आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.५६ प्रती बॅरल ते US $ ६३.७८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५३ ते US $१=Rs ७१.६४ या दरम्यान होत. US $ निर्देशांक ९८.३१ तर VIX १५ होते.

USA आणि चीनमधील ट्रेड वॉरमध्ये सकारात्मक प्रगती दिसून येत असल्यामुळे आज मार्केटमध्ये तेजी होती. त्यात काही शेअर्सचा MSCI निर्देशांकात समावेश झाला तर ICICI बँकेचे वेटेज वाढल्यामुळे याही शेअर्समध्ये तेजी आली. एकूणच मार्केटमध्ये तेजी होती. पण टेलिकॉम सेक्टरला सरकारने सवलतीसाठी सुप्रिम कोर्टाकडे निर्देश केल्यामुळे आणि सवलतींवर विचार करण्यासाठी नेमलेली समिती रद्द केल्यामुळे मंदी होती.

आज निफ्टी आणि बँक निफ्टी आणि सेन्सेक्स यांनी इंट्राडे ऑल टाइम हाय साजरे केले. पण त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यामुळे अर्थातच देवेंद्र फडणवीसांकडे बहुमत राहिले नाही म्हणून तेही राजीनामा देणार हे निश्चित होताच मार्केट पडू लागले. त्यामुळे आज उलटसुलट येणाऱ्या बातम्यांमुळे तेजी मंदीचा खेळ मार्केटमध्ये पाहायला मिळाला.

इराण आणि इराकमध्ये अशांती असल्याने क्रुडमध्ये तेजी होती चीनचि क्रूडसाठी मागणी वाढली आहे. ५-६ डिसेंबर २०१९ रोजी ओपेक आणि इतर ऑइल उत्पादक देशांची मीटिंग होणार आहे

ज्योती लॅबच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले ६.१३% शेअर्स सोडवले.

गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्सनी PIAGGIO बरोबर CV च्या मार्केटिंगसाठी करार केला.

स्पेक्ट्रम युसेज चार्जेस आणि लायसेन्स फीज या मध्ये आतां कोणतीही कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये मंदी होती.

इंडियन रेल्वेज १००००० CCTV कॅमेराज स्टेशन मध्ये आणि गाड्यांमध्ये बसवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी Rs १० बिलियन खर्च अपेक्षित आहे. यासाठी ९ कंपन्यांनी बीड केले आहे. यात BEL, ITI, HFCL TCIL या सरकारी कंपन्यांचा आणि खाजगी क्षेत्रातील स्टरलाईट, विंध्या,M२M या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी ५ कंपन्यांना काम दिले जाण्याची शक्यता आहे.

CSB बँकेचा IPO ८७ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०८२१ NSE निर्देशांक निफ्टी १२०३७ बँक निफ्टी ३१७१८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.