Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!
आजचं मार्केट – ३१ जानेवारी २०२०
आज क्रूड US $ ५८.२५ प्रती बॅरल ते US $ ५९.४५ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $१=Rs ७१.४७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९२ तर VIX १५.९० होते.
चीनमध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. USA ने सांगितले की या व्हायरसच्या भीतीमुळे ज्या कंपन्या आता चीनमध्ये काम करत आहेत त्या USA मध्ये परत येतील आणि त्यामुळे USA मधील नोकऱ्यांची संख्या वाढेल. आज भारतीय मार्केट मात्र कोरोनाची भीती झटकून उद्या असणाऱ्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात काय पोझिशन घ्यावी याच विचारात होते. अंदाजपत्रक कसेही आले तरी आपले नुकसान कमीतकमी व्हावे अशी तयारी ट्रेडर्स करत आहेत असे जाणवले.
EU च्या संसदेने ब्रेक्झिटवर शिक्कामोर्तब केल्याने उद्यापासून UK युरोपिअन युनियनमधून अधिकृतरीत्या बाहेर पडेल.
प्रेस्टिज इस्टेटने Rs ३७२ प्रती शेअर ( सेबीनी ठरवलेल्या Rs ३९२ या फ्लोअर प्राईसवर ५% डिस्काउंट) या भावाने Rs ७५० कोटींचा QIP लाँच केला. कंपनीने सांगितले की या इशूच्या प्रोसिड्सचा उपयोग कर्जपरतफेडीसाठी आणि गुंतवणुकीसाठी केला जाईल.
अबिद नीमुचवाला या विप्रोच्या MD आणि CEO ने कंपनीमधून राजीनामा दिला.
NTPC च्या खरगोण सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये प्रॉडक्शन सुरु झाले.
NCLT ने वेदांताच्या फेरो अलॉईजच्या रेझोल्यूशन प्लानला मंजुरी दिली.
L & T फायनान्स आपला म्युच्युअल फंड बिझिनेस Rs ३५०० कोटी ते Rs ४००० कोटी या दरम्यानच्या व्हॅल्युएशनला विकेल.
बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक तिसऱ्या तिमाहीत तोट्यातून फायद्यात आली. Rs ४७३८ कोटींच्या ऐवजी Rs १०६ कोटी फायदा झाला. लोन ग्रोथ मात्र १.०७% होती.
कन्साई नेरोलॅक ( उत्पन्न कमी, प्रॉफिट, मार्जिन वाढले इतर उत्पन्न कमी झाले), V- गार्ड इंडस्ट्रीज ( प्रॉफिट, उत्पन, मार्जिन वाढले) , कोरोमंडल इंटरनॅशनल ( प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले) बिर्ला सॉफ्ट ( प्रॉफिट ऊत्पन्न मार्जिन वाढले Rs १ अंतरिम लाभांश), RPG लाईफ, कॅस्ट्रॉल, नॅशनल फर्टिलायझर, AIA इंजिनीअर्स, पॉवर ग्रीड, भारत बीजली, या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
स्टेट बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगली आले. बँकेला Rs ५५८३ कोटी प्रॉफिट झाले. NII Rs २७७७९ कोटी, कॅपिटल ADEQUACY रेशियो १३.७३% लोन ग्रोथ ७.४७% होती. GNPA ६.९४% तर NNPA २.६५%, फ्रेश स्लीपेजिस Rs १६५२५ कोटी, प्रोव्हिजन Rs ७२५३ कोटी आणि प्रोव्हिजन डायव्हर्जन्स Rs १२०३५ कोटी ( स्टेट बँकेने निश्चित केलेले NPA आनि RBI ने निश्चित केलेले NPA यांच्यातील फरक.) . होते. बँकेने स्पष्ट केले की कॉर्पोरेट NPA त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि रिटेल लोन पोर्टफोलिओमध्ये चांगली वाढ दिसत आहे. मार्केटनी मात्र या निकालावर सावध प्रतिक्रिया दिली. शेअरमध्ये माफक तेजी आली.
टेक महींद्रा या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफिट Rs ११५० कोटी तर उत्पन्न Rs ९६५५ कोटी, US $ उत्पन्न US $ १३५.३ कोटी होते. ऍट्रिशन रेट २०% होता.
HUL चा तिसऱ्या तिमाहीचा नफा Rs १६२० कोटी उत्पन्न Rs ९८०८ कोटी होते मार्जिन २४.९% होते. डोमेस्टिक व्हॉल्युम ग्रोथ ५% राहिली. निकाल चांगले आले.
शॉपर स्टॉप ( फायद्यातून तोट्यात) BEL, JK टायर्स,ज्युबिलण्ट लाईफ (Rs ३४.६ कोटींचा वन टाइम लॉस) यांचे निकाल असमाधानकारक होते.
IEX, एजिस लॉजिस्टिक्स यांचे निकाल ठीक आले.
आज पासून संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु झाले. उद्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या FY २०२०-२०२१ साठी अंदाजपत्रक सादर करतील. सामान्य माणूस आणि निरनिराळ्या क्षेत्रातील उद्योग यांना या अंदाजपत्रकापासून खूपच अपेक्षा आहेत. मंदीच्या विळख्यात सापडलेली अर्थव्यवस्था, बेकारी, मागणीचा अभाव, त्यामुळे सतत कमी होणारी औद्योगिक गुंतवणूक,सतत वाढत जाणारी महागाई यावर अर्थमंत्र्यांना या अंदाजपत्रकात उपाय शोधायचे आहेत. त्याच बरोबर सरकारचे उत्पन्न, खर्च आणि कर्ज यात समतोल साधायचा आहे.
मार्केटचे या अंदाजपत्रकाकडे बारकाईने लक्ष असेल. ज्या औद्योगिक क्षेत्रांना सोयी सवलती पुरवल्या जातील त्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढतील. शेती आणि शेतीला सलंग्न असलेले उद्योग, खते, केमीकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी पुरवठा आणि जलशुद्दीकरण, रेल्वे, MSME, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा, विमा, रिअल्टी, बँका आणि फायनान्सियल क्षेत्र,निर्यात यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या रचनेत आणि दरामध्ये काही सुधारणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
आज सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. उदा ONGC ऑइल इंडिया, कोल इंडिया BEL इत्यादी.
ITI च्या FPO ची मुदत ५ फेब्रुआरी २०२० पर्यंत पुन्हा वाढवली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०७२३ NSE निर्देशांक निफ्टी ११९६२ बँक निफ्टी ३०८३३ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!