आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६८.३६ प्रति बॅरल ते US $ ६८.४० या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.३३ ते US $१=Rs ७१.३५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८१ तर VIX १०.८९ होता

खरे पाहता रुपया घसरतो आहे, क्रूडचा दर वाढतो आहे, महागाई वाढते आहे, सोन्याचाही दर वाढतो आहे पण सध्या मार्केटमध्ये व्हॉल्युम नाही. ट्रेडर्स हॉलिडे मूडमध्ये आहेत त्यातून हा ट्रँकेटेड वीक आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा फारसा परिणाम दिसत नाही.

मीरा इंडस्ट्रीजने बोनस इशू जाहीर केला. तुमच्याजवळ ५ शेअर्स असतील तर ७ शेअर्स बोनस शेअर्स म्हणून मिळतील. म्हणून या शेअरमध्ये तेजी होती.

क्रिसिल या रेटिंग एजन्सीने VIP इंडस्ट्रीजचे रेटिंग वाढवून AA केले.

IOC गुजरात रिफायनरीत Rs २२००० कोटीची गुंतवणूक करेल.

केंद्र सरकार इंडस इंड बँकेचे SUTTI मधील ३५००० शेअर्स विकून NBFC साठी फंड निर्माण करण्याची शक्यता आहे.
गेटवे डिस्ट्रिपार्कचा स्नोमॅन लॉजिस्टिक्स मधील ४०.२५% स्टेक अडानी लॉजिस्टीकने खरेदी केला. त्यामुळे अडाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आली.

प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्सचे Rs १६० वर लिस्टिंग झाले.

केमिकल इंडस्ट्रीजमधील विष्णू केमिकल्स, बोडल केमिकल्स कॅम्लिन फाईन, कोकुयो कॅम्लिन या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते .

ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीज क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गोल्डन क्रॉस फॉर्म झाला. म्हणजेच ५० DMA लाईनने २०० DMA च्या लाईनला वरच्या दिशेने छेदले. मे २०१६ नंतर हा गोल्डन क्रॉस फॉर्म होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१५५८ NSE निर्देशांक निफ्टी १२२५५ बँक निफ्टी ३२३५४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.