आजचं मार्केट – ०२ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०२ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.३३ प्रती बॅरल ते US $ ६१.५५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६९ ते US $१=Rs ७१.७१ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९८.३० तर VIX १४.२० होते.

५ डिसेंबर २०१९ ते ६ डिसेंबर २०१९ या दोन दिवशी ओपेक + देशांची बैठक आहे. या बैठकीत दैनिक उत्पादनात १२ लाख ते १६ लाख बॅरल इतकी कपात करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज ऑटो नोव्हेंबर २०१९ साठी ऑटो विक्रीचे आकडे जाहीर झाले. हिरो मोटोची एकूण विक्री १५% ने कमी झाली पण निर्यात १७% नी वाढली. बजाज ऑटोचीही निर्यात ६% ने वाढली. M &M ची ट्रॅक्टर विक्री १९% ने कमी झाली. एस्कॉर्टस ची ट्रॅक्टर विक्री ४%ने घटली. अशोक लेलँडची विक्री YOY तरी MOM किंचित सुधारणा दिसली. मारुतीच्या पॅसेंजर विक्रीमध्ये १.९% घट झाली. जरी विक्रीत yoy घट दिसत असली तरी एकूण विक्रीमध्ये सुधारणा दिसत आहे.
ओशनिक फूड्स ही कंपनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी BSE SME प्लॅटफॉर्मवरून BSE च्या मुख्य प्लॅटफॉर्मवर आली.

टेलिकॉम सेक्टर तोट्यात चालत होता कारण स्पर्धेचा अतिरेक झाला होता. पण आता सर्व कंपन्या आपले दर वाढवत आहेत. सरकारने यासाठी २ वर्षांचा वेळ दिला आहे. त्याच बरोबर स्पेक्ट्रमसाठी बँका कर्ज द्यायला तयार आहेत. यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्या तसेच त्यांना कर्ज देणार्या बँका ( प्रामुख्याने एक्सिस बँक आणि इंडस इंड बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

कॉपर उद्योगाचे ड्युटी स्ट्रक्चर असे आहे की त्यांना तोटा होत आहे. तांब्याच्या पातळ तारांची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे, कारण हि आयात ड्युटीफ्री होते पण तांबे आयात करून वायर बनवल्यास २.५% ड्युटी लागते. सरकार हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. याचा फायदा वेदांता आणि हिंदाल्को या कंपन्यांना होईल.

नोव्हेंबर २०१९ मध्ये GST चे कलेक्शन १लाख कोटीपेक्षा जास्त झाले. पण दुसऱ्या तिमाहीसाठी GDP ची ग्रोथ ४.५% राहिली. हा GDP मधील वाढीचा आकडा दुसऱ्या तिमाहीचा तर GST कलेक्शनची आकडे नोव्हेंबर २०१९ चे आहेत म्हणजेच बॉटमिंग आउटची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी होईल असा मार्केटचा अंदाज होता. पण असे काही घडले नाही त्यामुळे HPCL, BPCL,IOC, ONGC हे सर्व शेअर्स पडले.

बजाज फायनान्सने जी RBL बँकेत गुंतवणूक करण्याची घोषणा केली ती मार्केटला पटली नाही असे दिसते त्यामुळे बजाज फायनान्सचा शेअर पडला.

CSB बँकेची अलॉटमेंट झाली आहे. आपल्याला शेअर्स अलॉट झाले की नाही हे तुम्ही ‘linkintime’ च्या साईटवर जाऊन बघू शकता. ४ डिसेंबर २०१९ रोजी CSB बँकेची लिस्टिंग होईल आणि ५ डिसेंबर २०१९ रोजी RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०८०२ NSE निर्देशांक निफ्टी १२०४८ बँक निफ्टी ३१८७१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.