आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.१२ प्रती बॅरल ते US $ ६२.४१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.६८ ते US $१=Rs ७०.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५३ तर VIX १५.९८ होते.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या राष्ट्रपतींना ट्रेड अग्रीमेंट फेज १ साठी USA मध्ये येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे आता या फेज मधून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल अशी आशा वाटते. या बातमीमुळे मेटल्स संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

ISMA ने देशात २०१९-२०२० या वर्षात होणाऱ्या साखरेच्या उत्पादनाचा अंदाज २.६८ कोटी टनांपर्यंत कमी केला.
आज NSE या स्टॉक एक्स्चेंजने पंचवीस वर्षे पूर्ण केली. भारतातील शेअर मार्केटच्या प्रगतीमध्ये या स्टॉक एक्स्चेंजचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यात त्यांची अशीच भरभराट होवो या शुभेच्छा.

कतार एअरलाईन्सने आपण इंडिगोमध्ये स्टेक खरेदी करणार आहोत या बातमीचा इन्कार केला. पण इंडिगो बरोबर कमर्शियल डील होऊ शकते आणि ते कोड शेअरिंग व्यवस्थेसारखे असू शकते असे सांगितले.

क्लास 8 ट्रकची विक्री गेले तीन महिने सतत वाढत आहे त्याबरोबरच या ट्रकसाठी ऑर्डर्सचे प्रमाण वाढते आहे. याचा फायदा भारत फोर्ज ला होईल. त्याप्रमाणे आज या शेअरमध्ये तेजी आली.

SMS लाईफ सायन्सेस या कंपनीला USFDA ने ‘RANTIDIN’ या औषधाच्या उत्पादनासाठी परवानगी दिली.
ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सनी जास्त प्रमाणात शेअर्स तारण ठेवून कर्ज घेतले असेल अशा कंपन्यांच्या वायद्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर १ नोव्हेम्बर २०१९ पासून ३५% मार्जिन ठेवावे लागेल. पूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५% ते २०% मार्जिन ठेवावे लागत होते. त्यातील काही कंपन्या पुढीलप्रमाणे :- बजाज कन्झ्युमर , डिश टी व्ही, सदभाव इन्फ्रा, GMR इन्फ्रा.

USFDA नी बायोकॉनच्या बंगलोर युनिटला क्लीन चिट दिली.

मारुतीने सुपर कॅरीचे पेट्रोल व्हर्शन Rs ३.९३ लाख किमतीला लाँच केले.

ज्युबिलण्ट इंडस्ट्रीजचे लॉन्ग टर्म इशुअर रेटिंग ‘FITCH’ या रेटिंग एजन्सीने स्टेबलवरून पॉझिटिव्ह केले.

गोदरेज प्रॉपर्टीजचे दुसर्या तिमाहीकरता उत्पन्न कमी झाले, प्रॉफिट वाढले, EBITDA निगेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये आले. बुकिंग ऍडव्हान्स आणि विक्री एरियात वाढ झाली.

प्रिझ्म जॉन्सन या कंपनीचे उत्पन्न कमी झाले, तोट्यात लक्षणीय वाढ झाली, मार्जिन कमी झाले. हे निकाल असमाधानकारक म्हणावे लागतील.

डाबर या FMGC क्षेत्रातील कंपनीचे व्हॉल्युम ग्रोथ ४.८% , उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले, वन टाइम लॉस Rs ४० कोटी होता.

आज PNB या सार्वजनिक क्षेत्रातील दोन नंबरच्या बँकेने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ग्रॉस NPA आणि

नेट NPA, प्रोव्हिजनिंग, फ्रेश स्लीपेजिसमध्ये वाढ झाली. त्यामुळे ऍसेट गुणवत्तेच्या बाबतीत कामगिरी असमाधानकारक राहिली. NII Rs ४२६४ कोटी तर इतर उत्पन्न Rs २२६५ कोटी होती. बँकेला Rs ५०७.१० कोटी फायदा झाला. स्टेट बँकेच्या निकालामुळे वाढीस लागलेली या क्षेत्रातील सुधारणेच्या आशेवर IOB, बँक ऑफ इंडिया, PNB यांच्या निकालांमुळे पाणी पडले.

फ्युचर एंटरप्रायझेस, JMC प्रोजेक्ट्स, टायटन, टेक महिंद्रा ( उत्पन्न मार्जिन आणि प्रॉफिट वाढले.), बर्जर पेंट्स ( उत्पन्न कमी फायदा वाढला), P & G ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले ) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
REC, NCC, यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. इंटलेक्च्युअल डिझाईन इरेना या कंपनीचे निकाल असमाधानकारक होते. (कंपनी फायद्यातून तोट्यात गेली ).

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०२४८ NSE निर्देशांक निफ्टी ११९१७ बँक निफ्टी ३०२१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.