आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.१८ प्रती बॅरल ते US $ ६४.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $१=Rs ७१.३७ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९८.३५ आणि VIX १४.६० होते.

‘CARTOSAT’३ हा उपग्रह लाँच केला. २७ मिनिटात १४ सॅटॅलाइट लाँच होतील. हा सैन्यासाठी खूप उपयोगी आहे. अतिशय जवळून साधारण १ फुटाच्या अंतरावरून फोटो घेऊ शकतील. यामुळे संरक्षण खात्याशी संबंधीत शेअर्स वाढले. उदा HAL.

१५ व्या वित्त आयोगाची मुदत ३० नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे. ही मुदत १ वर्षांसाठी वाढवली जाईल. फिस्कल डेफिसिटचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी थोडा जास्त अवधी मिळेल.

धान्याच्या पॅकिंगसाठी १००% ज्यूटचा वापर तर साखरेच्या पॅकिंगसाठी २०% ज्यूटचा वापर करावा लागेल. याचा फायदा ग्लॉस्टर, CHEVIOT, LUDLOW ज्यूट या कंपन्यांना होईल.

एव्हिएशन मंत्रालयाने सांगितले की एअर इंडिया ही कंपनी विकली गेली नाही तर बंद करावी लागेल. याचा फायदा स्पाईस जेट आणि इंडिगो या कंपन्यांच्या शेअर्सना झाला

BPCL मधील स्टेक विकण्यासाठी उद्या सरकारची बँकर्सबरोबर बैठक आहे. यासाठी सल्लागार नेमला जाण्याची जरूर आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा IPO २ डिसेंबर २०१९ पासून ओपन होईल आणि ४ डिसेम्बरला क्लोज होईल. मिनिमम लॉट ४०० शेअर्सचा असेल. उज्जीवन फायनान्सियल सर्व्हिसेसच्या वर्तमान शेअरहोल्डर्स साठी Rs ७५ कोटीचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून त्यांना Rs २ प्रती शेअर डिस्काउंट असेल. प्राईस बँड Rs ३६ ते Rs ३७ असेल. हा IPO आल्यानंतर आता लिस्टेड असलेली कंपनी होल्डिंग कंपनी होईल.

IOC ही OMC आता आपला विस्तार कार्यक्रम दक्षिण आशिया, आफ्रिका, MIDDLE ईस्ट, या सर्व ठिकाणी करील. IOC चे पेट्रोल पंप मियांमार, श्री लंका, बांगला देश, या देशात दिसतील. पारादीप रिफायनरीतुन या पेट्रोल पंपांना पुरवठा केला जाईल. यासाठी Rs १०००० ते Rs १५००० कोटी गुंतवणूक करण्यात येईल.

क्रेडिट ग्रामीण ऍक्सेस ही कंपनी ‘मदुरा मायक्रो फायनान्स’ मध्ये ७६.२% स्टेक Rs ६७० कोटींमध्ये खरेदी करेल.
येस बँकेने रिलायन्स कॅपिटल चे १७ लाख शेअर्स Rs २.८० कोटींना विकले.येस बँक नवीन इक्विटी शेअर्स इशू करून भांडवल उभारणी करण्यावर शुक्रवारच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत विचार करेल.

एसेल ग्रुपने HDFC AMC ला Rs १६७ कोटी परत फेड केली. त्यामुळे HDFC AMC चा शेअर वाढला.

अशोक लेलँडला तामिळनाडू ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीकडून १७५० बससाठी ऑर्डर मिळाली. त्यांनी ऑटोफायनान्ससाठी ऍक्सिस बँकेबरोबर करार केला.

महाराष्ट्रात कालपासून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. याचा फायदा हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला होईल. लवासाच्या बाबतीत काही तोडगा निघेल. त्याचप्रमाणे शेतकऱयांची कर्ज माफ केली गेल्यामुळे फायनान्सियल्सवर ( बँका आणि सहकारी बँका) ताण येईल.

आज स्क्रॅपेज पॉलिसीच्या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. पण या पॉलिसीवर निर्णय झाला नाही. अजूनही काम बाकी आहे असे सांगण्यात आले.

आता AC आणि फ्रीझ मध्ये एनर्जी लेव्हलिंगसाठी फोम ऐवजी व्हॅक्युम पॅनल बसवण्याची सरकारने सूचना केली आहे. प्रथम ५ स्टार AC आणि फ्रीझमध्ये बसवण्यात येईल. त्यामूळे AC आणि फ्रीझ च्या किमती Rs ५००० ते Rs ६००० नी वाढतील..या बदलामुळे प्रदूषण कमी होईल.

प्राईस कंट्रोलखाली असलेल्या औषधासाठी ३०% पेक्षा जास्त मार्जिन ठेवता येणार नाही.त्यामुळे औषधांच्या किमती कमी होतील पण औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा तोटा होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१०२० NSE निर्देशांक निफ्टी १२१०० बँक निफ्टी ३१८७५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.