Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!
आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०१९
आज क्रूड US $ ६६.४२ प्रति बॅरल ते US $ ६६.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७१.२७ आणि US $१= ७१.३५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६४ तर VIX ११.३० होता
आज २०१९ वर्षांचा शेवटचा दिवस, वर्षभरातील आठवणींचा, अनुभवांचा, यशापयशांचा कल्लोळ मनात उठतो. नवीन वर्षात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी निक्षून टाळाव्यात याचा आपण विचार करतो. आणि शेवटी नवीन वर्षाच्या उगवणाऱ्या सूर्याला नमन करून अधिक चांगल्या, अधिक सुखकारी, यशस्वी, संपन्न वर्षाच्या अपेक्षेने आपल्या मनाला बजावतो ‘HAAPY NEW YEAR’ आणि दुसऱ्यालाही असेच बजावत नव्या वर्षाचे उत्साहाने,आनंदाने स्वागत करतो. माझ्या सर्व वाचकांना, विद्यार्थ्यांना, शुभचिंतकांना २०२० हे वर्ष आनंदाचे सुखाचे, संपन्नतेचे, यशाचे, स्वास्थाचे जावो हीच शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
कोळशावरील कार्बन टॅक्स सरकार रद्द करेल या अपेक्षेने आज कोल इंडियाच्या शेअरमध्ये तेजी होती.
थंडीचा कडाका वाढतो आहे, त्यामुळे क्रूडसाठी मागणी वाढते आहे. USA मधील साठे कमी होत आहेत तर ओपेक+ देश आपल्या उत्पादनातील कपात प्रतिदिनी १२००० बॅरल वरून १७००० बॅरल्स वाढवणार आहेत. त्यामुळे क्रूडचे दर वाढतील अशी शक्यता आहे.
त्याचप्रमाणे चहा, कॉफी, मद्यार्क, अंडी यांचे शेअर्स तेजीत असतील. नाताळ आणि नववर्षाचे स्वागत यामुळे देशी आणि परदेशी पर्यटन,हॉटेल उद्योगात असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढतील.
कार्वी ग्रुपने आपल्या कॉर्पोरेट गृपच्या आणि ग्रुपच्या व्यवस्थापनाचे रिस्ट्रक्चरिंग करायला सुरुवात केली.
सरकार जानेवारी २०२० ते मार्च २०२० या दरम्यान OFS द्वारे ८ ते १० PSU कंपन्यांमधील आपला स्टेक विकेल. BPCL मधील आपला स्टेक विकण्यासाठी सरकारला जून २०२० पर्यंत वेळ लागेल असे वाटते.
१ जानेवारी २०२० पासून बँका NEFT सेवेसाठी चार्ज लावणार नाहीत.
डिजिटल व्यवहाराचा आवाका वाढवण्यासाठी सरकार Rs ५० कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांना MDR मध्ये सवलत देण्याची शक्यता आहे.
रतन इंडियाने आऊट ऑफ NCLT सेटलमेंट करून Rs ६००० कोटी बँकेचे कर्ज भरले. यात बँकांना ३८% हेअरकट घ्यावा लागला.
GST चे CNG आणि PNG साठी असणारे दर कमी करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे IGL, MGL, पेट्रोनेट LNG आणि गुजरात गॅस या शेअरमध्ये तेजी होती. .
जानेवारी २०२० मध्ये 5G स्पेक्ट्रमसाठी ट्रायल सुरु होईल. या स्पेक्ट्रमची अलॉटमेंट एप्रिल मे २०२० मध्ये होईल. ही अलॉटमेंट १ वर्षांकरता असेल.
१० जानेवारी २०२० रोजी इन्फोसिस आपला तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर करेल.
VA TECH WABAG ने Rs ११९० कोटीच्य प्रोजेक्टसाठी बिहार राज्य सरकारबरोबर करार केला.
SUNTECH रिअलिटी च्या ७ लोकांना फ्रॉडयुलण्ट ट्रेडिंगसाठी सेबीने Rs १४ कोटी दंड ठोठावला.
आज CARE, ICRA, आणि क्रिसिल या रेटिंग एजन्सीच्या शेअर्समध्ये तेजी होती. IL &FS संबंधात CARE ला दोषी ठरवले होते. त्यामुळे शेअर वाढत नव्हता. पण Rs २५ लाखांचा दंड करून सेबीने केस बंद केली. म्हणून आज रेटिंग एजन्सीजच्या शेअर मध्ये ही वाढ दिसली.
एअर इंडिया ही सरकारी विमानवाहतूक कंपनी विकत घेण्यामध्ये बर्याच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. पण सिविल एव्हिएशन मंत्रालयानी सांगितले की एखाद्या भारतीय कंपनीने एअर इंडिया विकत घेतली तर चांगले होईल.
जेट एअरवेजसाठी हिंदुजा BROS. बोली लावतील अशी बातमी आल्यामुळे जेट एअरवेजच्या शेअरमध्ये खरेदी दिसली.
CHALET हॉटेलने MARRIOTT बरोबर करार केल्याने CHALET च्या शेअर मध्ये तेजी होती.
आज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Rs १०५ लाख कोटीची गुंतवणूक सरकार येत्या ५ वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करेल अशी घोषणा केली. ही गुंतवणूक पॉवर, अर्बन डेव्हलपमेंट, रेल्वेज, मोबिलिटी, शिक्षण, स्वास्थ्य, जलनियोजन आदि क्षेत्रात करण्यात येईल. ही गुंतवणूक १८ राज्यात करण्यात येईल. राज्य सरकारांबरोबर विचार विनिमय करून आणि त्यांच्या सहकाराने करण्यात येईल. सरकारचा प्रयत्न राहील की या गुंतवणुकीमुळे ‘EASE OF LIVING’ आणि ‘EASE OF DOING BUSINESS’ मध्ये सुधारणा होईल. या प्रोजेक्टचे नाव सरकारने ‘नॅशनल इन्फ्रास्टक्चर पाईपलाईन’ असे ठेवले आहे. केंद्र सरकार २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत ‘ग्लोबल इन्व्हेस्टर समीट’ चे आयोजन करेल आणि सर्व राज्य सरकारांना निमंत्रित करेल.
आज सगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये, सगळ्या मार्केटमध्ये, प्रॉफीटबुकिंग दिसले. DOW आणि NASDEQ दोन्हीमध्ये गेल्यावर्षी २५% रिटर्न मिळाला. भारतात सुद्धा निफ्टीने १३% आणि सेन्सेक्सने १५% रिटर्न दिले. मार्केटमध्ये वाइल्ड स्विंग दिसले. लोकांना खरेदीची संधी मिळाली त्यानंतर मार्केट सुधारल्यावर प्रॉफिट बुकिंग करता आले. ICICI, HDFC ग्रुपच्या शेअर्सनी चांगले उत्पन्न मिळवून दिले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१२५३ NSE निर्देशांक निफ्टी १२१६८ बँक निफ्टी ३२१६१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!