आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.७९ प्रती बॅरल ते US $ ६२.०३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $१=Rs ७१.५० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२५ तर VIX १६.१० होते.

आज SIAM यांनी ऑक्टोबर २०१९ साठी वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले. यात पॅसेंजर वाहन विक्री ६.४% तर कमर्शियल वाहन विक्री २३.३०% ने कमी, २ व्हीलर विक्री १४.४% आणि एकूण वाहन निर्यात २.७% कमी झाली.
क्रॉस बॉर्डर इंसॉल्व्हंसी नियमांचा उपयोग करून दुसऱ्या देशातील मालमत्तेची वसुली सोपी होऊन जेट एअरवेजची रेझोल्यूशन प्रक्रिया सोपी होईल. IBC मध्ये या नियमांचा समावेश संसदेच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
NBFC, HFC इत्यादी प्रकारांशिवाय कंपन्यांचे वर्गीकरण करून प्रत्येक प्रकारच्या कंपन्यांसाठी वेगळी रेझोल्यूशन विंडो तयार केली जाईल.

सरकार वेगवेगळ्या उद्योगांमध्ये लागणाऱ्या वस्तू आयात करण्यापेक्षा त्या वस्तू भारतातच तयार करण्यावर भर देणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक, केमिकल, फार्मा, कृषी, फर्टिलायझर्स, या उद्योगांवर भर असेल. वाणिज्य मंत्रालयाच्या विविध उद्योगांबरोबर झालेल्या बैठकीत यासाठी उद्योगांकडून प्रस्ताव मागवण्यात आले.

बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत डायव्हेस्टमेन्टच्या संबंधात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषतः BPCL, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या डायव्हेस्टमेन्टला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
आज सप्टेंबर २०१९ साठी IIP चे आकडे आले. ही -४.३%( ऑगस्ट २०१९ मध्ये -१.१%) होते. हे आकडे IIP मधील निगेटिव्ह ग्रोथ वाढली असे दर्शवतात.

सरकारने टेम्पर्ड ग्लास आणि क्लिअर फ्लोट ग्लास यांच्यावर लावलेल्या ऍन्टीडम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवली. यामुळे सेंट गोबेन आणि गुजरात बोरोसिल या कंपन्यांना फायदा होईल.

VRL लॉजिस्टिक (या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा नफा वाढला, उत्पन्न वाढले, कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.) शलबी हॉस्पिटल्स, सूप्रजीत इंजिनीअर्स ( उत्पन्न, नफा, मार्जिन वाढले), ASTRA झेनेका ( नफा, उत्पन्न वाढले), संघी इंडस्ट्रीज ( नफा उत्पन्न वाढले) अल्केम लॅब ( नफा, उत्पन्न मार्जिन वाढले टॅक्स खर्चात घट ) NESCO ( उत्पन्न, नफा, मार्जिन वाढले) शीला फोम, GIPCL ( कंपनी तोट्यातून Rs ५२ कोटी नफ्यात आले, उत्पन्न कमी झाले) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

बलरामपूर चिनी ( उत्पन्न कमी झाले,मार्जिन वाढले, Rs २.५० प्रती शेअरअंतरिम लाभांश) या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

कोलते पाटील ( कंपनी नफ्यातून १४ कोटी तोट्यात गेली. उत्पन्न कमी झाले), बॉम्बे डायिंग, हिंडाल्को या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३४५, NSE निर्देशांक निफ्टी ११९१३ बँक निफ्टी ३१११५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.