आजचं मार्केट – २१ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.०२ प्रती बॅरल ते US $ ६२.३३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७६ ते US $१=Rs ७१.८४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.८६ आणि VIX १५.२० होते.

USA आणि चीन यांच्या ट्रेड वाटाघाटीचा फेज १ आता २०१९ या वर्षात पूर्ण होईल की नाही या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. चीनच्या वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले की आम्ही आमच्याकडून फेज १ पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. यासाठी USA बरोबर आम्ही चर्चा चालू ठेवू.

सरकारने आपला उद्योगाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणारे सरकार हा लौकिक कायम केला. आज मंत्रिमंडळाने BPCL, CONCOR, आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या तीन कंपन्यांमधील सरकारचा स्टेक विकायला मंजुरी दिली. BPCL कंपनीच्या नुमालीगढ रिफायनरी वगळता सरकार ही कंपनी विकून टाकेल. (कारण नुमालीगढ रिफायनरी ही BPCLच्या एका सबसिडीअरीच्या मालकीची असून त्यात सरकारचा डायरेक्ट स्टेक नाही) काँकॉर मधला ३०% स्टेक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील आपला संपूर्ण स्टेक सरकार विकेल. या तिन्हीही कंपन्यांची व्यवस्थापनही खरेदी करणार्याच्या हातात सोपवले जाईल.

मार्केट कितीही अनिश्चित, कितीही हेलकावे खाणारे ( वोलटाइल) असले तरी काही नियम अनुभवसिद्ध असतात. त्यापैकी ‘बाय ऑन रुमर एन्ड सेल ऑन न्युज’ हा एक महत्वाचा नियम आहे. त्याचे सटीक दर्शन आपल्याला आजच्या मार्केटमध्ये घडले. जोपर्यंत विनिवेशाबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते तोपर्यंत या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. पण आज निश्चित बातमी येताच लोकांनी विक्री केली त्यामुळे BPCL, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि काँकॉर या शेअरचे भाव बरेच खाली आले. या बरोबरच THDC आणि निपको या अनलिस्टेड कंपन्यांमधील आपला स्टेक सरकार विकेल.
SAIL या कंपनीमधील ( तीन लॉसमेकिंग प्लांट्स) आपला स्टेक विकण्याची प्रक्रिया सरकार हळूहळू सुरु करील. पण व्यवस्थापन मात्र आपल्याकडेच ठेवेल.

KIOCL च्या मंगलोर युनिटच्या विस्तारासाठी सरकारने मंजुरी दिली.

RBI ने DHFL या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रद्द करून त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटर नेमला. IBC खाली या कंपनीचे रेझोल्यूशन करण्यात येईल. या कंपनीचे रिटेल आणी होलसेल बुक खरेदी करण्यात अडानी ग्रुप, पिरामल ग्रुप आणि अपोलो यांनी स्वारस्य दाखवले. या बातमीनंतर DHFL च्या शेअरला अपर सर्किट लागले.

रोड सेक्टरमध्ये खाजगी कंपन्या येत नव्हत्या. कारण त्यांना या प्रोजेक्ट्ससाठी बँकांकडून सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नव्हते. आता NHAI बँकांना टोल कलेक्शनची पावती दाखवून त्याच्या तारणावर कर्ज घेऊ शकेल. याला टोल सेक्युरायटीझेशन म्हणण्यात येईल. पूर्वी २ वर्षे टोल कलेक्ट केल्यावर प्रोजेक्टचे मोनेटायझेशन करता येत होते. आता ही मुदत १ वर्ष केली. टोल कलेक्शन पिरियड किमान ३० वर्षांवरून १५ ते ३० वर्षे केला.

सरकार आणि इन्फ्रा कंपन्यांमध्ये आर्बिट्रेशनची प्रक्रिया पुरी होऊन जर कंपनीच्या बाजूने आर्बिट्रेशन अवॉर्ड ग्रांट झाले असेल तर अशा अवॉर्डची ७५% रक्कम सरकार ताबडतोब देईल. या सरकारच्या निर्णयाचा फायदा PNC इन्फ्राटेक, अशोक बिल्डकॉन IRB इन्फ्रा, जयकुमार इन्फ्रा, KNR कन्स्ट्रक्शन, L & T, NCC, HCC, सदभाव इंजिनीअरिंग, सिम्प्लेक्स मान इंडस्ट्रीज, पुंज लॉईड, गॅमन इंडिया, दिलीप बिल्डकॉन या कंपन्यांना होईल.

सरकारने टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसाठी स्पेक्ट्रम चार्जेसचे पेमेंट करण्यासाठी २ वर्षांचे मोरॅटोरियम जाहीर केले. मात्र हे चार्जेस माफ केले जाऊ शकत नाहीत हे स्पष्ट केले. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांसाठी ही सूट दिली जाणार आहे पण या बाकी रकमेवर व्याज मात्र आकारले जाईल. तसेच AGR ड्यूजवर सुप्रीम कोर्टच निर्णय घेऊ शकेल असे सांगितले.

आज सेबीने आपल्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विषयीच्या नियमांत बदल केले. राईट्स इशूसाठी आता तुम्ही फक्त ASBA च्या पद्धतीनेच अर्ज करू शकाल. तसेच राईट्स इशूची मुदत ३१ दिवस केली. लिस्टेड कंपन्यांनी जर कर्जावरील व्याज किंवा मुद्दलाच्या परतफेडीत डिफाल्ट केला तर त्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला ३० दिवस उलटल्यावर २४ तासात दिली पाहिजे

भारतातून चीनमध्ये PYRIDINE निर्यात होते. यावर चीनने लावलेली १७.५% ऍन्टीडम्पिंग ड्युटी चीनने काढून टाकली. याचा फायदा ज्युबिलांट लाईफला मिळेल.

एस्सेल ग्रुपने आपला झी एंटरटेनमेंट मधील १६.५% ( १५ कोटी शेअर्स) विकला. या विक्रीच्या प्रोसिड्सचा उपयोग कर्ज फेडीसाठी करण्यात येईल.

आदित्य बिर्ला कॅपिटल ने एसेल ग्रुपला दिलेल्या Rs ८०० कोटी कर्जाची वसूली होईल. म्हणून हा शेअर वाढला.
पुराणिक बिल्डर्स ही रिअल्टी क्षित्रतील कंपनी लवकरच आपला Rs १००० कोटींचा IPO आणणार आहे.
सोनी कॉर्प ही कंपनी मुकेश अंबानींच्या इंडियन टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीतील स्टेक विकत घेणार आहे.

SBI आपला SBI कार्ड मधील ७४% स्टेक पैकी १४% स्टेक या कंपनीच्या IPO द्वारा विकणार आहे. ही भारतातील नम्बर २ ची क्रेडिट कार्ड कंपनी असून १८% मार्केट शेअर आहे. या कंपनीचे ९५ लाख ग्राहक असून व्हॅल्युएशन Rs ५७००० कोटी आहे. ह्या IPO तुन SBI Rs ८००० कोटी उभारेल. आज SBI कार्ड नी या IPO साठी DRHP दाखल केले. ही बातमी येताच SBI च्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली.

इन्फोसिसने WM PROM या कंपनी बरोबर ऑटोमेशन सर्व्हिसेससाठी करार केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०५७५ NSE निर्देशांक निफ्टी ११९६८ बँक निफ्टी ३१३४९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.