आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ५९.६६ प्रति बॅरल ते US $ ५९.७५ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $ १ =Rs ७०.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२४ तर VIX १६.२८ होते.

चीन आणि USA यांच्यामध्ये चिली या देशात वाटाघाटी होणार होत्या. त्या चिलीमधील राजकीय अस्थैर्यामुळे आता रद्द झाल्यावर दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी वाटाघाटींची फेरी होईल. या वाटाघाटींना फेज I डील म्हटले आहे. सुरुवातीला ज्या उत्पादनांवर टॅक्स लावले होते ते रहीत होतील.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाअभियोगाला मंजुरी मिळाली.

काल DII ची थोडीशी विक्री दिसली ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होत असेल तेथे प्रॉफिट बुकिंग करा. ट्रेंलिंग स्टॉप लॉस वापरा. या मार्केटमध्ये ‘बाय ऑन डिप्स’ ही स्ट्रॅटेजी योग्य ठरेल.

आज ऑटो विक्रीचे आकडे आले. बजाज ऑटोची विक्री YOY कमी झाली असली तरी MOM (मंथ ऑन मंथ) वाढली. एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री MOM २३% ने वाढली.त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली, अशोक लेलँडची विक्री ३५% ने कमी झाली पण अनुमानापेक्षा जास्त झाल्याने शेअर स्थिर राहिला. मारुतीची विक्री ४.५% ने वाढली ( १.५३ लाख झाली) आणि MOM २५.४% ने वाढली.अतुल ऑटोची विक्री ५.५% ने घटली. SML ISUZU ची विक्री ३७.९% ने घटली. M & M ची विक्री ११% ने कमी झाली. TVS मोटर्सची विक्री १८.८% ने घटली.आयशर मोटर्सची विक्री ३७५५ युनिट झाली ( ३५०० चे अनुमान होते)

भारतात ऊस गाळप हंगामाला उशीर होण्याची शक्यता आहे. पाऊस या वर्षी उशिरा सुरु झाला होता. ऑक्टोबर संपला तरी पाऊस सुरु आहेच साखरेच्या किमती वाढत आहेत. ठीकठिकाणी आलेल्या पुरामुळे उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. साखरेचे देशांतर्गत आणि निर्यातीसाठी दर वाढतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आज साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये अवध शुगर,उगार शुगर, बजाज हिंदुस्थान, मावाना शुगर, KCP शुगर, त्रिवेणी शुगर्स, बलरामपूर चिनी, उत्तम शुगर, द्वारिकेश शुगर इत्यादींचा समावेश होता.

पावसाळा यावेळी ऑक्टोबर महिना संपला तरी जोर पकडून आहे. प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आजारपणही वाढत आहे हे समाजाच्या दृष्टीने चांगले नाही पण आजारपण आले की वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागतात. त्यामुळे मेट्रोपोलीस हेल्थकेअर, लाल पाथ लॅब,नारायणा हृदयालय, अपोलो हॉस्पिटल्स, थायरोकेअर ह्या अशा तपासण्या करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

काल येस बँकेचा पूट Rs ६० चा आणि कॉल Rs ८० चा होता. या वरून अंदाज येतो की शेअरची किंमत किती खाली आणि किती वर जाईल. डिलिव्हरी बेस्ड खरेदी फक्त १२% होती. म्हणजेच बाकी सर्व इंट्राडे व्हॉल्युम होते. या शेअरची बुकव्हॅल्यू Rs ९८ आहे. आज येस बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी हाँगकाँगच्या SPGP होल्डिंग या कंपनीच्या US $ १२० कोटीच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली का ? आणि ही गुंतवणूक खरोखरचे येते आहे का ? तसेच दुसऱ्या तिमाहीतील ऍसेट गुणवत्ता, प्रोव्हिजन आणि फ्रेश स्लीपेजिस यांची पोझिशन बघितल्यावर या शेअरमध्ये पोझिशन घेतली जाईल.

येस बँकेला Rs ६०० कोटी तोटा झाला. NPA साठी वाढत्या प्रमाणावर प्रोव्हिजन करायला लागली. NII कमी झाले. लोन मध्ये डिग्रोथ झाली.

A ३२० NEOS विमानांचे इंजिन बदलण्याचे आदेश DGCA ने इंडिगोला दिले. १९ नोव्हेम्बरपर्यंत ७ विमानांची इंजिन बदलायची मुदत आहे.जर ही इंजिने बदलली नाहीत तर ३१ जानेवारी २०२० नंतर एकंदरीत २३ विमाने ग्राउंड होतील. यामुळे शेअर पडला.

जेट फ्युएलची किंमत Rs २२६७ प्रती किलो लिटरने कमी झाली. आता ही किंमत Rs ६२६७२ प्रती किलो लिटर होईल.
सबसिडीशिवाय LPG गॅसची किंमत Rs ७६.५० नी वाढेल. आता सिलेंडरची किंमत Rs ६८१.५० होईल.

मार्केट तेजीत असल्यामुळे ट्रेडर्स,गुंतवणूकदार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत त्यामुळे स्टॉक एक्सचेंजीस आणि ब्रोकर्स यांना फायदा होतो. यात AB मनी, JM फायनान्सियल्स, एडेलवाईज, मोतीलाल ओसवाल, ICICI सिक्युरिटीज, चोला फायनान्स इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व शेअर्स तेजीत होते.

F & O मार्केटमध्ये ट्रेड होणाऱ्या ५ शेअर्सची लॉट साईझ कमी झाली.

करूर वैश्य बँकेचे NII वाढले ऍसेट गुणवत्तेत किरकोळ सुधारणा झाली. फायदा कमी झाला.

हॉकिन्स, मिश्र धातू निगम, कन्साई नेरोलॅक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान मेडिया व्हेंचर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

GIC हाऊसिंग, JSW एनर्जी यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

DR रेडिजचे प्रॉफिट वाढले असले तरी टॅक्स क्रेडिट आणि लायसेन्सिंग फीच्या विक्रीचे प्रोसिड्स( इतर उत्पन्न) यांचे Rs ७२३ कोटी मिळाले. एकूण प्रॉफिट Rs १०९३ कोटी झाले. त्यामुळे शेअरमध्ये तेजी आली नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०१६५ NSE निर्देशांक निफ्टी ११८९० बँक निफ्टी ३०३३० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.