आजचं मार्केट – ६ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.४३ प्रती बॅरल ते US $ ६२.७३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१=Rs ७०.९७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.८२ तर VIX १५.८५ होते.

USA चे भारतबद्दल असलेले धोरण बदलत आहे. आज USA ने भारताचा GSP( जनरलाइझ्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस) मध्ये समावेश करण्यासाठी अनुकूलता दाखवली. या कराराप्रमाणे भारताला USA ला निर्यात होणाऱ्या गुड्सवर ड्युटी भरावी लागत नाही. आधी या अग्रीमेंटमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तूंची USA मध्ये $६०० कोटींची निर्यात होत होती. परंतु ५ जून २०१९ पासून भारताला या योजनेमधून USA ने बाहेर काढले. भारत GSP मध्ये १००% दर्जा परत मिळावा ही अट ठेवेल. USA हळूहळू हा दर्जा १००% पर्यंत देईल अशी शक्यता आहे. हा दर्जा मिळाल्यास ज्युवेलरी, टेक्सटाईल्स, केमिकल्स, स्टील, ऑटो अँसिलिअरीजची USA ला ड्युटी फ्री निर्यात होऊ शकेल.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटी फेज १ मध्ये काही अडचणी येणार नाहीत असे USA ने जाहीर केले.

आज मार्केटने सेन्सेक्स चा ४०६०६ हा इंट्राडे रेकॉर्ड आणि निफ्टीने १२००२ चा इंट्राडे टप्पा पार केला. सरकारकडून रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे जाहीर झाले, पर्यावरण संबंधी नियमात बदल, एथेनॉल उत्पादक कंपन्यांना मंजुरी, इन्फ्रा प्रोजेक्टसाठी पर्यावरण मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणे, यावर भर दिला जाईल. यामुळे साखर, रिअल्टी क्षेत्र, आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. USA च्या भारताविषयी बदललेल्या धोरणामुळे निर्यात क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये तेजी होती.

पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्यासाठी आधी कंपन्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स फाईल कराव्या लागत होत्या. सरकारने आता ही तरतूद रद्द केली. त्यामुळे आता ही मंजुरी आता ४ महिन्यात मिळू शकेल. सरकारने मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत आणखीही काही बदल केले आहेत.

पर्यावरण मंत्रयांनी सांगितले आता शुगर उत्पाद कंपन्यांना आता जर त्यांच्या इथेनॉल उत्पादन करणाऱ्या प्लांटची क्षमता वाढवायची असेल तर पर्यावरणासाठी मंजुरी घ्यायची गरज नाही. याचा फायदा इथेनॉल संबंधित साखर उत्पादक कंपन्यांना होईल. उदा :- प्राज , इंडिया ग्लायकॉल इंडस्ट्रीज. द्वारिकेश शुगर .

औरोबिंदो फार्माच्या हैद्राबाद युनिट नंबर २च्या केलेल्या तपासणीत USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या.

PC ज्युवेलर्स विरुद्धच्या केसमध्ये Rs १९.१० लाख सेटलमेंट चार्जेस स्वीकारून सेबीने ही कायदेशीर कारवाई पुरी केली.

अडाणी पॉवरच्या ऑगस्ट २००९ मध्ये आलेल्या IPO ची प्राईस Rs १०० होती.गेल्या आठवड्यापासून अडानी पॉवरच्या शेअरमध्ये हालचाल दिसून येत आहे. सध्या शेअर २०१२च्या किमतीला ट्रेड होत आहे.

सुप्रीम कोर्टाने JP इंफ्रासाठी बोली लावण्यासाठी JP असोसिएटला मनाई केली. NBCC आणि सुरक्षा रिअल्टीना नवीन बोलि लावण्यासाठी मुदत दिली.

इन्फोसिसचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन नंदन निलेकणी यांनी सांगितले की अज्ञात लोकांकडून कंपनीची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कंपनीच्या संस्थापकांवर केलेले आरोप असमर्थनीय असून सर्व सहसंस्थापक कंपनीच्या दीर्घ प्रगतिसाठी कटीबद्ध आहेत. कंपनी या आरोपांची चौकशी करून आपला रिपोर्ट पब्लिक करेल.कंपनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. कंपनी गेली १५ वर्षे व्हिसलब्लोअर पॉलिसी राबवत आहे. आमच्या कंपनीच्या धोरणात इमानदारी आणि पारदर्शिता यांना फार वरचे स्थान आहे. CEO सलील पारेख यांच्याकडे मजबूत प्रगतीचे श्रेय जाते.

RAVVA ब्लॉक साठी वेदांताला १० वर्षांची मुदतवाढ आंध्र सरकारने दिली.

गोदरेज कंझ्युमर्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले .प्रॉफिट Rs ४१४ कोटी, उत्पन्न Rs २६३० कोटी व्हॉल्युम ग्रोथ ७% आणि मार्जिन २१.७% होते. कंपनीने Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
ALKYL AMINES ( उत्पन्न नफा मार्जिन वाढले), सिप्ला ( उत्पन्न, मार्जिन,नफा वाढले) ल्युपिन( तोटा Rs १२७ कोटी, वन टाइम लॉस ५४६.५ कोटी, टॅक्स खर्चात Rs १४० कोटींची बचत, उत्पन्न Rs ४३६० कोटी, मार्जिन १६.८ % आणि इतर उत्पन्न Rs १३३ कोटी होते.) इमामी (प्रॉफिट Rs ९६ कोटी, उत्पन्न Rs ६६० कोटी, मार्जिन २९.२% ), V-गार्ड यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

बजाज इलेक्ट्रिकल्स ( प्रॉफीटमधून लॉस मध्ये गेली. उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.),, एक्साइड ( Rs २३७ कोटी नफा, उत्पन्न Rs २६११ कोटी, मार्जिन १४.१% आणि टॅक्सखर्च ६२ कोटींनी कमी) ,फर्स्ट सोर्स सोल्युशन्स ( नफा कमी, आय किरकोळ वाढली मार्जिन कमी झाले)

BOSCH ( नफा ७६.६% नी कमी (YOY) Rs १३०.२० कोटी वन टाइम लॉस, उत्पन्न Rs २३१३ कोटी, मार्जिन कमी झाले.) या कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

कॅनरा बँक ( प्रॉफिट Rs ३६५ कोटी, ग्रॉस NPA ,आणी नेट NPA यांच्या थोडी सुधारणा, NII Rs ३१३० कोटी, लोन ग्रोथ ४.८%, प्रोव्हिजन वाढली) आणि कॉर्पोरेशन बँक ( प्रॉफिट Rs १३० कोटी, NII Rs ४००७ कोटी, GNPA आणि NNPA मधी किंचित सुधारणा) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

टाटा स्टीलचे (कन्सॉलिडिटेड प्रॉफिट Rs ३३०२ कोटी, उत्पन्न Rs ३४५७९ कोटी, मार्जिन ११.१%, अन्य आय Rs १८४ कोटी कंपनीने वित्तीय खर्चात लक्षणीय बचत केली) ठीक आले.

अडानी पोर्टची लॉजिस्टिक सबसिडीअरी गेटवे डिस्ट्रिपार्कची लॉसमध्ये असणारी सबसिडीअरी स्नोमॅन लॉजिस्टिक या कंपनीला खरेदी करणार आहे.स्नोमॅन लॉजिस्टिक या कंपनीला कर्जही पुष्कळ आहे..

फोर्टिस हेल्थकेअर ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०४६९ NSE निर्देशांक निफ्टी ११९६६ बँक निफ्टी ३०६०९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.