आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ६१.३० प्रती बॅरल ते US $ ६१.४१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.९५ ते US $१= Rs ७१.०४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६० तर VIX १५.५० होते.

आज दिवाळीचा मोठा आनंदाचा सण सुरु झाला. आपल्याला हि दिवाळी आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची, आणि संपन्नतेची जावो ही सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच दिवाळीच्या पाडव्यापासून सुरु होणारे संवत २०७६ आपल्याला भरभराटीचे आणि यशाची जावो ही शुभेच्छा.

आज संवत २०७५ चा शेवटचा दिवस. गेल्या संवत्सरात निफ्टीने ९.५०% तर सेन्सेक्सने १०% रिटर्न दिले.

F & O मार्केटमध्ये ट्रेड होणाऱ्या शेअर्सची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. हेक्झावेअर, टाटा एलेक्सि, युनियन बँक ऑफ इंडिया हे शेअर F & O मार्केटमधून बाहेर पडतील. आता ७२ कंपन्यांचे शेअर्स वायदे बाजारात ट्रेड होतात. जर कंपनीचे २५% पेक्षा जास्त शेअर्स तारण म्हणून ठेवले असतील किंवा शेअरची मार्केट कॅप जर Rs १००० कोटींपेक्षा जास्त असेल तर अशा शेअर्ससाठी ३५% मार्जिन ठेवावे लागेल.

युनायटेड स्पिरिट्सच्या मद्यार्कासाठी असलेली मागणी कमी होत आहे आणि काही ब्रॅण्डच्या बाबतीत सप्लाय साईडवर अडचणी येत आहेत.

IDFC फर्स्ट बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल वरवर दिसायला खराब असले तरी CASA रेशियो, NIM आणि रिटेल लोन बुकमध्ये चांगली सुधारणा दिसत आहे.

दीपक नायट्रेट, ASTRAL पॉली, PNB हौसिंग, दालमिया भारत, हैडलबर्ग सिमेंट, आवास हाऊसिंग यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

स्ट्राइड्स फार्मा ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.Rs १२ कोटी तोट्याचा Rs १४.३ कोटी फायदा झाला. कंपनीचे उत्पन्न, ऑपरेटिंग मार्जिन, आणि प्रॉफिट यांच्यात वाढ झाली.

हुतामाकी PPL हे कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

अतुल लिमिटेड, कॉर्बोरंडमचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

अरविंद, इन्फिबीम, टिमकीन या कंपन्यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

आज स्टेट बँक ऑफ इंडिया चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. बँकेची प्रॉफिट Rs ९४५ कोटींवरून Rs ३०१२ कोटी(YOY) तर NII Rs २०९०६ कोटींवरून २४६०० कोटी(YOY) झाले. ग्रॉस NPA ७.१९% तर नेट NPA २.७९ होते. ऍसेट गुणवत्तेत सुधारणा झाली. स्लीपेजिस Rs ८८०० कोटी होते. प्रोव्हिजन Rs १३१३९ कोटी होती. बँकेला SBI लाईफ मधला स्टेक विकल्यामुळे Rs ३४८४ कोटी उत्पन्न झाले. NIM वाढून ३.११ % झाले. स्टेट बँकेचा हा निकाल सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांची तब्येत सुधारत आहे असा दिलासा देणारा होता. या निकालांनंतर स्टेट बँकेच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी आली. पण बाकीच्या सरकारी बॅँकांचे शेअर्सही वाढले.

मार्केट बंद झाल्यावर टाटा मोटर्सचे निकाल आले. कंपनीला Rs २१७ कोटी तोटा झाला. हा तोटा पूर्वीपेक्षा खूपच कमी झाला. उत्पन्न Rs ६५४३२ कोटी झाले.ऑपरेटिंग मार्जिन १०.८% राहिले. टाटा मोटर्स टाटा सन्सला Rs १५१ प्रती भावाने Rs ३०२० कोटींचे शेअर्स जारी करणार. JLR ला PBT Rs १५.६ कोटी झाले तर उत्पन्न Rs ६०८ कोटी झाले. JLR चे ऑपरेटिंग मार्जिन १३.८% राहिले.

२८ ऑक्टोबरला विनिवेश कारभाराची समीक्षा कारण्यासाठी मीटिंग होईल.

DR रेड्डीज आणि येस बँक १ नोव्हेंबर २०१९ रोजी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०५८ NSE निर्देशांक निफ्टी ११५८३ बँक निफ्टी २९३९५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.