आजचं मार्केट – १ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६६.०१ प्रती बॅरल ते US $ ६६.०३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.२८ ते US $१=७१.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५० तर VIX ११.४० होते.

आज नववर्षदिना निमित्त जगातील बहुतेक मार्केट्स बंद होती. जपान, चीन, दक्षिण कोरिया, तैवान, हॉन्गकॉन्ग, USA आणि युरोप मधेही मार्केट बंद होती.

१५ जानेवारी २०२० रोजी USA आणि चीन यांच्यातील ट्रेड अग्रीमेंटवर सह्या होतील.

३१ जानेवारी २०२० पर्यंत ब्रेक्झिट ( ग्रेट ब्रिटन युरोपियन युनियन मधून वेगळे होणे) अमलात येईल.

सरकारने LPG च्या १९ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरच्या किमतीत Rs २९.५० वाढ केली.

ATF (एअर टर्बाईन फ्युएल) च्या किमतीत एका किलोलिटरमागे Rs १६५० ने वाढवली.

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात AC साठी Rs ०.०४ तर इतर क्लाससाठी Rs ०.०१ ते Rs. ०.०४ प्रती किलोमीटर वाढ केली. पण सबर्बन ट्रेन सर्विसच्या भाड्यात कोणताही बदल केला नाहीं.

WAHAT AL AMAN होम हेल्थ केअर मधील १००% स्टेक ASTAR DM ने Rs २०४ कोटींना खरेदी केला.

केअर या रेटिंग एजन्सीने येस बँकेचे रेटिंग कमी करून A केले.

क्रिसिल रेटिंग एजन्सीने टायटन या कंपनीचे रेटिंग AAA असे वाढवले.

रिलायन्स JIO मार्टने ( ग्रोसरी शॉप) आपली ट्रायल प्रोजेक्ट ठाणे कल्याण मुंबई येथे सुरु केली.

शापूरजी पालनजी ग्रुपच्या स्टर्लिंग आणि विल्सन या कंपनीने Rs १००० कोटींचे कर्ज फेडले.

सरकारने PTC (पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन) या कंपनीला स्ट्रेस्ज्ड पॉवर ऍसेट्सचे ऍग्रीग्रेटर नेमले.

आज ऑटो कंपन्यांच्या विक्रीची आकडे जाहीर झाले. मारुतीच्या एकूण विक्रीत ३.९%(YOY) वाढ झाली. डोमेस्टिक विक्री, निर्यात,पॅसेंजर व्हेईकल, पॅसेंजर कार विक्री यात थोडी वाढ (YOY) दिसून आली.

M & M ची एकूण विक्री १% ने घटली, पण ट्रॅक्टर विक्री ३% नी वाढली.

SML ISUZU चि विक्री ३२.८% ने कमी झाली. एस्कॉर्टसची ट्रॅक्टर्स विक्री १०.५५ ने घटली.

वेलस्पन कॉर्पच्या शेअर्समध्ये खरेदी दिसत आहे.कंपनीच्या बुक्समध्ये भरपूर कॅश आहे. त्यामुळे विशेष लाभांश, बोनस शेअर्स, किंवा शेअर्स बायबॅकची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.

अडानी पोर्ट कृष्णपट्टणम पोर्टमधील ७२% स्टेक Rs १०००० ते Rs १२५०० कोटींच्या दरम्यान CVR ग्रुपकडून खरेदी करेल. त्यामुळे अडाणी पोर्टच्या शेअरमध्ये तेजी होती.

१ फेब्रुवारी २०२० रोजी अंदाजपत्रक सादर केले जाईल.त्यामुळे आता ज्या क्षेत्राना अंदाजपत्रकात काही सवलती, सबसिडी दिल्या जातील अशी शक्यता असेल त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी येई. इन्फ्रास्ट्रक्चर, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे, ही काही उदाहरणे.

एप्रिल २०२० पासून BSVI गाड्याच रस्त्यावर चालू राहतील.

सेबीने डेक्कन क्रॉनिकल या कंपनीने शेअर्स बाय बॅकला पात्र होण्यासाठी अकौंट्समध्ये फेरफार केले म्हणून कंपनीच्या ४ पदाधिकाऱयांविरुद्ध कारवाई केली.

आज जगातील मार्केट्स बंद असल्याने व्हॉल्युम्स कमी होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१३०६ NSE निर्देशांक निफ्टी १२१८२ बँक निफ्टी ३२१०२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.