आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.५२ प्रति बॅरल ते US $ ६३.९२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७० ते US $१=Rs ७१.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.८३ तर VIX १४.५० होते.

आज USA च्या DHS (डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीज) ने H १B व्हिसाच्या स्पेशालिटी ऑक्युपेशनच्या व्याख्येत बदल केला. यामुळे सगळ्यात हुशार आणि कर्तृत्ववान परदेशी नागरिकांनाच H १ B व्हिसा मिळणे शक्य होईल. त्यामुळे सरसकट H१B व्हिसामिळणे कठीण होईल. USA मध्ये H १ B व्हिसाहोल्डर्सच्या स्पॉउसला नोकरी करण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे ती मार्च २०२० पासून अमलात आणण्यात येईल. H १B व्हिसाचे नियम कडक करून त्यांना योग्य तो पगार द्यावा लागेल यासाठी नियमात बदल करण्यात येतील.तसेच इंट्रा कंपनी ट्रान्स्फरसाठी उपयोगात येणाऱ्या L १ व्हिसाच्या नियमात बदल करण्यात येतील. गोल्डमन साक्सनी IT सेक्टरमधील दिग्गज कंपन्यांना डाऊनग्रेड केले. त्यामुळे आज IT सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी होती. IT सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स प्रीमियमवर ट्रेड होत आहेत. सायक्लिकल ट्रेंडमध्ये येणाऱ्या अडचणींचा IT सेक्टरला सामना करावा लागेल. परिणामी TCS, इन्फोसिस, HCLTEK, ,माइंडट्री, विप्रो, टेक महिन्द्रा यां कंपन्यांचे शेअर पडले

RITES या कंपनीचा OFS ( ऑफर फॉर सेल) २२ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु झाला. आज नॉन रिटेलसाठी होता. २५ नोव्हेंबर २०१९ ला हा रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओपन होऊन २५ नोव्हेम्बरलाच बंद होईल. याची फ्लोअर प्राईस Rs २९३.५० आहे.

आटा, साखर खाद्यतेल यांच्या किमती वाढल्याने ब्रिटानिया इंडस्ट्रीज आपल्या प्रॉडक्ट्सच्या किमती वाढवणार आहे.
RBI ने आज DHFL ऍडमिनिस्ट्रेशनसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली. यात राजीव लाल, N. S. कन्नन आणी N.S. वेंकटेश यांचा समावेश असेल.

पेट्रोनेट LNG ने BPCL च्या कृष्णपट्टणम येथील LNG टर्मिनस खरेदी करण्याची डील केले होते. आता या डीलविषयी BPCL च्या विनिवेशामुळे थोडी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

M & M ने नवीन मिनिट्रक Rs ३.८७ लाखना लाँच केला.

आज २२ नोव्हेंबर २०१९ रोजी CSB बँकेचा IPO ओपन झाला. पहिल्या दिवशीच हा IPO पूर्णपणे भरला. रिटेल इंव्हेस्टरचा चांगला प्रतिसाद मिळाला . २६ नोव्हेंबर २०१९ रोजी CSB बँकेचा IPO बंद होईल.

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी MSCI निर्देशांकाचे रीबॅलन्सिंग होईल. २७ नोव्हेंबर २०१९ पासून काही नवीन शेअर या निर्देशांकात समाविष्ट केले जातील तर काही शेअर्स या निर्देशांकातून बाहेर पडतील.

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी, (२८ नोव्हेंबरच्या एक्स्पायरीनंतर) F & O मार्केटमधून बँक ऑफ इंडियाचा शेअर बाहेर पडेल

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी NMDC च्या डीमर्जर विषयी निर्णय येईल तसेच GDP चे आकडे येतील.

MRO ( मेंटेनन्स, रिपेअर्स आणि ओव्हरहालिंग) वरील GST १८% वरून ५% केला जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा स्पाईस जेट, तनेजा एअरोस्पेस या कंपन्यांना होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३५९ NSE निर्देशांक निफ्टी ११९१४ बँक निफ्टी ३११११ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.