आजचं मार्केट – ०३ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०३ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.०५ प्रती बॅरल ते US $ ६१.३५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.५३ ते US $ ७१.६२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९२ तर VIX १४.१५ होते.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटी USA मध्ये होणाऱ्या २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकांनंतरच यशस्वी होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. चीनमधून होणाऱ्या आयातीवर USA आता अधिक ड्युटी बसवेल अशी शक्यता आहे.
ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन्ही देश आपल्या करन्सीचे अवमूल्यन करत आहेत त्यामुळे USA ने त्यांच्यावर ड्युटी लावली.

युनायटेड स्पिरिट्स आणि पायोनिअर डिस्टीलरीज यांचे मर्जर होणार आहे. पायोनिअर डिस्टीलरीजच्या ४७ शेअर्सऐवजी युनायटेड स्पिरिट्सचे १० शेअर्स मिळतील.

मारुती आपल्या उत्पादनाच्या किमती १ जानेवारी २०२० पासून वाढवणार आहे.

M & M ने BSVI XUV ३०० चे पेट्रोल व्हर्शन लाँच केले..

RBL बँकेने Rs ३५२.५७ फ्लोअर प्राईस प्रती शेअरने Rs २०२५ कोटींचा QIP इशू लाँच केला. मॅक्स बूपा मधील मॅक्स इंडियाच्या डायव्हेस्टमेन्ट साठी IRDA कडून मंजुरी मिळाली. कॅपलीन पाईण्टच्या निट्रोप्रेस्स च्या जनरिकला USFDA ने अंतिम मंजुरी दिली.

बायोकॉन कंपनीने आपले ‘TRASTUZUMAB’ हे बायोसिमिलर USA मध्ये लाँच केले. त्यामुळे त्यांना Rs २२० मिलियन मिळण्याची शक्यता आहे.

टेलिकॉम सेक्टरमध्ये आता सरकारने दर वाढवायला परवानगी दिल्यामुळे कंपन्यांना चांगले दिवस येतील अशी शक्यता आहे. यात भारती एअरटेल, व्होडाफोनआयडिया आणि रिलायन्स जियो यांचा समावेश आहे. ज्या बँकांनी प्रामुख्याने या सेक्टरला कर्ज दिले आहे त्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल. इंडसइंड बँकेचे ४.४७% तर ऍक्सिस बँकेचे २.८२% टेलिकॉम सेक्टरला एक्स्पोजर आहे.

JSPLला अलॉट झालेल्या सारडा माईन्स मधील आयर्न ओअर JSPLने विकायचे की E -ऑक्शनद्वारा विकायची याविषयी वाद होता. जर हे आयर्न ओअर ई-ऑक्शन द्वारा विकली तर त्याचे प्रोसिड्स SBI आणि ICICI बँकांना मिळतील. आज सुप्रीम कोर्टाने JSPL ला हे ओअर विकायला मनाई केली. कोर्टाने JSPL ला याबाबतीत दंडही केला. या केसचा अंतिम निर्णय १७ जानेवारी २०२० रोजी होईल.कोर्टाचा हा निर्णय जाहीर झाल्यावर JSPL चा शेअर खूपच पडला.

सेबीच्या, कारवी कंपनीच्या क्लायंट्सच्या डिमॅट खात्यातून कारवी कंपनीच्या डिमॅट खात्यामध्ये ट्रान्स्फर केलेले शेअर्स CDSL आणि NSDL या डिपॉझिटरीजनी पुन्हा कारवीच्या क्लायंटच्या डिमॅट खात्यात ट्रान्स्फर करावे या ऑर्डरविरुद्ध बजाज फायनान्स, HDFC बँक आणि ICICI बँक यांनी या सेबीच्या ऑर्डरविरुद्ध SAT ( सिक्युरिटीज अपीलेट ट्रायब्युनल ) कडे अपील केले होते. कारण या तिघाजणांनी या शेअर्सच्या तारणावर कारवीला कर्ज दिले होते. सेबीच्या या ऑर्डरमुळे आम्हाला दिलेली शेअर्सची सिक्युरिटी नाहीशी होऊन आता हि कर्ज पूर्णपणे अनसिक्युअर्ड झाली असे या तीन कंपन्यांचे म्हणणे आहे. या ऑर्डर प्रमाणे ८३००० खात्यात शेअर्स ट्रान्स्फर झाले. ज्या क्लायंट्सनी शेअर्ससाठी पूर्ण पेमेंट केले नव्हते अशा क्लायंट्सचे शेअर्स ट्रान्स्फर करायचे राहून गेले.SAT ने या तीन कंपन्यांच्या अर्जावर निर्णय देऊन सेबीला उद्यापर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुरी करून १० डिसेम्बरपर्यंत आपला निर्णय द्यावा अशी ऑर्डर पास केली.

सेबीने आज ९ शेअर्सना अनयुज्वल स्टॉक ट्रेडिंग साठी ऍडिशनल सर्व्हिलन्स खाली आणले. यात डिश टी व्ही, GMR इन्फ्रा, गायत्री प्रोजेक्ट्स, JSPL, यांचा समावेश आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०६७५ NSE निर्देशांक निफ्टी ११९९४ बँक निफ्टी ३१६१३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.