आजचं मार्केट – १८ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.०९ प्रती बॅरल ते US $ ६३.४१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६६ ते US $ १ =Rs ७१.८० या दरम्यान तर US $ निर्देशांक ९७.९४ आणि VIX १४.५० होते.

चीनची सेंट्रल बँक PBOC ने (पीपल्स बँक ऑफ चीन) आपला रेपोरेट २.५५% वरून २.५% केला.

इंडियन नेव्हीने ४ कंपन्यांना शॉर्टलिस्ट केली. त्यात भारत फोर्जचा समावेश आहे.

१७ नोव्हेंबर २०१९ पासून गोवा कार्बनच्या गोवा युनिटचे कामकाज सुरु झाले.

ICRA ने बजाज इलेक्ट्रिकल्सचे रेटिंग A १ वरून A २+ पर्यंत कमी केले.

HIL ने आपल्या हैदराबाद युनिटची उत्पादनक्षमता वाढवली.

सरकारने सोने आणि चांदीच्या ज्युवेलरीच्या निर्यातीवरील ड्युटी ड्रॉबॅकचे दर वाढवले यामुळे ज्युवेलरी निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.

टाटा मोटर्सनी लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीस बरोबर ५०० पॅसेंजर आणि कमर्शियल इलेक्ट्रिक वाहने पुरवण्यासाठी जॉईंट व्हेंचर केले आहे. ते प्रथम ‘टिगॊर सेडन’ ही इलेक्ट्रिक कार डेव्हेलप करतील.

आज संसदेचे शीतकाळीं सत्र सुरु झाले. माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी FY २० साठी ३.३% फिस्कल डेफिसिटचे लक्ष्य ठेवले आहे.

मंत्रिमंडळाने २८ PSU च्या विनिवेशाला मंजुरी दिली आहे. BPCL खरेदी करण्यासाठी सरकारकडे काही अर्ज आले आहेत. डिसेम्बर २०१९ अखेरपर्यंत अर्ज मागवले आहेत. मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत BPCL आणि इतर ४ PSU कंपन्यांमधील विनिवेशाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यात काँकॉर आणी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा समावेश असण्याची शक्यता आहे. BPCL च्या विक्रीतून Rs ६०००० कोटी मिळतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत विनिवेशातून Rs १७३६४ कोटी जमा झाले आहेत.

PFC ने जाहीर केले की ज्या DISCOM चे कर्ज थकबाकी झाले आहे अशा DISCOM ना नवीन कर्ज दिले जाणार नाही. या त्यांच्या घोषणेनंतर PFC च्या शेअरमध्ये तेजी आली.

USAच्या डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सने ग्रॅनाईटवरील प्रिलिमिनरी काउंटरव्हेलिंग ड्युटी ४.३२% वरून ८३.७९% केली.याचा परिणाम PESL(पोकर्णा इंजिनीअर्ड स्टोन लिमिटेड) या १००% पोकरणाच्या सबसिडीअरीवर होईल पोकर्णा या कंपनीचा ६८% बिझिनेस USA च्या निर्यातीवर अवलंबून असल्यामुळे हा शेअर पडला.

VOKHARDTचा बिझिनेस खरेदी करण्यासाठी आम्ही योग्य संधीची वाट बघत आहोत असे DR रेड्डीजने सांगितले. या DR रेड्डीजच्या घोषणेनंतर VOKHARDT चा शेअर पडला.

मारुती वॅगन-R पेट्रोल आता BSVI झाली. या गाड्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमती कंपनी वाढवणार आहे.

CLSA ने ग्लेनमार्कचा शेअर अपग्रेड केला. टार्गेट वाढवून Rs ४१० केले. सेल स्टॅटस अपग्रेड करून बाय केले. गेल्या तीन वर्षांशी तुलना करता कंपनीची सर्व GEOGRAPHY मध्ये ग्रोथ दिसली.

आज मार्केट रेंज बाउंड होते. काहीतरी ट्रिगरची वाट बघत आहे असे वाटत होते. BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०२८४ NSE निर्देशांक निफ्टी ११८८४ बँक निफ्टी ३०९९२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.