. त्यामुळे आपण कंपनीचे निकाल बघताना टॅक्स राईट बॅक किंवा टॅक्स खर्च किती कमी झाला याकडे लक्ष द्यावे.

आज बंधन बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट Rs ९७२ कोटी तर NII Rs १५२९ कोटी होते. ग्रॉस NPA १.७६% तर नेट NPA ०.५६% होते. NIM ८.२% होते. प्रोव्हिजन Rs १४६ कोटी होती. हे निकाल चांगले लागले.
आज ऑटो क्षेत्रातील मारुतीने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचे उत्पन्न Rs १६९८५ कोटी तर प्रॉफिट Rs Rs १३५९ कोटी झाले . इतर उत्पन्न Rs ५२७ कोटींवरून Rs ९२० कोटी झाले. कंपनीचा टॅक्स खर्च Rs ९७१ कोटीवरून Rs २१३ कोटी झाला. मार्जिन ९.५% होती. मार्जिनमध्ये वाढ टॅक्स खर्च कमी झाल्यामुळे दिसते.

ITC या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफीटमध्ये ३६% वाढ होऊन ते Rs ४०२३ कोटी झाले. सिगारेट व्हॉल्युम ६% ने वाढले. उत्पन्न Rs ११८७१ कोटी झाले.

इंडिगोने Rs १०६२ कोटी लॉस दाखवले. गेल्या वर्षीच्या मानाने हा लॉस खूपच वाढला. कंपनीने वाढती मेंटेनन्स कॉस्ट, फॉरेक्स लॉसेस ही कारणे दाखवली.

कोलगेट या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट २४%( YOY ) वाढून म्हणजेच Rs १९६ कोटींवरून Rs २४४ कोटी झाले. उत्पन्न Rs ११६० कोटी वरून Rs १२१३ कोटी झाले.

अलेम्बिक फार्माचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कमिन्स, किर्लोस्कर ऑइल, बायोकॉन, रिलायन्स NIPON लाईफ, गुजरात पिपावावचे निकाल ठीक आले.

जॉन्सन हिताची ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीचे उत्पन्न वाढले. Rs ४९ लाख फायद्याऐवजी Rs ६४ लाख कोटी तोटा झाला.

DCM श्रीराम या कंपनीचे उत्पन्न वाढले प्रॉफिट. मात्र कमी झाले.

NIIT चा निकाल वरकरणी चांगला दिसत असला तरी टॅक्स राईट बॅक Rs १७४ कोटी असल्याने शेअरचा भाव कमी झाला.
आज सुप्रीम कोर्टाने २०१६ च्या केसमध्ये AGR (ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू अग्रीमेंट) मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश व्हावा यावर निकाल दिला. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी सरकारला Rs १३३ लाख कोटी ( यात लायसेन्स फी, स्पेक्ट्रम युसेज चार्जेस, मुद्दल त्यावरील दंड, व्याज यांचा समावेश असेल.). द्यायचे आहेत भारती एअरटेलला Rs २६००० कोटी, व्होडाफोन आयडियाला Rs १९००० कोटी, तर RCOM कंपनीला Rs १६००० कोटी द्यावे लागतील. रिलायन्स जिओने हल्लीच टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे त्यांचे नाव या यादीत नाही. ज्या कंपन्यांचे किंवा ग्रुपचे टेलिकॉम क्षेत्राला एक्स्पोजर आहे त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी आली

हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर ज्या कंपन्यांना या निकालानुसार मोठी रक्कम भरावी लागेल त्यांचे शेअर तर पडलेच पण ज्या बँकांनी या कंपन्यांना कर्ज दिले होते त्या बँकांच्या शेअर्समध्येही मंदी आली. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, एक्सिस बँक यांचा समावेश आहे. या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी सरकारकडे सहा महिन्यांची मुदत मागितली आहे.
२५ ऑक्टोबर २०१९ रोजी HDFC AMC, स्टेट बँक ऑफ इंडिया, मॅरिको, टाटा मोटर्स, V २ रिटेल तर २६ ऑक्टोबर २०१९ रोजी ICICI बँक, फायझर दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. भारती एअरटेल, हिंदुस्थान झिंक, पेट्रोनेट LNG, २९ ऑक्टोबर २०१९ रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०२० NSE निर्देशांक निफ्टी ११५८३ बँक निफ्टी २९१०८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.