Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – १९ नोव्हेंबर २०१९
\आज क्रूड US $ ६१.८६ प्रती बॅरल ते US $ ६२.५० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.८२ ते US $ १= Rs ७१.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.८४ तर VIX १५.४२ होते.
आज रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप ९.५ लाख कोटींपिक्षा जास्त झाल्यामुळे सगळ्यात जास्त मार्केट कॅप असलेला पहिलया क्रमांकाचा शेअर झाला. आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर लाईफ टाइम कमाल किमतीवर होता. मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजचे रिफायनिंग मार्जिन चांगले असेल त्यामुळे टार्गेट अपग्रेड केले. १ डिसेम्बर २०१९ पासून भारती एअरटेल आणी वोडाफोन आपल्या किमती/दर वाढवत आहे त्याचा फायदा रिलायन्स जियोला होईल.इतर ब्रोकर फर्मनीही रिलायन्स इंडस्ट्रीजचे टार्गेट अपग्रेड केले आहे.
अलाइड डिजिटलला औरंगाबाद स्मार्टसिटीसाठी ऑर्डर मिळाली.
काल ग्लेनमार्क फार्मा ३०% वाढला होता. पण त्यात फक्त ६% डिलिव्हरी व्हॉल्युम होते. बाकी सर्व ट्रेडिंग व्हॉल्युम होता.अशावेळी शेअरच्या किमतीत झालेली वाढ टिकाऊ नसते किंवा कंपनीत मूलभूत असा कोणताही बदल घडलेला नसतो.
क्रूडसाठी मागणी कमी होत आहे. सौदी अरेबियाची क्रूड निर्यात कमी झाली आहे. USA मध्ये क्रूडचा साठा ११ लाख बॅरल्सने वाढला. क्रुडमध्ये होणारी वाढ आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा मेळ बसत नाही कारण सौदी आरामको या कंपनिच्या IPO साठी क्रूडचे दर मॅनेज केले जात आहेत. क्रूडचे भाव कमी होण्याऐवजी वाढत आहेत.
आज स्टीलचे भाव कमी करण्यात आले आणी कर्मचारी वर्गही कमी करण्यात आला. हाय कॉस्ट आणी लो डिमांड हे कारण सांगण्यात आले. याचा फायदा ऑटो अँसिलिअरीजला होईल.
कार्लाइल ग्रुपने Rs ५१५ प्रती शेअर या किमतीने SBI लाईफमध्ये ८ महिन्यापूर्वी स्टेक खरेदी केला होता. त्यातील ३% हिस्सा आज विकला. Rs ९३० ते Rs ९७० प्रती शेअर या किमतीदरम्यान हे डील झाले.
CSB ( कॅथॉलिक सीरियन बँक) २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान IPO आणेल.प्राईस बँड Rs १९३ ते Rs १९५ असेल. फेअरफॅक्सचा ५१% स्टेक असेल HDFC लाईफ, ICICI प्रु,फेडरल बँक, ICICI लोम्बार्ड, आणि इतर प्रमोटर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून बाहेर पडणार आहेत.या बँकेचा केरळ मध्ये मुख्य प्रसार असून तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात ही बँक कार्यरत आहे. मार्केट लॉट ७५ शेअर्सचा असून दर्शनी किंमत Rs १० आहे. या IPO मधील अलॉटमेंट २ डिसेंबर रोजी होईल. या शेअर्सचे ४ डिसेंबर २०१९ रोजी लिस्टिंग होईल.
वोडाफोन आयडिया आणि एअरटेल आपापल्या सेवांच्या किमतीत/दरात वाढ करण्यात आली. याचा फायदा ग्रासिमलाही होईल. ग्रासिमला आता कमी भांडवल पुरवावे लागेल.
UPL नी चायनिज अग्रोकेम फर्म Rs ९५ कोटीला खरेदी केली.
कॉर्पोरेशन बँकेचे व्हिडीओकॉन ग्रुपला Rs २५०० कोटी तर भूषण पॉवरला Rs १५० कोटींचे एक्स्पोजर आहे. FY २० साठी बँकेने Rs ६००० कोटींचे वसुलीचे लक्ष्य ठरवले आहे. रिटेल क्षेत्रामध्ये Rs ४०० कोटींची ग्रोथ अपेक्षित आहे. बँकेची बुक व्हॅल्यू Rs २६.५२ आहे. NCLT सेटलमेंटमधून Rs ८००० कोटींची वसुली अपेक्षित आहे या बँकेचे युनियन बँकेत होणारे मर्जर मार्च २०२० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एस्सार स्टीलच्या केसमध्ये आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या बँकेच्या शेअरमध्ये खूपच तेजी आली.
FADA ( फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन) ने आज वाहनांच्या रजिस्ट्रेशनची आकडेवारी जाहीर केली. यात एकूण वाहन रजिस्ट्रेशनमध्ये ४% वाढ तर २ व्हिलर्स मध्ये ५% वाढ, ३ व्हीलर वाहनांमध्ये ४% वाढ, पॅसेंजर वाहनांमध्ये ११% वाढ तर कमर्शियल वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये २३% घट झाली.
दिल्ली आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला २ कमर्शियल प्रोजेक्टसाठी मंजुरी मिळाली.
ऍडव्हान्स एन्झाईम ही कंपनी आपले मलेशियातील युनिट ३० जून २०२० पूर्वी बंद करणार आहे.
NMDC च्या नागरनार ह्या युनिटचे डीमर्जर आणि विनिवेश करण्याचे घाटत होते. पण स्टील मंत्रालयाने असे करू नये अशी शिफारस केली आहे.
मारुती सुझुकी या कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांच्याकडे आता BSIV वाहनांची कोणतीही इन्व्हेन्टरी नाही. जानेवारी २० ते मार्च २० या तिमाहीत कंपनी BREZZA आणि S -क्रॉस चे पेट्रोल व्हर्शन लाँच करेल. ऑक्टोबरमध्ये विक्री चांगली झाल्यामुळे कंपनी आता आशावादी आहे.
IDBI बँक त्यांची IDBI ऍसेट मॅनेजमेंट कंपनी मुथूट फायनान्स या कंपनीला विकणार आहे.
१ डिसेंबर २०१९ पासून भारती एअरटेल आणि वोडाफोन आपल्या किमती/दरामध्ये वाढ करणार आहे.
धामपूर शुगरने त्यांच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेत १लाख टन वाढ केली आहे. तसें त्यांनी देशी मद्यार्काचा ब्रँड लाँच केला आहे.
१३-१४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान येस बँकेच्या प्रमोटर्स म्हणजे मॉर्गन क्रेडिट, राणा कपूर, आणि येस कॅप यांनी येस बँकेचे २.०४ कोटी शेअर्स विकले. येस बँकेची वोलतालीटी १४५% आहे. बँकेत सतत काही ना काही घडामोडी घडत असतात. इतर कंपन्यातील प्रमोटर्स जेव्हा शेअर्स विकतात तेव्हा शेअर पडतो पण येस बँकेच्या बाबतीत मात्र प्रमोटर्सनी शेअर्स विकले हे उत्तम झाले असे मार्केटला वाटते. त्यामुळे शेअर वाढतो.
ज्या कंपन्यात सरकार आपला स्टेक ५१% पेक्षा कमी करू इच्छित आहे अशा कंपन्यांची यादी सरकार बनवत आहे.
आज निफ्टीने आणी बँक निफ्टीने आपापले सेकंड हायेस्ट क्लोजिंग रजिस्टर केले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०४६९ NSE निर्देशांक निफ्टी ११९४० आणी बँक निफ्टी ३१२३६ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!