आजचं मार्केट – २५ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.४७ प्रति बॅरल ते US $ ६३.५८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६४ ते US $१=Rs ७१.७१ च्या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२० तर VIX १४.४० होते.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे जे महानाट्य चालू आहे त्याकडे शेअरमार्केट बारकाईने लक्ष ठेवून आहे. कारण आंध्र प्रदेशात सरकार बदलल्यावर नवीन आलेल्या सरकारने आधीच्या सरकारने मंजूर केलेले सर्व प्रकल्प रद्द केले. याचा मोठा फटका NCC ला बसला. महाराष्ट्रात मेट्रो रेल आणि समृद्धी महामार्ग असे Rs १ लाख कोटीपेक्षा जास्तीचे प्रकल्प चालू आहेत. नवीन आलेल्या सरकारने हे प्रोजेक्ट रद्द केले तर स्थैर्य आणि सातत्य या दोन्ही गोष्टींवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. या प्रोजेक्टचे काम मिळालेल्या कंपन्यांचे भारी नुकसान होईल.

२३ डिसेंबर २०१९ पासून BSE निर्देशांक सेन्सेक्समधून टाटा मोटर्स, टाटा मोटर्स DVR, येस बँक आणि वेदांता ह्या कंपन्या बाहेर पडतील तर टायटन, अल्ट्राटेकसिमेंट, आणि नेस्ले या कंपन्यांचा समावेश होईल.

कारवी स्टॉक ब्रोकिंग या शेअरमार्केटमधील जुन्या आणि प्रस्थापित ब्रोकिंग कंपनीमध्ये Rs २१०० कोटींचा घोटाळा झाल्यामुळे सेबीने त्यांना नोटीस बजावली आहे. हा घोटाळा मुख्यतः डॉरमन्ट डिमॅट अकौंट्सही संबंधित आहे. सेबीने कार्वी स्टॉकब्रोकिंगला नवीन ग्राहक जोडण्याची, तसेच वर्तमान ग्राहकांचे सौदे घालायला मनाई केली आहे. याचा परिणाम म्हणून ग्राहक ब्रोकरकडून डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी बँकांकडे जातील. उदा कोटक महिंद्र, ऍक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, (या सर्वांचे ब्रोकिंग चा बिझिनेस आहे)

कार्व्हीच्या केसमध्ये POA चा गैरवापर करून ग्राहकांच्या डिमॅट अकौंट मधून शेअर ट्रान्स्फर करून हे शेअर कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आले किंवा विकून टाकण्यात आले.

कारवी स्टॉक ब्रोकिंगला ज्या बँकांनी कर्ज दिले आहे त्यांच्याही शेअर्समध्ये मंदी आली – ICICI बँक, DCB बँक.
मी POA चा गैरवापर आणि त्याबद्दल घ्यायची काळजी या बाबत ब्लॉगमधून अनेक वेळेला सावधानतेचा इशारा दिलेला आहे.  माझी वहिनी या मासिकासाठी लिहिलेला लेख नंबर ५ ‘पॉवर ऑफ अटॉर्नी’ या विषयावर ‘चक्रव्यूह पॉवर ऑफ अटॉर्नीचा’ हा लेख आहे.

RITES या कंपनीचा OFS आज रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन होता. नॉन रिटेल इन्व्हेस्टरसाठी असलेला कोटा पूर्णपणे भरला.

युनिकेम लॅबला USFDA कडून रक्तदाबाच्या औषधासाठी परवानगी दिली.

आंध्रमध्ये मद्यार्क पुरवणाऱ्या बार्सची संख्या ४०% ने कमी केली जाणार आहे. याचा परिणाम मद्यार्क उत्पादक कंपन्यांवर होईल.

ऍपल भारतात I फोन XR हे मॉडेल बनवणार आहे. याचा फायदा रेड्डींग्टन या कंपनीला होईल.

मुथूट फायनान्स या कंपनीने IDBI बँकेचा AMC बिझिनेस Rs ११५ कोटींना खरेदी करणार आहे.

CSB बँकेचा IPO आज ४.२८ पट ओव्हरसब्सक्राइब झाला.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०८८९ NSE निर्देशांक निफ्टी १२०७३ बँक निफ्टी ३१५५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.