आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ६१.०८प्रती बॅरल ते US $ ६१.५२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७०.६९ ते Rs ७०.८३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५५ होता तर VIX १५ .९० होते.

आज जागतिक आणि स्थानिक चांगल्या संकेतांमुळे मार्केटमध्ये तेजी होती. आज USA ने चीनमधून आयात होणाऱ्या १००० उत्पादनांवर टॅरिफ कन्सेशन्सची मुदत वाढवली. त्यामुळे आता चीन आणि USA यांच्यात दोघांनाही रुचेल आणि पटेल असे टॅरिफ अग्रीमेंट होईल ही आशा वाढीस लागली. युरोपियन युनियनने ब्रेक्झिटसाठी मुदत वाढ देण्याचे मान्य केल्यामुळे. आता ३१ ऑक्टोबर २०१९ ला डील शिवाय ब्रेक्झिट होण्याची शक्यता कमी झाली. यामुळे धातूसंबंधीत शेअर्समध्ये तेजी आली.

टाटा मोटर्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल गेल्या तिमाहीपेक्षा चांगले आले. टाटा ग्रुप या कंपनीमध्ये इक्विटीद्वारे भांडवल घालणार आहे. या मुळे टाटा मोटर्सचा शेअर वधारला. तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी वाहने, कार्स याचा खप वाढल्यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्समधील मंदी थोडी कमी झाली.टाटा मोटर्सच्या शेअरची बुक व्हॅल्यू Rs १८० आहे. हा शेअर आपल्या बुक व्हॅल्यूच्या पेक्षा कमी CMP वर ट्रेड होत होता.

सरकार इक्विटी, DEBT आणी कमोडिटी मार्केटशी संबंधित असलेल्या LTCG ( लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स), STT( सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स), DDT ( डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स) या टॅक्समध्ये सुधारणा करण्यावर विचार करत आहे. हे टॅक्स जागतिक स्तरावर असलेल्या टॅक्स च्या स्तरावर आणण्याचा विचार चालू आहे. LTCG मुळे अपेक्षित रेव्हेन्यू मिळत नाही, DDT मुळे आंतरराष्ट्रीय पेन्शन फंड भारतात गुंतवणूक करण्याची टाळाटाळ करतात. त्यामुळे DDT पूर्णपणे रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. या सर्व टॅक्सना पर्याय म्हणून एकच इक्विटी टॅक्स आणण्याचा सरकार विचार करत आहे. या सुधारणा वरवर नसून त्यामुळे या कर रचनेमध्ये आमूलाग्र बदल होईल अशी शक्यता आहे. या बातमीमुळे एकंदरीतच शेअरमार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आणि मार्केटमध्ये सार्वत्रिक तेजी आली.

या तेजीला अपवाद होता टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचा. भारती एअरटेल, भारती इंफ्राटेल, व्होडाफोनआयडिया, या कंपन्यांना सरकारला तीन महिन्यात Rs १३३ लाख कोटी सुप्रीम कोर्टाच्या २००५ सालापासून चालू असलेल्या खटल्याच्या निकाला प्रमाणे भरायचे आहेत. या घडामोडीमुळे भारती एअरटेलने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जे आज जाहीर होणार होते ते १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पुढे ढकलले.या कंपन्यांनी या बाबतीत कोणतीही प्रोव्हिजन केलेली नाही. या तिन्ही शेअरमध्ये खूपच मंदी आली. या कंपन्यांवरील आर्थीक ताण कमी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या कंपन्यांना स्पेक्ट्रम युसेज चार्जेसमध्ये सरकार सवलत देऊ शकते. या कंपन्यांना कर्ज देणार्या सरकारी उदा स्टेट बँक ऑफ इंडिया, PNB, तसेच खाजगी बँका उदा. ऍक्सिस बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकांवरही या खात्यांसाठी प्रोव्हिजन करावी लागेल.

NMDC च्या नागरनार युनिटचे डीमर्जर आता या वर्षात पुरे होऊ शकणार नाही. कारण या प्रक्रियेला कमीत कमी सात महिने लागतील.

सौदी आरामको या ऑइल आणि गॅस क्षेत्रातील दिग्गज आंतरराष्ट्रीय कंपनीच्या IPO ची घोषणा ३ नोव्हेम्बर २०१९ ला होईल आणि या IPO चा प्राईस बँड १७ नोव्हेम्बरला जाहीर होण्याची शक्यता आहे.

DHFL या कंपनीविरुद्ध फंड डायव्हर्जनसंबंधात कॉर्पोरेट मंत्रालय SFIO (सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस) तर्फे चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे. कंपनीविरुद्ध या संबंधात पुरावे मिळाले आहेत. ROC (रजिस्ट्रार ऑफ कंपनीज) मुंबई यांनी आपला रिपोर्ट २ दिवसांपुर्वी सादर केला. DHFL ने कंपनी कायद्याचे उल्लंघन केले असा आरोप आहे.
फायझर,, हिंदुस्थान झिंक( टॅक्स खर्चात Rs ४६४ कोटींची घट), यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

DCM श्रीराम या कंपनीचे निकाल ठीक आले.

उद्या टाटा ग्लोबल बिव्हरेजीस, PTC, टाटा केमिकल्स, JK टायर्स त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९८३१ NSE निर्देशांक निफ्टी ११७८६ वर बँक निफ्टी २९८७३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.