आजचं मार्केट – ०६ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०६ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६९.४६ प्रती बॅरल ते US $ ७०.१८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.९८ ते US $१=Rs ७२.१० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८७ आणि VIX १४.८१ होते.

USA ने इराणी जनरल सुलेमानी यांच्यावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बगदाद येथील USA वकिलातीवर रॉकेट्सच्या सहाय्याने हल्ला केला. इराकच्या संसदेने USA ने आपले सैन्य परत घ्यावे असा ठराव पास केला. USA अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण आणि इराकला गंभीर परिणामांची जाणीव करून दिली. या तीन देशातील ताणतणावाचा परिणाम युद्धात होईल या भीतीने आज जगातील सर्व मार्केट पडली. तसेच क्रूडच्या दराने US $७० प्रती बॅरलची सीमा पार केली.

सरकार आपल्या सरकारी खर्चात Rs २ लाख कोटींची कपात जाहीर करण्याची शक्यता आहे.

सरकारचे टॅक्सपासून मिळणारे उत्पन्न आणि विनिवेश आणि सरकारनी ठरवलेले लक्ष्य यात तफावत पडण्याची शक्यता आहे.

सरकारने सर्व बँकांना ज्या ग्राहकांकडे शिलकी सोने असेल अशा ग्राहकांना SMS करून, प्रत्यक्ष संपर्क करून गोल्ड मॉनेटायझेशन योजनेचे महत्व समजावून सांगायला सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत आम्ही असे ५ लाख ग्राहक निवडले असून आतापर्यंत या योजनेमध्ये ३.५ टन सोने गोळा झाले असे सांगितले. बँकांनी या योजनेसाठी तीन महिन्यांचे लक्ष्य ठरवावे आणि ते पुरे करण्याचा रोडमॅप सरकारला सादर करावा असे सांगितले.

येत्या अंदाजपत्रकात MSME क्षेत्राला सरकार मोठ्या सवलती जाहीर करण्याची शक्यता आहे. सरकार कॉर्पोरेट

आयकरामध्ये दिलेल्या सवलतींचा फायदा MSME ना मिळत नाही कारण बहुतांशी MSME नॉनकॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. उदा प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, HUF इत्यादी.

MSME ना व्याजाच्या दरात २.५% ते ५% सूट दिली जाईल. Rs १ कोटीच्या लोनवर २% व्याजाची सूट मिळेल. MSME साठी असलेल्या इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीमला मुदतवाढ दिली जाईल. तसेच काही केसेस मध्ये टॅक्स हॉलिडेचाहि विचार केला जाईल.

हिदुस्थान कॉपर, अल्ट्राटेक सिमेंट, JK लक्ष्मी सिमेंट यांनी आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवल्या.

महागाईचे आकडे चांगले येणार नाहीत त्यामुळे RBI रेट कट करणार नाही तसेच बॉण्ड्सवरील यिल्ड रेट कमी होणार नाहीत अर्थमंत्र्यानीं असे जाहीर केले की यापुढे सरकार बँकांमध्ये भांडवल घालणार नाही. त्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये जबरदस्त मंदी आली

IRB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला त्यांची ९ BOT ( BUILD-OPERATE-TRANSFER) असेट्स IRB इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या नावाने ट्रान्स्फर करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र NHAI कडून मिळाली. GIC आनि अफिलिएट या ट्रस्टमध्ये ४९% गुंतवणूक करतील.

टायटन या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की विविध ठिकाणी चालू असलेल्या दंगलींमुळे आमच्या विक्रीवर परिणाम झाला.

दिल्लीच्या विधानसभेच्या ७० मतदारसंघात ८ फेब्रुवारी रोजी मतदान होइल आणि निकाल ११ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर होतील.

सोन्याच्या दराने Rs ४१००० ची मर्यादा ओलांडली.

इक्विटास स्माल फायनान्स स्मालबँकेने मिनिमम बॅलन्सची अट रद्द केली. तसेच अकौंट मेंटेनन्स चार्जेसही रद्द केले.
या वर्षी सप्टेंबरमध्ये NSE चा IPO येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०६७६ NSE निर्देशांक निफ्टी ११९९३ वर बँक निफ्टी ३१२३७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.