आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०१९

आज क्रूड US $ ६१.३८ प्रती बॅरल ते US $ ६१.५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९१ ते US $१=Rs ७१.०२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५७ होते तर VIX १६.६७ होते.

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. ते रियाध येथे होणाऱ्या FII ( फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह) या परिषदेला हजर राहतील.या परिषदेत ऊर्जा, संरक्षण, नागरी विमानसेवा या क्षेत्रात बरेच करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या शेअर्समध्ये उद्या हालचाल असण्याची शक्यता आहे.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्सने ४००००चा तर बँक निफ्टीने ३०००० चा टप्पा ओलांडला. लवकरच निफ्टी १२००० चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. भारतात पैशाची आवक वाढावी, परदेशी गुंतवणुकीला उत्तेजन मिळावे म्हणून सरकार वेगवेगळ्या सुधारणा करत आहे. याचाच हा परिणाम आहे.

CPSE कडे असलेली शिलकी जमीन विकण्याचा विचार करत आहे. या CPSE च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी या जमीन विक्रीकरता घ्यावी लागेल.

BALMER LAWRIE या कंपनीची ११ नोव्हेंबर २०१९ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. या बैठकीत बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे या कंपनीला बोनस इशू रद्द करावा लागला होता.

सरकार लवकरच गोल्ड AMNESTY योजना जाहीर कारण्याचीए शक्यता आहे. आपल्याजवळ सरकारने ठरवलेल्या किमान गोल्डहोल्डींग मर्यादेपेक्षा जास्त पावत्या नसलेले सोने असेल तर आपल्याला ते ही योजना चालू असेपर्यंत जाहीर करावे लागेल. ह्या सोन्याचे सरकारी व्हॅल्युएशन केंद्रातून व्हॅल्युएशन करून घ्यावे लागेल. जी किंमत ठरेल त्या किमतीवर आपल्याला एक विशिष्ट दराने कर भरावा लागेल. ह्या कराचे पेमेंट केल्यावर आपण हे सोने आपल्याजवळ बाळगू शकता. जर ह्या योजनेची मुदत संपल्यावर आपल्याजवळ अघोषित आणी पावत्या नसलेले सोने असले तर आपल्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकेल.

स्टॅंडर्ड लाइफने HDFC लाईफचे १० कोटी शेअर्स Rs ५७५.१५ प्रती शेअर या भावाने विकले. फेडच्या रेट कट विषयी उद्या माहिती मिळेल.

F & O मार्केटमधील स्ट्राईड फार्माचा उद्याचा शेवटचा दिवस. उद्या F & O मार्केटमध्ये ऑक्टोबर काँट्रॅक्टसची एक्स्पायरी आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून नोव्हेंबर महीन्याच्या काँट्रॅक्टसला सुरुवात होईल. F & O मधील शेअर्सच्या लॉटसाइझमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे.

सरकार आपल्या BEML मधील ५४.५०% स्टेकपैकी २६% स्टेक विकणार आहे त्याबरोबरच व्यवस्थापनेचे अधिकारही ट्रान्स्फर करणार आहे. त्यामुळे BEMLच्या शेअरमधी तेजी आली. IDBI बँकेने आपल्याजवळील NSE मधील १.५०% स्टेक पैकी ०.७२% स्टेक विकला.

CAPLIN पॉईंट, रेमको सिमेंट, इंडोको रेमिडीज ( ही कम्पनी तोट्यातून फायद्यात आली) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

फिलिप कार्बन, टाटा केमीकल्स, हेरिटेज फूड्स, युनायटेड बँन्क ( ही बँक तोट्यातून फायद्यात आली.) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

आज BSE निर्देशांक सेंसेक्स ४००५१ NSE निर्देशांक निफ्टी ११८४४ बँक निफ्टी २९९८७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.