आजचं मार्केट – ०५ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ डिसेंबरला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०५ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.७९ प्रती बॅरल ते US $ ६३.१७ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३८ ते US $१=Rs ७१.६२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५६ तर VIX १४.३०( ७.३९%ने वाढला) होते. मार्केटमधी तेजी मंदीचा लपंडाव चालू होता.

आज दुष्काळामुळे अरेबिका कॉफीच्या किमती वाढल्या. टाटा कॉफी टाटा ग्लोबल बिव्हरेजीस, बॉम्बे बर्मा, हॅरिसन मलयालम, कॅफे कॉफी डे, या कंपन्यांवर परिणाम होईल.

ATF आणि नैसर्गिक वायू यांना GST च्या अमलाखाली आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

इंडिगोच्या व्यवस्थापनाने सांगितले की करन्सी,क्रूड विमानांची इंजिन्स बदलणे या सगळ्यामुळे एक्स्पान्शनचे प्रमाण कमी होईल. त्यांने आपला फ्युचर गायडन्स कमी केला. याचा फायदा स्पाईस जेटला होईल.

फोर्स मोटर्सची विक्री २११२ युनिट्स झाली.

सरकारने ५ कोळशांच्या खाणींचे वाटप केले. या वाटपात JSPL चा नंबर लागला नाही. सारडा खाणीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पडलेला शेअर या बातमीमुळे आणखीनच पडला.

आज टायर उत्पादक आणी साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

भरवशाचा शतक मारणारा फलंदाज शून्यावर आऊट होऊन परत यावा तसे काहीसे आज मार्केटला RBI ने आपल्या रेटमध्ये आपण काहीही बदल करणार नाही असे जाहीर केले तेव्हा वाटले. RBI ने रेपोरेट ५.१५%, रिव्हर्स रेपोरेट ४.९०% आणि CRR ४% कायम ठेवला. हा निर्णय मॉनेटरी पॉलिसी कमिटीने एकमताने घेतला असे RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले. वित्तीय वर्ष २०१९-२०२० GDP ग्रोथ रेट ६.१% वरून ५% केला. FY १९-२० च्या उत्तरार्धात महागाई ४.७% ते ५.१% तर एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० या दरम्यान महागाई ३.८% ते ४% राहील असे अनुमान केले. शॉर्ट टर्ममध्ये महागाई वाढेल असे सांगितले.

स्मॉल फायनान्स बँकांसाठी RBI लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल.

RBI चे वित्तीय धोरण जाहीर झाल्यावर ताबडतोब बँक निफ्टीमध्ये मंदी आली. पण मार्केटची वेळ संपता संपता बँक निफ्टी मध्ये पुन्हा सुधारणा झाली. आज निफ्टी १२००० च्यावर बंद झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०७७९ NSE निर्देशांक निफ्टी १२०१८ बँक निफ्टी ३१७१७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ०५ डिसेंबर २०१९

  1. MANU G Gandhi

    आपण दिलेली माहिती सुंदर व उपयुक्त आहे धन्यवाद .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.