आजचं मार्केट – ०६ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ डिसेंबरला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०६ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.११ प्रती बॅरल ते US $ ६३.४४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२७ ते US $१=Rs ७१.४२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४० तर VIX १३.४० होते.

आज USA आणि चीनच्या ट्रेड वाटाघाटींमध्ये प्रगती दिसली. USA मधून आयात होणाऱ्या सोयाबीनवर टॅरीफमध्ये सूट देण्यास चीन तयार झाले. त्यामुळे आता या वाटाघाटी परस्पर सहकार्याने यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कालच्या RBI च्या द्वैमासिक वित्तीय धोरणाने निराश केल्यामुळे आज मार्केटमध्ये विषेशतः बँकिंग शेअर्समध्ये त्यातल्या त्यात सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. निफ्टी PSU बँक निर्देशांकात ४.८२% घट झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये ही मंदी आली.

५ डिसेंबर आनि ६ डिसेंबर रोजी व्हिएन्ना मध्ये ओपेक+ देशांची बैठक आहे यामध्ये क्रूड उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्याचीए शक्यता आहे यामुळे क्रूडच्या भावाने US $ ६३ प्रती बॅरलची पातळी ओलांडली.

पती पत्नी और वो आणि पानिपत हे दोन पिक्चर्स रिलीज होणार असल्यामुळे PVR आणि इनॉक्स लेजर या कंपनांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

रेडियल टायर्सचे थायलंड म्हणून डम्पिंग होत आहे म्हणून ATMA ( ऑटोमोटिव्ह टायर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) यांनी तक्रार केले होती. त्यामुळे DGTR (डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमिडीज) रेडियल टायर्सवर अँटीडम्पिंग ड्युटी लावण्याचा विचार करत आहे. याचा फायदा अपोलो टायर्स, JK टायर्स, केसोराम इंडस्ट्रीज यांना होईल.

निलांचल इस्पात निगम लिमिटेड मधील आपला १०० % स्टेक सरकार विकणार आहे . नीलांचल इस्पात मध्ये MMTC चा ४९.०८% स्टेक, BHEL चा ०.६८% आणि NMDC चा १०.१०% स्टेक आहे.
M & M ने मेरू मध्ये ३६.६३% स्टेक घेतला.

अलकार्गो लॉजिस्टिक्स ‘गती’ या कंपनीत २०% स्टेक खरेदी करणार आहे. त्यामुळे Rs ७५ प्रती शेअर या किमतीवर ओपन ऑफर येईल. यातून २६% स्टेक घेणार आहे. TCI चा या कंपनीत ७% स्टेक आहे.

RBL बँकेचा QIP इशू Rs ३५१ प्रती शेअर या प्राईसवर झाला. या QIP मध्ये बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स NIPON यांनी भाग घेतला.

कॅडीला हेल्थ केअरच्या गुजरात युनिटला USFDA ने EIR ( एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट) दिला.

वोडाफोन आयडिया कंपनीचे CEO KM बिर्ला यांनी सांगितले की भारत सरकार कंपनीला कोठल्याही प्रकारची मदत करणार नसेल तर नाईलाजाने कंपनी बंद करावी लागेल.

जानेवारी २०२० पासून १४, १८,२२ कॅरेटच्या दागिन्यांना हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे.

VASCON ईंजिनीअरिंग या कंपनीला Rs १३३ कोटींची ऑर्डर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून मिळाली.
काही शेअर्सचे सर्किट फिल्टर आज बदलले. यात HOV सर्व्हिसेस, मालू पेपर, स्टार पेपर, पटेल ईंजिनीअरिंग यांचा समावेश आहे.

पुढच्या आठवड्यात

  • ९ डिसेम्बर रोजी जागरण प्रकाशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बाय बॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे,
  • १० तारखेला येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची फंड रेजिंगसाठी बैठक आहे,
  • १० ११ ( मंगळवार बुधवार) रोजी फेडची मीटिंग आहे. ११ डिसेंबर रोजी आरामको या ऑइल उत्पादन क्षेत्रातल्या दिग्ग्ज
  • कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.
  • १२ डिसेम्बर रोजी CPI, आणि IIP चे आकडे येतील. उज्जीवन स्माल फायनान्स बँकेचे लिस्टिंग होईल. याच दिवशी UK मध्ये सार्वत्रिक मतदान होईल.
  • १३ तारखेला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची समाप्ती होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०४४५ NSE निर्देशांक निफ्टी ११९२१ बँक निफ्टी ३१३४१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.