आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.४४ प्रति बॅरल ते US $ ६३.७८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६६ ते US $१=Rs ७१.७२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२८ VIX १३.७५ होते.

आज CDSL या कंपनीचा OFS सुरु झाला. या OFS साठी फ्लोअर प्राईस Rs २०५ होती.

फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीची रेटिंग देणे रेटिंग एजन्सीजने बंद केले.

भारती एअरटेलने रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी Rs ९५०० कोटींची बीड दिली.

झारखंड राज्यामध्ये उद्या विधानसभेसाठी मतदानाची पहिली फेरी होईल.

उद्या RBL बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची भांडवल उभारणीवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

GDP ग्रोथ FY २०१९-२०२० च्या दुसऱ्या तिमाहीत ४.५% अपेक्षेपेक्षा कमी राहिली. त्यामुळे RBI त्यांच्या द्विमासिक वित्तीय धोरणात रेटकट करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करेल.

अशोका बिल्डकॉन या कंपनीला Rs १०२५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

ज्या कंपन्यांचे सरकारी खात्याच्या कामासंबंधातील आर्बिट्रेशन अवॉर्ड मंजूर झाली आहेत त्यांना अवॉर्डची ७५% रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

सरकारने BPCL मधील आपला स्टेक विकण्यासाठी डेलॉइट या ऑडिट कंपनीला सल्लागार म्हणून नेमले आहे.

ग्रॅन्युअल्सच्या युनिटच्या USFDA ने केलेल्या ऑगस्ट २०१९ मध्ये केलेल्या तपासणीत दोन त्रुटी दाखवल्या आणि ईआयआर (एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट) दिला.

आज दिल्ली हायकोर्टाने इंडियाबुल्स व्हिसलब्लोअर खटल्यात सुनावणी तारीख २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पुढे ढकलली.

आज या खटल्यात IBHF ग्रुपला क्लीन चिट मिळेल या अपेक्षेने वाढत असलेले या ग्रुपचे शेअर्स ही बातमी येताच पडायला लागले.

टोटल होल्डिंग एस ए एस या फ्रेंच कंपनीला अडानी गॅसमध्ये ३७% स्टेक खरेदी करण्यासाठी

सी सी आय ने (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) परवानगी दिली. अडानी ग्रुपमधल्या बहुतेक कंपन्यांनी ट्रेडर्सना, गुतंवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवू दिले आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०९७३ NSE निर्देशांक निफ्टी १२०५६ बँक निफ्टी ३१९४६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २९ नोव्हेंबर २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.