आजचं मार्केट – ०२ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०२ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६६.२२ प्रती बॅरल ते US $ ६६.२४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२० ते US $१= ७१.३५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३५ तर VIX ११.४५ होता.

आज चीनच्या सेंट्रल बँकेने ( द पीपल्स बँक ऑफ चीन) जाहीर केले की ६ जानेवारी २०२० पासून त्यांच्या RRR (रिझर्व्ह रेशियो रिक्वायरमेंट) मध्ये ५० बेसिस पाईंट्सची कपात करेल. यामुळे ८०० बिलियन युआन्स ( US $ ११५ बिलियन) अर्थव्यवस्थेमध्ये वाढतील . त्यामुळे अर्थव्यवस्थेमधील मंदी कमी व्हायला मदत होईल.

कोल इंडियाच्या खाणीत साचलेल्या पाण्याची समस्या दूर झाल्याने कोल इंडियाच्या उत्पादनात आणि विक्रीत वाढ झाली.
TRAI ने १ मार्च २०२० पासून NCF(नेटवर्क कॅपॅसिटी फी) चार्जेस कमी केले. २०० (फ्री टू एअर चॅनेल) वाहिन्यांसाठी कमाल NCF Rs १६० केली. याचा परिणाम सन टी व्ही, झी एंटरटेनमेंट, डिश टीव्ही या कंपन्यांवर होईल.

अरविंदच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

आज टाटा स्टील, JSW स्टिल यांनी हॉट रोल्ड कॉईल्सची तर NMDC ने बम्प्स आणि फाईन्स चे भाव वाढवले. MOIL नी ही आपल्या प्रॉडक्ट्सच्या किमती ५% ते १५% वाढवल्या. SAIL आणि JSPL यांच्या विक्रीत वाढ झाली. या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

सिमेंटच्या किमतीत Rs ५ पर्यंत वाढ झाली. सरकारने इंफ्रास्पेंडिंग मध्ये वाढ होईल असे जाहीर केल्याने सिमेंटच्या शेअर्समध्ये तेजी होती.

अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुअरन्स मधील अपोलो हॉस्पिटलचा ५१.२% स्टेक घेरण्यासाठी HDFCला IRDA ने परवानगी दिली. अपोलो हॉस्पिटल आणि म्युनिच रे ग्रुप यांचे ही जाईंट व्हेंचर आहे. एकूण Rs १३३६ कोटीच्या या व्यवहारातून अपोलो हॉस्पिटलला Rs ३०० कोटी मिळतील ते अपोलो हॉस्पिटल कर्ज फेडीसाठी वापरेल. म्हणून अपोलो हॉस्पिटल आणि HDFC या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली

रिलायन्स कम्युनिकेशनसाठी आलेल्या बोलींवर विचार करण्यासाठी COC ( कमिटी ऑफ क्रेडिटर्स) ची बैठक आहे.
टेलिकॉम मंत्रालयाने बाकी असलेल्या फीसाठी ( २००५ ते २०१९) GNFC ला Rs १५००० कोटी भरण्यासाठी नोटीस पाठवली.

हिरो मोटोची मोटारसायकल्स विक्री ४२४८४५ युनिट्स झाली.

USFDA ने कार्बन ब्लॅक विकायला परवानगी दिल्यामुळे फिलिप कार्बनमध्ये तेजी होती.

आज बजाज ऑटोचे विक्रीचे आकडे आले. एकूण विक्री ३% ने (YOY) कमी झाली.डोमेस्टिक विक्री १५% ने मोटार सायकल्सची विक्री १५% ने कमी झाली. तर निर्यात मात्र १०% ने वाढली. थ्री व्हीलर विक्री ५१३५३ युनिट्स झाली . हे विक्रीचे आकडे मार्केटला फारसे पसंत न पडल्याने शेअरमध्ये मंदी आली.

TVS मोटर्सची विक्री १४.७% ने कमी होऊन २३१५७१ युनिट झाली.

आयशर मोटर्सची विक्रीने १९.६% ने ( YOY) कमी झाली.

टाटा मोटर्सच्या विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले. व्हॉल्युम आणि मार्जिन यांच्यात सुधारणा दिसली.

साखरेचे उत्पादन ११२ लाख टनावरून ७८ लाख टन एवढे कमी झाली. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

पेनिन्सुला लँडने SBI ने दिलेल्या Rs १७७ कोटी कर्जाच्या रिपेमेंटमध्ये डिफॉल्ट केला.

भारत बॉण्ड ETF चे लिस्टिंग झाले.

IRFC (इंडियन रेल्वे फायनान्स कंपनी) या कंपनिने Rs १५०० कोटींच्या IPO साठी अर्ज केला. आज स्माल कॅप इंडेक्स आणि मिडकॅप इंडेक्स मध्ये तेजी होती. त्यामुळे लोकांच्या पोर्टफोलिओ मध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असेल. आज मार्केट सेन्सेक्स, निफ्टी कमाल स्तरावर क्लोज झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१६२६ NSE निर्देशांक निफ्टी १२२८२ बँक निफ्टी ३२४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.