आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० नोव्हेंबर २०१९

\आज क्रूड US $ ६०.६९ प्रती बॅरल ते US $ ६०.९५ प्रती बॅरल या दरम्यान तर रूपया US $१=Rs ७१.६८ तर US $ ७१.८६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९० तर VIX १५.२० होते.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटीची फेज १ यशस्वीरीत्या पुरी होण्यात अडचणी येत आहेत. USA च्या सिनेटने हाँगकाँग संबंधात चीनची निंदा करणारा ठराव मंजूर केल्यामुळे या अडचणीत भर पडली आहे. ट्रम्प यांनी असे सांगितले की जर ट्रेड डीलवर सहया झाल्या नाहीत तर USA पुन्हा टॅरिफ वाढवण्याचा विचार करेल.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत BPCL, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि काँकॉर या तीन PSU मधील स्टेक विकण्याला मंजुरी दिली जाईल अशी शक्यता आहे. सरकार लवकरच BEL, BEML, NALCO, GAIL, NTPC, IOC, HPCL, PFC, SAIL (तीन लॉसमेकिंग युनिट्स), पॉवर ग्रीड, NMDC, स्कुटर्स इंडिया, ITDC, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, पवन हंस, या PSU मधील आपला स्टेक ५१% पेक्षा कमी करण्यावर निर्णय घेईल. प्रत्येक PSU चे व्यवस्थापन मालकीबरोबर ट्रान्स्फर करायचे की नाही हे प्रत्येक PSU ची स्थिती बघून ठरवेल.

सेबी PMS (पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस) च्या बाबतीत काही नियमात बदल करण्याचा विचार करत आहे. PMS ची नेट वर्थ किमान Rs ५ कोटी असली पाहिजे. PMS मध्ये किमान गुंतवणूक Rs ५० लाख असली पाहिजे. तसेच सेबी राईट्स ईशूची मुदत ५९ दिवसांवरून ३१ दिवस करण्याचा विचार करत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे उसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबर अर्धा झाला तरी अजूनही या राज्यात साखर उत्पादक कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला नाही. उसाच्या कमी उत्पादनामुळे सर्व साखर कारखान्यांना पुरेल एवढा ऊस उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. ISMA ने साखर उत्पादनाचा अंदाज २६ MT होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

येस बँकेतून राणा कपूर यांनी पूर्णपणे एक्झिट घेतला आहे. आज RBI ने पुन्हा येस बँकेला NPA डायव्हर्जन्स आहे असे कळवले.

स्पाईस जेटने गल्फ एअर बरोबर नेटवर्किंग साठी करार केला आहे. लवकरच म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत ७३७-MX साठी सेफ्टी सर्टिफिकेट मिळेल.

महिंद्रा आणि महिंद्रा BSIV छोट्या कमर्शियल वाहनांवर Rs ८००० डिस्काउंट देत आहे.

टाटा मोटर्सनी देशभरात २१ नोव्हेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मोफत वाहन चेकिंग ऑफर केले आहे. तसेच स्पेअर पार्ट्सवर १०% डिकाउंट देऊ केला आहे.

JSW स्टीलने सोमवारी ७२.७ कोटी तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

भारती एअरटेल, वोडाफोन, आणि MTNL या कंपन्यांनी सरकारला अनुक्रमे Rs १३९०४ कोटी, Rs १७९८४ कोटी, आणि Rs ५८५ कोटी स्पेक्ट्रम युसेज चार्जेस देणे बाकी आहेत.

सनफ्लॅग आयर्न या कंपनीमध्ये प्रमोटर्सनी ० .८८% स्टेक खरेदी केला.

ब्रिटानिया कंपनीने असे सांगितले की ग्रामीण भागात कमी होत असलेल्या मागणीमुळे, लोकांच्या हाती असलेले उत्पन्न कमी झाल्यामुळे, आणि लिक्विडीटी कमी झाल्यामुळे कंपनीने आपली नवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लाँच करणे एक वर्षभर पुढे ढकलले आहि. ता त्यांच्या निवेदनानंतर ब्रिटानियाच्या शेअरमध्ये मंदी आली.

RBI ने DHFL चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स भंग करून IOB च्या MD आणि CEO सुब्रमण्यम कुमारना ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमले. आता DHFLची केस IBC अंतर्गत रेझोल्यूशनसाठी जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०६५१ NSE निर्देशांक निफ्टी ११९९९ बँक निफ्टी ३१३५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.