आजचं मार्केट – ०४ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ०४ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.१६ प्रती बॅरल ते US $ ६१.३१ प्रतिए बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६२ ते US $१=Rs ७१.७९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७७ VIX १३.९० होते.

आज USA चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटी २०२० पर्यंत लांबतील अशी बातमी आल्याने मार्केट रेंज बाउंड होते. पण दुपारी मार्केटची वेळ संपता संपता आता या दोन देशांचे एकमत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी बातमी आल्यामुळे मेटलसंबंधी शेअर्समध्ये तेजी आली.

CSB बँकेचे लिस्टिंग Rs २७५ वर झाले आणि शेअर Rs ३०० च्या वर गेला. ज्यांना शेअर्स अलॉट झाले होते त्यांना चांगला लिस्टिंग गेन्स झाला . बँकेने सांगितले की १५% ROA आणि १८% ROE साध्य करू. बँकेच्या एकूण लोन पोर्टफोलिओपैकी १/३ गोल्ड लोन आहे आणि ९% ते १०% रिटेल लोन आहे.बँकेने SME आणि MSME वर जास्त लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे.

सरकार लवकरच भारत कॉर्पोरेट बॉण्ड ETF लाँच करेल. याध्ये १२ सरकारी कंपन्या ज्यात PFC, REC, NHAI, नाबार्ड, एक्झिम बँक, NTPC, पॉवर ग्रीड, IRFC चा समावेश असेल. या बॉण्ड ETF चे एक युनिट Rs १००० असेल. ही बॉण्ड ईटीफ युनिट्स ३ वर्षे ते १० वर्षे मुदतीची असून स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्ट केली जातील.आणि एक्स्चेंज वर फ्रीली ट्रेड होतील. रिटेल इन्व्हेस्टर, मार्केट मेकर ( यांच्याकडी Rs १ कोटींची ETF युनिट्स असली पाहिजेत), आणि लार्ज इन्व्हेस्टर ( Rs २५ कोटींपेक्षा जास्त युनिट खरेदी करणारे ) असे तीन गुंतवणूकदारांचे प्रकार असतील.

HDFCAMC मधील आपला २.२३ % स्टेक स्टॅंडर्ड लाईफ इन्व्हेस्टमेंट्स OFS च्या माध्यमातून ४ डिसेम्बर २०१९ आणि ५ डिसेंबर २०१९ ( रिटेल इन्व्हेस्टर्स ) रोजी फ्लोअर प्राईस Rs ३१७० ने विकेल.

अल कार्गो लॉजिस्टिक्स ही कंपनी गती या कंपनीतील ५०% स्टेक Rs १२०० कोटींना विकत घेणार आहे. त्यामुळे गतीचा शेअर वाढला.

कॅप्री ग्रुपने लक्ष्मी विलास बँकेत ४.९% स्टेक विकत घीतला.

युनायटेड ब्रुअरीजने कर्नाटकात बिअरची नवीन व्हेरियंट लाँच केले.

रामको सिमेंटला वेस्ट एशियन MNC ची दुबईमध्ये ५ वर्षांसाठी ऑर्डर मिळाली.

सेबीने बजाज फायनान्स, ICICI बँक, HDFC बँक, इंडस इंड बँक यांना कोणत्याही प्रकारची सूट देण्यास नकार दिला. त्यामुळे हे शेअर्स पडले.

टाटा मोटर्सच्या JLR ची विक्री चीन, युरोप, USA मध्ये वाढली. कंपनी पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती जानेवारी २०२० जानेवारी पासून वाढवणार आहे. कंपनीने एक नवीन Rs ४५ लाखाची कार मार्केटमध्ये लाँच केली.

उज्जीवन स्माल फायनान्स बँकेचा IPO १६५ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०८५० NSE निर्देशांक निफ्टी १२०४३ बँक निफ्टी ३१९७९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.