आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.६२ प्रति बॅरल ते US $ ६३.८८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३५ ते US $१= Rs ७१.६५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३६ तर VIX १३.८० होते.

USA च्या संसदेने हाँगकाँगच्या संदर्भात निंदाव्यंजक ठराव पास केल्याबद्दल चीनने आपली नाराजी जाहीर केली. त्यामुळे आता चीन आणि USA यांच्या ट्रेड वाटाघाटीत पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे.

आज सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी रेकॉर्ड स्तरावर क्लोज झाले. आज रिलायन्स इंडस्ट्रीजने Rs १० लाख कोटींची मार्केट कॅप पार केली. ही मर्यादा पार करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील पहिली कंपनी आहे.

सरकार पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. आर. बी. आय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) सर्व बँकांचे स्ट्रेस्स्ड ऍसेट खरेदी करण्यासाठी एक फंड सुरु करेल.या फंडासाठी रिझर्व्ह बँक भांडवल पुरवेल आणि त्याचे संचालनही रिझर्व्ह बँक करेल. हा फंड सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे स्ट्रेस्ड ऍसेट खरेदी करेल. नंतर या सर्व स्ट्रेस्ड ऍसेटचे मोनेटायझेशन हा फंडच करेल. यामुळे सरकारी बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणी ज्यांना क्रेडिटची गरज आहे त्यांना सहज कर्ज उपलब्ध होईल. तसेच स्ट्रेस्ड ऍसेटसाठी वापरली जाणारी शक्ती वेळ आणि पैसा सरकारी बँका क्रेडिट एक्स्पान्शनसाठी वापरू शकतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर पडलेले मंदीचे सावट दूर व्हायला मदत होईल.ही बातमी आल्यावर बँक निफ्टी आज कमाल स्तरावर बंद झाला. सर्व सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी आली. २००८ मध्ये USA मध्ये ट्र’बल्ड ऍसेट्स रिलीफ प्रोग्रॅम’च्या धर्तीवर हा फन्ड काम करण्याची शक्यता आहे

NBFC साठी असलेले स्ट्रेस्ड अकौन्टच्या नियमात एक वर्ष सवलत देण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे सर्व NBFC मध्येही तेजी आली.

दिल्ली हाय कोर्टात इंडिया बुल्स हौसिंगच्या केसमध्ये कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने कोर्टात ऍफिडेव्हिट सादर केले की त्यांना इंडिया बुल्स हौसिंग आणि इंडिया बुल्स व्हेंचर यांच्याविषयी केलेल्या चौकशीचा रिपोर्ट मिळाला आणि त्या रिपोर्टमध्ये कोणतीही गडबड झाली नाही असे नमूद केले आहे. सिटीझन व्हिसलब्लोअर फोरमने अशी तक्रार केली होती की येस बँकेने IBHF चे प्रमोटर समीर गेहलोत यांच्या ग्रुप कंपन्या (या कंपन्यांची नेट वर्थ निगेटिव्ह असताना) Rs ५६९८ कोटींचे कर्ज दिले. समीर गेहलोत हे यासाठी गॅरंटर राहिले होते. येस बँकेने सांगितले की आम्ही कर्ज नियमानुसार दिली आहेत. समीर गेहलोत यांची नेट वर्थ Rs १५००० कोटींपेक्षा जास्त आहे. इंडिया बुल्स ग्रुपने येस बँकेचे भूतपूर्व सीइओ राणा कपूर यांच्याशी संबंधित कंपन्यांना आणि व्यक्तींना Rs २६३८ कोटीची कर्ज दिली. ही सर्व कर्ज नियमानुसार दिली आहेत असे सांगितले.  या सर्व कर्ज देण्यात इंडिया बुल्स हौसिंग आणि इंडिया बुल्स व्हेंचर यांची चौकशी एका समितीने केली होती.ही बातमी आल्यावर इंडिया बुल्स ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये तेजी आली .

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्याजवळील जनधन खात्यांमध्ये Rs ८०००० कोटी आहेत असे सांगितले.

आज सरकारने संसदेत Rs १८८९५ कोटींच्या पूरक मागण्यासाठीं विधेयक सादर केले. यात IDBI बँकेसाठी Rs ४५०० कोटी आणि इन्शुअरन्स कंपन्यांसाठी Rs २५०० कोटींच्या मागणीचा समावेश आहे.

शिवा सिमेंटला नवीन लाइमस्टोनची खाण अलॉट झाली. ही खाण त्यांच्या प्लॅंटजवळ असल्यामुळे त्यांना सोयीची होईल. यामुळे शिवा सिमेंटची उत्पादन क्षमता १४ mpt वरून २५ mpt होईल.

बालाजी अमाईन्स या कंपनीच्या चिंचोली युनिटला ग्रीन मंजुरी मिळाली.

येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची भांडवल उभारणीवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
इ-सिगारेटवर बंदी घालण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर झाले. याचा फायदा गॉडफ्रे फिलिप्सला झाला.

आज सरकारने जाहीर केले की येत्या तीन महिन्यात Rs ५०००० कोटींची रोड प्रोजेक्ट्स जाहीर करेल.

आज ऑक्टोबर २०१९ ची एक्सपायरी होती. ए सी सी, अंबुजा सिमेंट, मॅक्स फायनान्सियल, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, टी सी एस,

एल एन्ड टी फायनान्सियल होल्डिंग, युनायटेड ब्रुअरीज, ऍक्सिस बँक, पी एन बी , आय सी आय सी आय बँक, बर्गर पेंट्स, या शेअर्समध्ये ७५% च्यापेक्षा जास्त रोलओव्हर झाले.

उद्या Q २ साठी जी डी पी चे आकडे येतील.

१ डिसेम्बरला ऑटो विक्रीचे आकडे येतील. तसेच टेलिकॉम कंपन्या आपले सेवा दर वाढवतील.

४ डिसेंबर २०१९ रोजी CSB बँकेचे लिस्टिंग होईल. ५ डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक त्यांचे द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल. ११ डिसेंबर २०१९ रोजी आरामकोचे लिस्टिंग होईल.

१२ डिसेम्बरला UK मध्ये सार्वत्रिक मतदान होईल.ब्रेक्झिटवर निर्णय होण्याची शक्यता आहे

२२ डिसेंबर २०१९ अखेर सेन्सेक्समधील बदल अमलात आणण्यात येतील.

२६ डिसेंबर २०१९ च्या एक्स्पायरी पासून हेक्झावेअर, टाटा एलेक्सि, युनियन बँक हे शेअर्स F &O मधून बाहेर पडतील. .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४११३० NSE निर्देशांक निफ्टी १२१५१ बँक निफ्टी ३२१२२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.