आजचं मार्केट – ८ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.८९ प्रती बॅरल ते US $ ६२.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ७०.९५ ते Rs ७१.३० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१० होता VIX १५.७२ होते.

आज MSCI निर्देशांकाचे सहामाही पुनर्गठन झाले. या निर्देशांकात एकूण ७८ बदल करण्यात आले. डोमेस्टिक निर्देशांकात ८ कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट करण्यात आले ते पुढीलप्रमाणे :- बर्जर पेंट्स, HDFC AMC, SBI लाईफ, कोलगेट, DLF, ICICI प्रु, इन्फो एज, सीमेन्स. या निर्देशांकातून खालील कंपन्यांचे शेअर्स वगळण्यात आले. येस बँक, L & T फायनान्स, इंडिया बुल्स हौसिंग, ग्लेनमार्क फार्मा, व्होडाफोन, भेल

स्माल कॅप निर्देशांकात १३ शेअर्स समाविष्ट करण्यात आले आणी १९ शेअर्स वगळण्यात आले. नवीन फ्ल्युओरीन, पॉली कॅब ही शेअर स्माल कॅप निर्देशांकात समाविष्ट केले. हे पुनर्गठन २७ नोव्हेम्बरपासून अमलात येईल.

रेमंड्स या कंपनीने आपल्या कंपनीतून कोअर लाइफ स्टाईल बिझिनेस वेगळा काढला. या नवीन बिझिनेसचे लिस्टिंग होईल. आताच्या कंपनीकडे रिअल्टी, B २ B शर्टींग, लँड इत्यादी बिझिनेस राहतील. जर तुमच्याकडे रेमंड्सचा एक शेअर असला तर तुम्हाला नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. या बातमीमुळे या शेअरमध्ये तेजी आली.

ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनची निर्यात वाढली आणी आयात कमी झाली.

मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताविषयी आऊटलुक निगेटिव्ह केला. याला उत्तर म्हणून भारत सरकारनी सांगितले की सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक रिफॉर्म केले. IMF  (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) नी भारताच्या अर्थव्यवस्थेचा २०१९ या वर्षांसाठी ग्रोथ रेट ६.१% आणि २०२० या वर्षांसाठी ७% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारने जागतिक मंदीची शक्यता लक्षांत घेऊन रिफॉर्म केले आहेत. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करेल. भारत परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक स्थान आहे.

मूडीजने BPCL, HPCL,IOC, इन्फोसिस, टी सी एस, गेल, HDFC बँक, स्टेट बँक या आणी इतर मिळून एकूण १७ कंपन्यांविषयी आऊटलूक नेगेटिव्ह केला. त्यामुळे आणी महाराष्ट्रात राजकीय अस्थैर्य असल्यामुळे एकंदरीत मार्केट (सेन्सेक्स) कोसळले.

4 G आणी 5 G स्पेक्ट्रमची रिझर्व्ह प्राईस कमी होईल. या बाबत प्रस्ताव टेलिकॉम कमिशन कडे पाठवण्यात आला आहे. सध्याच्या किमतीध्ये ४०% ते ५०% घट अपेक्षित आहे. DOT ने किंमत कमी करण्याकरता नोट तयार केली आहे. स्पेक्ट्रमची किंमत कमी केली तर टेलिकॉम क्षेत्रात परदेशीय गुंतवणूक वाढू शकेल. या बाबत १ महिन्याच्या आत निर्णय अपेक्षित आहे.

आंध्र बँक, नेलकास्ट, वर्धमान टेक्सटाईल्स, अलाहाबाद बँक या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.

थायरोकेअर, भारत फोर्ज, EIH, MRF, M &M, गेल या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

कॅपॅसिटे इन्फ्रा, टाटा कम्युनिकेशन्स, G. E.शिपिंग, आयशर मोटर्स, A B कॅपिटल या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कॅनरा बँकेचा कॅन फिना होम्समधील स्टेकसाठी ‘बेअरिंग’ कंपनीने स्वारस्य दाखवले आहे.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ८ नोव्हेंबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.