आजचं मार्केट – ०३ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०३ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६८.१६ प्रती बॅरल ते US $ ६८.६४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.५६ ते US $१= Rs ७१.७९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७९ होते. VIX १३.५० होते.

आज USA ने बगदादमधे हवाई हल्ला केला त्यात इराणचा एक मोठा लष्करी अधिकारी मारला गेला. USA ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे इराण आणि USA यांच्यात नव्याने ताणतणाव निर्माण झाले. त्याचा परिणाम मार्केटवर आणि मुख्यतः क्रूडच्या किमतीवर झाला. मार्केटमधील तेजी क्षणार्धात नाहिशी झाली. क्रूडचा दर US $ ६९ प्रती बॅरलच्या वर गेला. रुपया घसरला. परिणामी मार्केटने आपली तेजी गमावली.

सोन्याचे भाव आज Rs ४०००० च्या वर गेले. याचा फायदा मुथूट फायनान्स, मन्नापूरम फायनान्स यांना होत आहे. MCX वरील व्हॉल्युम वाढत आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी होती.

नाटको फार्माच्या कॅन्सरसाठीच्या औषधाची विक्री USA मध्ये चांगली झाली. पण कंपनीने पेटंटचे उल्लंघन केले अशी तक्रार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचेकडे असलेले NSE चे ५० लाख शेअर्स विकणार आहे. यासाठी स्टेट बँकेने १५ जानेवारी २०२० या तारखेपर्यंत बोली मागवल्या आहेत.

ONGC ला ७ ऑइल ब्लॉक्स मिळाले.

HCL टेक या कंपनीने Rs ८ प्रती शेअर तर RITES या कंपनीने Rs ६ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
लक्ष्मी विलास बँकेने त्यांच्या मुंबईतील मालमत्ता विकण्यासाठी बोली मागवल्या. .

केअर या रेटींग एजन्सीने झायडस वेलनेस या कंपनीचे रेटिंग AA+ केले.

टाटा ग्रुपने सुप्रीम कोर्टात अर्ज दिला की टाटा ग्रुप आणि शापूरजी आणि पालनजी ग्रुपचा काहीही संबंध नाही ते फक्त आमच्या ग्रुपमध्ये वित्तीय गुंतवणूकदार आहेत.

A ३२० NEOS ईंजिन बदलण्यासाठी इंडिगोला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या बातमीनंतर या शेअरमध्ये चांगली तेजी आली. इंडिगोचे एक प्रमोटर श्री गंगवाल यांना आपला स्टेक विकण्यासाठी ( यासाठी आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये बदल करावा लागेल) EGM २९ जानेवारी २०२० ला बोलावली आहे.

अव्हेन्यू सुपरमार्केट कंपनीतील ५.२०% स्टिक ब्लॉक डील च्या माध्यमातून विकणार आहेत.

इन्सेक्टीसाईड इंडिया या कंपनीला गुजरातमध्ये इन्सेक्टीसाईड प्लांट चालू करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
काँकॉर या सरकारी कंपनीतील सरकारी स्टेक विकण्यासाठी ८-९ जानेवारी २०२० दरम्यान कॅनडात तर १३-१४ जानेवारी २०२० दरम्यान सिंगापूर मध्ये रोड शो आयोजित करण्यात येतील. भारतातही या दरम्यान विविध ठिकाणी रोड शो आयोजित करण्यात येतील.

या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात साखरेचे उत्पादन कमी होईल. उसाची SAP आणि FRP यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहील. सरकार साखर उत्पादक कंपन्यांना सॉफ्ट लोन देणार आहे.

सध्या उत्तर आणि मध्य भारतात थंडीचा तडाखा खूप आहे त्यामुळे रूम हिटर्स ना खूपच मागणी आहे. पुरवठा कमी असल्यामुळे लोक जास्त किंमत द्यायला तयार आहेत. त्यामुळे हॅवेल्स, क्रॉम्प्टन यांचे शेअर्स वाढत आहेत. लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी CNG आणि PNG यांचा वापर करत आहेत. त्यामुळे इंद्रप्रस्थ गॅस, महानगर गॅस, गुजरात गॅस, आदि शेअर्स वाढत आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१४६४ NSE निर्देशांक निफ्टी १२२२६ बँक निफ्टी ३२०६९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.